कोणत्याही बातमीची सत्यता कशी तपासायची? How to check fact of any news in Marathi

कोणत्याही बातमीची सत्यता कशी तपासायची?How to check fact of any news in Marathi

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपणास अशा अनेक न्युज युटयुबवर ब्लाँग वेबसाईटवर ऐकायला तसेच वाचायला मिळत असतात.

पण आता जागोजागी शासनाच्या नावाखाली देखील फेक न्युज संदेश व्हायरल केले जात आहेत.

ज्यात असे दिलेले असते की शासनाने अमुक योजना सुरू केली आहे अणि त्यावर इतके पैसे लाभार्थींना दिले जाणार आहे.किंवा मोफत रिचार्ज मिळणार आहे.

अणि मग आपण देखील हा संदेश किती खरा आहे किंवा किती खोटा आहे?यामागची खरी सत्यता काय आहे हे पडताळून न पाहता फेसबुक व्हाॅटस अप इत्यादी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींना फाॅरवर्ड करत असतो.

ज्याने एक चुकीची माहिती फेक न्युज जनसामान्यांपर्यंत आपल्या मार्फत पोहचवली जात असते.

अणि आपण ही लिंक मॅसेज शेअर केलेला असल्याने आपल्यावर विश्वास असलेले इतर लोक देखील आपल्यावर विश्वास ठेवत असतात अणि मग ते देखील अशा फेक लिंकवर जाऊन रिचार्ज करण्यासाठी आपला मोबाईल नंबर इंटर करत असतात.

याचसोबत आपल्या ओळखीतील इतर जणांना देखील हा फेक मॅसेज न्युज फाॅरवर्ड करत असतात.

अणि असे केल्याने ही फेक न्युज फेक लिंक सगळीकडे व्हायरल होऊन जाते.यानंतर खुप लोकांचा डेटा चोरीला जाणे,बॅक खाते रिकामे होणे असे प्रकार देखील घडुन येतात.अणि हे अत्यंत चुकीचे देखील आहे.

अशावेळी आपल्याला प्रश्न हा पडतो की सोशल मिडिया जसे की व्हाॅटस अप फेसबुक इंस्टाग्रामवर आलेली कुठलीही रिचार्ज वगैरेची लिंक

आलेले मॅसेज इतरांना फाॅरवर्ड करण्याआधी आपण
ह्या सर्व बातमींमध्ये किती तथ्य आहे?ह्या सर्व बातमींमागची सत्यता काय आहे?हे आपण कसे जाणुन घेऊ शकतो.

आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

बातमीची सत्यता कशी तपासायची?How to check fact of any news in Marathi

कोणत्याही बातमीची सत्यता कशी तपासायची? How to check fact of any news in Marathi
कोणत्याही बातमीची सत्यता कशी तपासायची? How to check fact of any news in Marathi

जर आपणास व्हाॅटस अप गृप,फेसबुक इंस्टाग्राम गृप इत्यादी सोशल मिडिया दवारे एखादी फ्री रिचार्ज वगैरेची लिंक पर्सनली कोणी फाॅरवर्ड केली.

See also  VITEEE निकाल २०२३ जाहिर । VITEEE Result 2023 Released, Link to Check

किंवा आपल्या गृपवर शेअर केली तर अशा लिंकमागचे सत्य न जाणुन घेता आपण ती कोणालाही फाॅरवर्ड करणे टाळावे.सर्वप्रथम ती लिंक किती खरी आहे किती खोटी आहे त्यामागचे तथ्य जाणुन घ्यायचे आहे.

मगच ती लिंक पुढे कोणालाही शेअर किंवा फाॅरवर्ड करायची आहे.हा एक नियम आपण नेहमी पाळायचा आहे.याने आपल्या मार्फत कुठलीही फेक न्युज फेक लिंक मॅसेज इतरांना फाॅरवर्ड होत नाही.आपल्यामुळे कोणाची फसवणूक होत नसते.

आता आपल्याला फाॅरवर्ड करण्यात आलेल्या मॅसेज लिंक मागची सत्यता जाणुन घेण्यासाठी आपणास काय करावे लागेल हे आपण समजून घेऊया.

बातमीचा स्त्रोत विश्वसनीय आणि विश्वासार्ह असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.आपल्याला ज्या सोर्स वरून माहीती प्राप्त होत आहे ते सोर्स किती विश्वसनीय आहे हे आपण बघायला हवे.

खोट्या बातम्या किंवा अपप्रचार प्रसारित करण्यासाठी ओळखले जाणारे स्त्रोत आपण टाळायला हवे.

माहितीची पडताळणी करायला हवी बातमीत दिलेली माहिती अचूक आणि पडताळणीयोग्य आहे का ते तपासायला हवे.माहितीची पुष्टी करणारे इतर स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.

बातम्यांमध्ये केलेल्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी काही ठोस पुरावे देण्यात आले आहेत का ते तपासायला हवे उदाहरणार्थ, समजा बातम्या एखाद्या वैज्ञानिक शोधाबद्दल असल्यास, त्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक संशोधन किंवा डेटा दिला आहे का नाही हे तपासायला हवे.

पूर्वाग्रह तपासायला हवे -बातम्यांमधील कोणत्याही संभाव्य पूर्वाग्रहाबद्दल आपण जागरूक राहायला हवे स्त्रोताचा राजकीय किंवा सामाजिक झुकता विचारात घ्यायला हवा आणि एखाद्या विशिष्ट अजेंडाला धक्का देत असलेल्या कोणत्याही बातम्यांबद्दल शंका घ्यायला हवी.

समजा आपणास सरकारी योजना विषयी एखादा संदेश व्हाॅटस अप वर पाठविला गेला असेल तर याबाबत पडताळणी करण्यासाठी सर्वप्रथम आपणास शासनाच्या योजनांशी संबंधित असलेल्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन चेक करावे लागेल की शासनाने असे कुठल्या योजनेचे आॅफिशिअल नोटीफिकेशन जारी केले आहे किंवा नाही.

See also  आपल्याला हिचकी का येते ?? Why do we Hiccup?

याचसोबत सरकारच्या आॅफिशिअल टविटर अकाऊंट वर जाऊन चेक करावे लागेल की याबाबत शासनाने कुठलेही आॅफिशिअल टविट केले आहे किंवा नाही.

मोठमोठे आॅथेनटिकेट न्युज पब्लिश करणारे न्युज चॅनल ज्यांच्या वर लाखो करोडो लोकांचा आज विश्वास आहे ज्यांच्या सर्व बातम्या एकदम खरया असतात त्यांच्या वेबसाईट तसेच युटयुब चॅनल वर जाऊन चेक करावे लागेल अशी कुठलीही योजना शासनाने खरच सुरू केली आहे का?अशी कुठलीही न्युज चर्चेत आहे का

तथ्य-तपासणी करणाऱ्या वेबसाइट्सचा सल्ला घ्यायला हवा अनेक तथ्य-तपासणी वेबसाइट्स उपलब्ध आहेत ज्या आपणास कुठल्याही बातमीची अचूकता पडताळण्यात मदत करू शकतात.

याचसोबत आपणास पीआयबी फॅक्ट चेक वर जाऊन देखील चेक करावे लागेल की शासनाने अशी कुठली योजना खरच सुरू केली आहे का?का ही एक फेक न्युज आहे जी सोशल मिडिया वर जागोजागी व्हायरल होत आहे.

पीआयबी फॅक्ट चेक ही एक संस्था आहे जी सरकारशी संबंधित प्रकाशित केल्या जात असलेल्या न्युज संदेश लिंक योजना यामागची सत्यता तपासण्याचे काम करते अणि तपासात ह्या न्युज मागे कुठलेही तथ्य दिसुन आले नाही तर त्या न्युजला फेक म्हणुन पीआयबी फॅक्ट चेक ह्या आपल्या संकेतस्थळावर घोषित करत असते.

Leave a Comment