आपला पीएफ नंबर,यूए एन नंबर कसा जाणुन घ्यायचा? How to know your PF Number,UAN number in Marathi

आपला पीएफ नंबर,यूए एन नंबर कसा जाणुन घ्यायचा?how to know your pf Number,UAN number in Marathi

ज्या व्यक्तींना आपला UAN universal account number आॅनलाईन जाणुन घ्यायचा आहे त्यांना पीएफ सोबत रेजिस्टर असलेला मोबाईल नंबर लागणार आहे

किंवा आपण तो नंबर देखील वापरू शकतो जो आपल्या आधार कार्डशी रेजिस्टर आहे अणि कंपनीत दिलेला आहे.
याचसोबत इथे आपणास आधार नंबर,पॅन नंबर,मेंबर आयडी ह्या तीन गोष्टी लागणार आहेत.

सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या मोबाईल तसेच कंप्युटर मध्ये कुठलेही एक ब्राऊझर ओपन करून तिथे सर्च बार मध्येepfindia.gov.in ही लिंक टाकायची आहे

यानंतर epfindia.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

वेबसाईट वर गेल्यावर होम पेज वर आपणास वेगवेगळे मेन्यू दिसुन येतील यात आपणास kyc updation member हे आॅप्शन सिलेक्ट करायचे आहे अणि ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर एक नवीन पेज ओपन होईल इथे आपणास सगळ्यात खाली स्क्रोल करून यायचे आहे.खाली स्क्रोल करून आल्यावर आपणास important link नावाचे एक आॅप्शन दिसुन येईल.

Important links मध्ये आपणास एकुण सहा लिंक दिसुन येतील activate UAN दवारे आपल्या यु एएन नंबरला अॅक्टीव्हेट करता येणार आहे.

Know your UAN दवारे आपण आपला UAN number जाणुन घेऊ शकतो.

How to know your pf number,UAN number in Marathi
  • Direct UAN allotment employees यामध्ये आपण आपला UAN number आपणास जनरेट करता येतो.
  • आपल्याला आपला UAN number जाणुन घेण्यासाठी यात दुसरे आॅप्शन know your UAN हे निवडायचे आहे.अणि त्यावर क्लिक करायचे आहे.
  • Know your UAN वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर know your UAN असे नाव स्क्रीनवर दिसेल.
  • इथे आपणास खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे.पण इथे फक्त आपणास तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपल्या पीएफ सोबत रेजिस्टर आहे किंवा आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • यानंतर एक कॅपच्या कोड दिसुन येईल तो जसाच्या तसा भरायचा आहे.अणि खाली दिलेल्या request otp वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपणास आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर एक ओटीपी पाठविला जाईल तो ओटीपी इथे enter otp मध्ये टाकायचा आहे.ओटीपी नाही आल्यास आपण request otp वर क्लिक करून पुन्हा एकदा ओटीपी पाठवू शकतो.
  • पुन्हा खाली दिलेल्या कॅपच्या कोड जसाच्या तसा भरायचा आहे.
  • अणि खाली दिलेल्या validate OTP वर आपणास ओके करायचे आहे.पुन्हा एकदा ओके वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपले पुर्ण नाव टाकायचे आहे.जन्मतारीख सिलेक्ट करून टाकायची आहे.
  • यानंतर select anyone मध्ये आधार कार्ड,पॅन कार्ड,मेंबर आयडी या तिघांपैकी कोणतेही एक आॅप्शन निवडायचे आहे.
  • यानंतर खाली आधार नंबर टाकायचा आहे.
  • पुन्हा एकदा कॅपच्या कोड जसाच्या तसा पाहुन भरायचा आहे.
  • यानंतर खाली दिलेल्या show my UAN number वर ओके करायचे आहे.यानंतर आपणास आपला UAN number दिसुन येईल तो आपण लिहुन घेऊ शकता.किंवा काॅपी करून घेऊ शकता.
See also  मंगळ दोष म्हणजे काय? - Manglik Dosh