बाजारात विक्रीसाठी आलेला अस्सल हापुस आंबा कसा ओळखायचा? – How to recognize Hapus mango in Marathi

बाजारात विक्रीसाठी आलेला अस्सल हापुस आंबा कसा ओळखायचा? – how to recognize hapus mango in Marathi

उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या विक्रीला बाजारात सुरूवात होत असते अशा वेळी फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापुस आंबा खरेदी करायलाच आपण सर्वाधिक पसंती देत असतो.

पण बाजारात केरळ कर्नाटक येथील काही अनेक बनावट आंबे देखील असतात अशा वेळी बाजारात विक्रीसाठी आलेला खरा हापुस आंबा ओळखायचा कसा हा प्रश्न आपणास पडत असतो.

आजच्या लेखात आपण खरा हापुस आंबा कसा ओळखायचा हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

रत्नागिरी देवगड कोकणातील हापुस आंबा कसा ओळखायचा? -Alphonso 

देवगड रत्नागिरी तसेच कोकणातील हापुस आंबा हा लांब असतो अणि यांची साल देखील कमी जाडीची म्हणजे पातळ असते.

ह्या आंब्याच्या मध्ये केशरी रंगाचा गर असलेला आपणास पाहावयास मिळतो.हा आंबा वरून दिसायला केशरी रंगाचा असतो अणि कापल्यावर देखील आतुन देखील हा केशरी रंगाचा दिसत असतो.

हापुस आंबा हा आंबा नैसर्गिकरीत्या तयार केलेला आंबा असतो.कुठलीही प्रक्रिया यावर करून हा आंबा पिकवला जात नसतो.

अस्सल हापुस आंब्याला सुगंध असतो.आपणास ह्या आंब्याची पारख करता येत असते.

देवगड रत्नागिरी हापुस आंबा हा वरच्या बाजुने फुगीर असतो.

हापुस आंब्याविषयी सांगितला जाणारा इतिहास –

असे सांगितले जाते की हापुस आंब्याचा शोध एका पोर्तुगीज व्यक्तीने लावला होता.या विषयी एक दंतकथा सांगितली जाते अल्फोन्सो दि अलबुबर्क ह्या एका पोर्तुगीज अधिकारीने गोव्यात असताना खुप भटकंती केली आंब्याच्या झाडावर काही महत्वाचे प्रयोग केले.अणि आंब्याची ही जात विकसित केली असे म्हटले जाते.

See also  ब्लु टिक सर्विस म्हणजे काय? याचे फायदे कोणते असतात? - What is Blue Tick on Social media -

यातुनच प्रथमतः हापुसचे कलम देखील तयार करण्यात आले होते.देवगड आंब्याच्या पेटीवर अल्फान्सो देवगड असे नाव यामुळेच पाहायला मिळते.

स्थानिक तसेच ग्रामीण भागात अपुस असे म्हटले जायचे पण महाराष्ट्रात हे नाव सर्वत्र पोहचेपर्यंत याचा हापुस असा उच्चार केला जाऊ लागला.

कोकणात देवगड रत्नागिरी ह्या भागात हापुस आंब्याचे पीक घेतले जाते.

कोकणातील रायवळ राजापुरी तोतापुरी ह्या आंब्यांना ह्या आंब्यांना बाजारात लोणच्यासाठी खुप अधिक प्रमाणात मागणी आहे.

महाराष्ट्रातील असलेल्या आंब्याच्या महत्वाच्या जाती कोणकोणत्या आहेत?

 • हापुस
 • पायरी
 • दशेरी
 • केसर
 • सुवर्णरेखा
 • लंगडा
 • नीलम
 • गोवा
 • तोतापुरी
 • हिमसागर
 • मानकूर
 • ओलुर
 • बनेशन
 • बेंगनपल्ली

Leave a Comment