अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी का केली जाते? ह्या दिवशी सोने खरेदीचे महत्व काय आहे?
अक्षय तृतीयेचा दिवस हा प्रत्येक मंगल शुभ कार्य करण्यासाठी शुभ मानला जातो अणि ह्या दिवशी कुठलेही काम करताना मुहूर्त देखील बघावा लागत नसतो.
घरात एखादी नवीन वस्तू घरात आणण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी महिला सोन्याची खरेदी फार विपुल प्रमाणात करीत असतात.हया दिवशी सराफांच्या दुकानाबाहेर लांबलचक रांग लागलेली आपणास दिसून येते.
भलेही मग सोन्याचे भाव कमी असो किंवा वाढलेले असो ह्या दिवशी सोने खरेदी आवर्जुन केलीच जाते.आजच्या दिवशी थोडेफार का होईना सोने हे विकत घेतले जात असते.
आपल्यातील खुप जणांना माहीत नसते की अक्षय तृतीयेच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी का केली जाते?ह्या दिवशी सराफाच्या सोन्याच्या दुकानाबाहेर प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते.
सोने हा आपल्या भारत देशातील एक अत्यंत पवित्र महाग असा धातु म्हणून ओळखला जातो.यापासुनच दागिने घडवले जात असतात.
कोणत्याही शुभ मंगल प्रसंगी भारतीय महिला दागिने खरेदी करून गळयात घालत असतात ही प्रथा वर्षानुवर्षे पासुन आपल्या देशात सुरु आहे.अक्षय तृतीयेच्या सोने खरेदीला फार महत्त्व आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडेफार का होईना नवीन सोने खरेदी केल्यास लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होत असते.अशी मान्यता आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन सोने खरेदी केल्यास माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर अणि आपल्या घरावर राहत असते.
असे मानले जाते की ह्या दिवशी सोन्याची खरेदी केल्याने घरात पैशांची अडचण आर्थिक चणचण कधीच भासत नसते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले दागिने सदैव आपल्यासोबत राहत असतात.आपल्या धन संपदा मध्ये अक्षय वाढ व्हावी म्हणून ही सोने खरेदी केली जाते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्यास घरातील लक्ष्मीमध्ये अधिक वाढ होत असते.आपल्या आर्थिक संपत्ती धनात वाढ होते असे मानले जाते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी जी संपत्ती धन बनते ते पिढयान पिढ्या आपल्या जवळ राहत असते हे धन ही संपत्ती कधीच संपत नसते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते.
भगवान श्री कृष्ण यांचे बालमित्र सुदामा हा श्रीकृष्ण यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यासाठी आला होता.अणि भेट म्हणून श्रीकृष्णासाठी सुदामा रात्रीचे उरलेले थोडेसे पोहे घेऊन जातो.
पण रात्रीचे उरलेले शिळे पोहे कृष्णाला द्यायला सुदामा याला लाज वाटत होती.पण श्रीकृष्ण ते पोहे घेतात अणि आवडीने खातात देखील यानंतर सुदामाचा सत्कार देखील दारके मध्ये केला जातो.
हा सर्व पाहुणचार पाहुन सुदामा धन्य होतो.यात सुदामा कृष्णाकडे त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे हे न सांगता तिथुन निघुन गेला.मग घरी आल्यावर सुदामा याने जे बघितल त्यावर सुदामाचा विश्वास बसत नव्हता
सुदामाच्या छोट्याशा झोपडीचा मोठा राजमहल झाला होता.त्याची मुले पत्नी छान कपडे घालुन त्याच्या समोर उभी होती.
ही भगवान श्री कृष्णाची सुदामया वर झालेली कृपा मानली जाते हा दिवस अक्षय तृतीयेचा दिवस होता.
तेव्हापासून हा दिवस सोने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.
घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य धन आणण्यासाठी सोन्याची खरेदी केली जाते.