भारताच्या राष्टीय ध्वजा विषयी माहीती – India national flag information in Marathi
मित्रांनो आपल्या देशाचे राष्टध्वज हे आपल्या सर्वासाठीच खुप मोठे अभिमानाचे प्रतिक आहे.
हेच ध्वज भारत देशातील जनतेत असलेल्या एकता अणि बंधुभावाचे देखील प्रतिक मानले जाते.
आपल्या देशाचा राष्टध्वज हा आपल्या आशा अणि आकांक्षेला दर्शवण्याचे काम करतो.पण आज जो आपल्या देशाचा राष्टध्वज आहे त्यात याआधी अनेक बदल घडुन आले आहेत.
आज आपण ह्याच राष्टध्वजात याआधी झालेल्या काही बदलांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
राष्टीय ध्वज म्हणजे काय?national flag meaning in Marathi
राष्टीय ध्वज हा आपल्या मनात असलेल्या आपल्या देशाविषयीच्या अभिमानाचे,राष्टप्रेमाचे देशाविषयीच्या आदराचे प्रतिक मानला जातो.
भारताचे सध्याचे राष्टध्वज कसे आहे?
● आपल्या देशाच्या सध्याच्या राष्टध्वजात जो भगवा रंग आहे तो आपल्या देशातील लोकांच्या शक्ती धैर्याचे प्रतिक आहे.
● यात पांढरा रंग देखील समाविष्ट करण्यात आला आहे हा पांढरा रंग पावनतेचे अणि शांततेचे प्रतिक मानला जातो.
● यातील हिरवा रंग हा वाढ शुभता अणि सुपीकता दर्शवतो.
● या राष्टध्वजामधले चक्र हे हालचालीत जिवंतपणा अणि स्तब्धतेमध्ये मृत्यु आहे हे दर्शवण्याचा काम करतो.
भारताच्या राष्टध्वजाची रचना कोणी केली होती?
भारत देशाच्या राष्टध्वजाची रचना ही आंध्र प्रदेश येथील महान शिक्षणतज्ञ अणि स्वातंत्र्यसैनिक म्हणुन ओळखल्या जाणारया पी वैंकय्या यांनी केली होती.
राष्टध्वजा बाबतची आचार संहिता –
● कोणीही ह्या राष्टध्वजाचा वापर आपल्या जातीय तसेच धार्मिक फायद्यासाठी करू शकत नाही.
● देशाच्या राष्ट ध्वजाला हेतुपुरस्कर आपण जमिनीला टेकवू शकत नाही.पायदळी ठेवू शकत नाही.पाण्यात फेकु शकत नाही.
● आपण देशाच्या राष्टध्वजापेक्षा उंच इतर कुठलाही ध्वज उंच ठेवू शकत नाही.
● राष्टध्वजावर फुले हार इत्यादींसोबत कोणतीही वस्तु ठेवली जाऊ नये.
● राष्ट ध्वजाचा वापर फेस्टुन म्हणुन करू नये.
● कुठलेही वाहन,ट्रेन,बोट किंवा विमानाच्या हूडवर,वरच्या बाजूला आण मागे ध्वज लावता येणार नाही.
भारतीय राष्टध्वजाचा इतिहास –
मित्रांनो आपल्या राष्टध्वजा म्हणुन तिरंगा झेंडा अस्तित्वात येण्याआधी भारतीय राष्टध्वजामध्ये अनेक बदल घडुन आले आहेत.
- आपल्या देशाचा पहिला राष्टध्वज हा हिरवा,लाल,पिवळा ह्या तिन्ही रंगाचा होता.हा ध्वज तीन आडव्या पटटयांचा होता.
अणि हा राष्टध्वज हा सर्वप्रथम 7 आँगस्ट 1906 रोजी कोलकाता ह्या शहरामधील पारसी बागान चौक येथे फडकविण्यात आला होता. - यानंतर दुसरा ध्वज आला जो पहिल्या ध्वजाप्रमाणेच होता फक्त त्यात आडव्या तीन पटटींसोबत सात तारे देखील होते.हा ध्वज 1907 च्या सुमारास फडकविण्यात आला होता.
- आपल्या देशाचा तिसरा ध्वज पाच लाल अणि चार हिरव्या पटया होत्या.याचसोबत ह्या ध्वजात सात तारे देखील होते.ह्या ध्वजामध्ये डाव्या बाजुस कोपरयात वरील बाजुला युनियन जँक होता.अणि एका पांढरी चंद्रकोर काढलेली होती.
- हा ध्वज 1917 मध्ये वापरला जायचा.हा राष्टध्वज टिळकांनी अणि अँनी बेझंट यांनी होमरूल चळवळी अंतर्गत फडकावला होता.
- यानंतर 1921 मध्ये अजुन एक नवीन राष्टध्वज आला होता.यात असलेला पांढरा बँण्ड हा अल्पसंख्यांक धार्मिक गटाचे प्रतिनिधित्व करायचा.
- अणि यातील लाल बँड हा हिंदू अणि हिरवा बँड हा मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करत असे.यात एक चाक देखील होते जे देशाची प्रगती दर्शवत असे.
- मग 1931मध्ये एक ठराव मंजुर करण्यात आला ज्यात तिरंगा हा आपला राष्टध्वज म्हणुन स्वीकारण्यात आला.यात एकुण तीन रंग होते.भगवा,हिरवा अणि पांढरा अणि मध्यभागी चरखा.
- शेवटी 1947 मध्ये 22 जुलै रोजी आत्ता जो आपला राष्टध्वज आहे तो राष्टीय ध्वज म्हणुन स्वीकारण्यात आला होता.यात ध्वजावर चिन्ह म्हणुन धमम चक्र स्वीकारण्यात आले आहे.
राष्टीय बोधचिन्ह म्हणजे काय?National emblem meaning in Marathi
मित्रांनो प्रत्येक देशाचे आपले एक राष्टीय प्रतिक म्हणजे बोधचिन्ह असते.हे चिन्ह देशाचे ओळखचिन्ह असते.राष्टीय प्रतिक हे देशामधील जनतेत आपल्या राष्टाविषयी राष्ट भक्ती अणि राष्टाविषयीचा अभिमान निर्माण करत असते.
भारतासारख्या विविध धर्मावलंबी विभिन्नतेने नटलेल्या राष्टांना एकत्र बांधण्याचे काम हे राष्टीय बोधचिन्ह करत असते.आपल्या देशाची प्रतिके ही जगात आपल्या देशाचे एक वेगळ प्रतिबिंब उमटवते.
देशाचे राष्ट्रीय चिन्ह हे एक सील असते जे राज्याद्वारे अधिकृत वापरासाठी राखीव असते.
भारताचे राष्टीय बोधचिन्ह काय आहे? National emblem of India in Marathi
भारताचे राष्टीय बोधचिन्ह हे अशोकस्तंभ आहे.जे अशोकाची राजधानी सारनाथ येथुन घेतले गेले आहे.जो सम्राट अशोक याने बांधला होता.
ह्या राष्टीय चिन्हामध्ये चार सिंह,अणि चार लहान प्राणी आहेत.ज्यात घोडा अणि बैल दिसुन येतात पण सिंह अणि हत्ती हे दिसुन येत नाही.
यातील चार सिंह हे शक्ती अभिमान अणि आत्मविश्वास यांचे प्रतिक आहे.
यातील दिलेला घोडा हा प्रामाणिकता,वेग,अणि शक्ती दर्शवण्याचे काम करतो.तर यात दिलेला बैल कठोर परिश्रम,भक्ती अणि शक्ती हे दर्शवत असतो.यातील चक्र हे न्याय सुव्यवस्था आदर दर्शवते.
राष्टचिन्हाच्या खाली देवनागरी लिपिमध्ये सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे.हे वाक्य मुंडक उपनिषदामधुन घेण्यात आले आहे.
सत्यमेव जयतेचा अर्थ नेहमी सत्याचा विजय हो असा होत असतो.
भारताचे राष्टीय बोधचिन्ह कधी स्वीकारण्यात आले होते?
भारताचे राष्टीय बोधचिन्ह 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर स्वीकारण्यात आले होते.
1 thought on “भारताचा राष्टीय ध्वज विषयी माहीती – रंग ,इतिहास व आचारसंहिता- India national flag information in Marathi”
Comments are closed.