15 आँगस्ट स्वातंत्र्य दिन अणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोघांमध्ये काय फरक असतो?- Difference Between Republic Day And Independence Day In Marathi

15 आँगस्ट  अणि 26 जानेवारीमध्ये काय फरक असतो?- Difference Between Republic Day And Independence Day In Marathi

मित्रांनो आपल्यातील खुप जणांच्या मनात ही शंका असते की स्वातंत्र्य दिन अणि प्रजासत्ताक दिन या दोघांमध्ये काय अणि कोणता फरक असतो.

कारण दोघेही दिवशी राष्टप्रेमाची भावना आपल्या मनात जागृत होत असते.दोन्ही दिवशी ध्वजारोहण केले जात असते.

मग हे दोघेही सारखेच आहे की याच्या नियम पदधती मध्ये काही फरक आहे?हे जाणुन घेण्याची आपल्यातील काही जणांना उत्सुकता असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण स्वातंत्र्य दिन अणि प्रजासत्ताक दिन या दोघांमध्ये काय फरक असतो हे जाणुन घेणार आहोत.

● 15 आँगस्ट 1947 रोजी आपला भारत देश हा ब्रिटीशांच्या तावडीतुन मुक्त होऊन पुर्णपणे स्वतंत्र झाला होता तर 26 जानेवारी रोजी राज्यघटना लागु होऊन भारत प्रजासत्ताक देश झाला होता.

● स्वातंत्र्य दिन हा 15 आँगस्ट रोजी साजरा केला जात असतो.अणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जात असतो.

● स्वातंत्र्य दिनी अणि प्रजासत्ताक या दोघे दिनी ध्वजारोहण हे वेगवेगळया पदधतीने केले जाते.15 आँगस्ट रोजी देशाचा तिरंगा झेंडा फडकविताना दोरीच्या साहाय्याने खालच्या बाजुहुन वर ओढण्यात येत असतो.त्यानंतर ध्वजारोहण केले जात असते.हे असे 15 आँगस्ट 1947 च्या ऐतिहसिक घटनेला सम्मान देण्यासाठी करण्यात आले होते.यास इंग्रजीमध्ये flag hosting असे म्हटले जाते.

● पण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिरंगा झेंडा खालून वर न ओढता वरील बाजुस बांधण्यात येत असतो.मग प्रमुख अतिथी मान्यवर देशाचे राष्टपती हे आपल्या हाताने दोरीला झटका देऊन ध्वजारोहण करत असतात.ज्याला राज्यघटनेत इंग्रजीमध्ये flag infuring असे म्हटले जाते.

● 15 आँगस्ट रोजी देशाच्या पंतप्रधानांच्या ज्यांना केंद्र सरकारचा प्रमुख म्हणुन ओळखले जाते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात असते.कारण जेव्हा देश स्वातंत्रय झाला तेव्हा आपल्या देशामध्ये संविधान राज्यघटना लागु करण्यात आलेली नव्हती म्हणुन 15 आँगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान पंतप्रधान यांना दिला गेला आहे.

See also  जागतिक बालकामगार विरोधी दिवस विषयी माहीती - World day against child labor information in Marathi

पण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करीत नसतात.कारण 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय अधिनियम काढण्यात आले अणि त्याजागी देशात संविधान,राज्यघटना लागु केली गेली होती म्हणुन संविधानात दिलेल्या नुसार संविधानिक प्रमुखास म्हणजे राष्टपतीस 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्याचा मान दिला जात असतो.

● 15 आँगस्टच्या दिवशी पंतप्रधान आपल्या हाताने लाल किल्ला येथे झेंडा फडकवून ध्वजारोहण करीत असतात.पण 26 जानेवारीला राष्टपतींच्या हातुन राजपथावर ध्वजारोहण केले जात असते.

● 15 आँगस्ट रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दिल्ली येथील लाल किल्ला येथे सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले होते.

● 15 आँगस्ट रोजी देशाचे राष्टपती संध्याकाळी जनतेला आपल्याकडुन काही संदेश देत असतात.

● 15 आँगस्ट रोजी कुठलेही सैन्यबळ तसेच सांस्कृतिक विभिन्नतेचे प्रदर्शन केले जात नाही.पण 26 जानेवारी सैन्यबळ अणि सांस्कृतिक विभिन्नतेचे प्रदर्शन केले जात असते.

● 15 आँगस्ट रोजी ध्वजारोहणाच्या समारंभात कुठलेही मुख्य अतिथी आलेले नसतात.पण 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्याच्या समारंभात मुख्य अतिथी आलेले असतात.

 

भारताचा राष्टीय ध्वज विषयी माहीती – रंग ,इतिहास व आचारसंहिता- India national flag information in Marathi

 

प्रजासत्ताक दिन म्हणजे काय – ३० खास शुभेच्छा मराठी संदेश २०२२