केदारनाथ मंदिरां विषयी जाणुन घ्यायची काही महत्त्वाची रहस्ये Important Mysterious Secrets Of Kedarnath Temple

केदारनाथ मंदिरां विषयी जाणुन घ्यायची काही महत्त्वाची रहस्ये । Important Mysterious Secrets Of Kedarnath Temple

Important Mysterious Secrets Of Kedarnath Temple
Important Mysterious Secrets Of Kedarnath Temple

 • वैज्ञानिकांच्या मते केदारनाथ मंदिर हे तेराव्या शतकापासुन सतराव्या शतकापर्यंत म्हणजे एकुण चारशे वर्षे बर्फात दाबले गेले होते.तरी देखील ह्या मंदिराला आतापर्यंत काहीही झाले नाही हे मंदिर आहे तसेच सुरक्षित भरभक्कमपणे उभे आहे.
 • केदारनाथ यात्रेला आरंभ करण्याआधी भाविक गौरीकुंडात स्नान वगैरे करत असतात.पण आश्चर्यकारक बाब अशी आहे की केदारनाथ मंदिर सारख्या बर्फाच्छादित थंड ठिकाणी असलेल्या ह्या गौरीकुंडातील पाणी अंघोळ करताना सर्व भाविकांना गरम लागते.
 • केदार नाथ एकमेव असे धार्मिक स्थळ मंदिर आहे जे भाविकांसाठी सहा महिने उघडे राहते अणि पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ह्या मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात.

जागतिक बौदधिक संपदा दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?

 • मंदिराचा दरवाजा बंद करण्याआधी मंदिरातील पुजारी येथे एक दिवा लावत असतात अणि तब्बल सहा महिन्यांनी मंदिर उघडल्यानंतर देखील हा दिवा जसाच्या तसा देवापुढे जळताना दिसून येतो.हा दिवा ज्याने जळताना बघितला त्याला पुण्य लाभते असे म्हटले जाते.
 • केदारनाथ मंदिर पासुन ५०० मीटर दुर इतक्या अंतरावर रेतस कुंड आहे नावाचे एक कुंड आहे.जिथे जाऊन फक्त ऊ नम शिवाय म्हटल्याने देखील पाण्यातुन बुडबुडे येणे सुरु होते.
 • २०१३ मध्ये पुरामुळे केदारनाथच्या आजुबाजुचा परिसर उद्ध्वस्त झाला होता पण ह्या पुरामुळे केदारनाथ मंदीरास काहीच झाले नव्हते.
 • केदारनाथ मंदिरातील शिवलिंग त्रिकोणीय आकाराचा एक मोठा दगड आहे.हे शिवलिंग इतर शिवलिंगपेक्षा वेगळ्या प्रकारचे मानले जाते.
 • हे शिवलिंग भगवान शंकराचे बैल रुपी अवताराचा पाठीचा भाग म्हणून ओळखले जाते.महादेवाच्या ह्या शिवलिंगाच्या निर्मितीमध्ये महाभारत आणि पांडवांची एक प्रचलित कथा जोडली गेली आहे.
 • असे सांगितले जाते की ह्या जागेचा शोध पांडवांनी लावला होता पांडवांना आपल्या पापांपासून मुक्ती प्राप्त करायची होती म्हणून भगवान शंकराचा शोध घेत पांडव इथे पोहोचले होते.
 • पुराणात दिलेल्या नुसार महाभारता दरम्यान पांडवांनी आपल्या भावांसोबत युदध केले होते ह्या पापाच्या ओझ्या पासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी पांडव भगवान शंकर यांची भेट घ्यायला काशी येथे गेले पण पांडवांवर तेव्हा भगवान शिव अप्रसन्न होते म्हणून भगवान शिव तेथुन कैलास पर्वतावर निघुन जातात.
 • पांडव देखील मग भगवान शिव यांच्या मागोमाग कैलाश पर्वतावर जातात.यानंतर भगवान शिव यांनी वेगळे रूप धारण करत पांडवांना चकवा दिला अणि मग खुप शोध घेतल्यानंतर पांडवांनावर अप्रसन्न असलेले महादेव पांडवांना केदारनाथच्या खडकांमध्ये सापडले होते.इथे भगवान शिव यांनी पांडवांना बैलाचे नंदीच्या रुपात दर्शन दिले होते.तेव्हापासुन शिवलिंगाची निर्मिती झाल्यापासून येथे हया नंदीचे पुजन केले जाते.
 • केदारनाथ मंदिर पाच वेगवेगळ्या मंदिराचा समुह मानला जातो.हया सर्व ठिकाणी भगवान शिव यांचे विविध अंग पडले होते म्हणून यांना पंचकेदार म्हटले जाते.
 • केदारनाथ दर्शन केल्याशिवाय बद्रीनाथ ची यात्रा पुर्ण होत नाही अशी मान्यता आहे.
 • केदारनाथ मंदिरात भगवान शिव यांच्या पंचमुखी मुर्तींचे पुजन केले जाते.हया मंदिरात सकाळी साडे सात वाजता पुजेस सुरूवात केली जाते ही पुजा एक तास चालते.
See also  किसान क्रेडिट कार्ड अर्ज पद्धत आता अगदी सोपी-KISAN CREDIT CARD SATURATION DRIVE