मेनोपाॅज म्हणजे काय? Menopause meaning in Marathi
मोनोपाॅजचा अर्थ रजोनिवृत्ती असा होत असतो.मेनोपाॅजमध्ये स्त्रियांची मासिक पाळी कायमची थांबत तसेच बंद होत असते.
सर्वसाधारणपणे ४५ ते ५५ वयोगटात असताना स्त्रियांची मासिक पाळी बंद होत असते.काही स्त्रियांची मासिक पाळी याच्या आधी देखील बंद होत असते.
म्हणजे ४५ वयोगटापासुन ५५ वर्ष इतक्या वयोगटातील स्त्रियांना हा त्रास होत असतो.काही स्त्रियांमध्ये हा त्रास लवकर जाणवतो तसेच काही महिलांमध्ये हा त्रास उशिरा जाणवतो.
मेनोपाॅज म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात सर्व स्त्रियांमध्ये काही शारीरिक तसेच मानसिक बदल घडुन येत असतात.
काही स्त्रिया ह्या शारीरिक मानसिक बदलाला समजुन घेतात अणि सांभाळुन व्यवस्थित सामोरे जातात.अणि यातुन बाहेर पडत असतात.
पण काही स्त्रिया अशा देखील असतात ज्यांना हा शारीरिक आणि मानसिक बदल सांभाळला जात नाही हा बदल नीट समजुन घेता येत नाही.ज्यामुळे त्यांच्या मध्ये काही मानसिक लक्षणे दिसुन येतात.
हीच मानसिक लक्षणे पुढे जाऊन एक गंभीर मानसिक आजार देखील बनत असतात.
मेनोपाॅजची मानसिक लक्षणे कोणकोणती आहेत?
१)सतत चिडचिड होणे –
२) झोप न येणे –
३) मुडमध्ये सतत बदल होणे-
४) डिप्रेशन तसेच अॅग्झायटी ची समस्या येणे –
स्त्रियांमध्ये दिसुन येणारी मेनोपाॅजच्या पहिलेची लक्षणे perimenopausal faize symptoms-
काही स्त्रियांमध्ये मेनोपाॅजच्या पहिले चीडचीड होणे,राग येणे,डिप्रेशन तसेच अॅग्झायटी येणे मुडमध्ये बदल होणे अशी काही प्रमुख मानसिक लक्षणे आढळुन येत असतात.
मेनोपाॅजची कारणे कोणकोणती आहेत?स्त्रियांमध्ये हे मानसिक बदल का घडुन येतात?
हार्मोनल असंतुलनामुळे(harmonal imbalance) स्त्रियांमध्ये ह्या मानसिक समस्या निर्माण होत असतात.हया हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारया समस्येला टाळण्यासाठी महिलांनी नियमितपणे आपला संतुलित आहार घ्यायला हवा.
रोज सकाळी नियमितपणे योगा तसेच व्यायाम करायला हवा.
मेनोपाॅज मध्ये स्त्रियांमध्ये चीडचीड राग येण्याचे प्रमाण अधिक वाढत असते म्हणून स्त्रियांनी स्वताला कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त ठेवायला हवे.
मेनोपाॅज फेज कशाला म्हणतात?
जेव्हा एखादी महिला, स्त्री आपल्या रिप्रोडक्टिव्ह वयातुन दुसरया टप्प्यात प्रवेश करत असतात.हया फेजला मेनोपाॅज फेज असे म्हटले जाते.
मेनोपाॅज फेज मधुन जात असताना स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडुन येत असतात ज्यामुळे स्त्रियांना अनेक अडीअडचणी समस्यांना सामोरे जावे लागते.त्यांना ह्या फेजमध्ये खुप त्रास देखील होत असतो.
मेनोपाॅजचे एकुण तीन टप्पे असतात यात पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना लगेच त्रास होत असतो.हा त्रास महिलांना काही महिने किंवा वर्षभर होऊ शकतो.
यात महिलांना पाळी अनियमितपणे होणे,पाळी अनियमित होऊन कमी किंवा जास्त रक्तस्त्राव होणे.कानातुन शरीरातुन गरम वाफा निघणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
स्त्रियांच्या शरीरातुन कानातुन गरम वाफा जाण्याचा हा कालावधी काही मिनिट तसेच सेकंद इतका असु शकतो.
हयामुळे स्त्रियांना अचानक खुप घाम येणे,झोप लागत नाही,झोप पुर्ण न होणे,चिडचिड होणे,भीती वाटणे,गोष्टी विसरणे,आत्मविश्वास कमी होणे ह्या अशा गोष्टींना सामोरे जावे लागते.
दुसरया टप्प्यात महिलांना काही महिने तसेच वर्षांनी त्रास जाणवत असतो.यात महिलांच्या चेहर्यावर अनेक बदल पाहावयास मिळतात.
चेहर्यावर डाग येणे, चेहर्यावर सुरकुत्या येणे अशा काही चेहरयाशी संबंधित समस्या निर्माण होतात.यामुळे भीतीने स्त्रिया कुठल्याही समारंभात कार्यक्रमात जात नाही म्हणजेच स्त्रियां मधील आत्मविश्वास कमी कमी होऊ लागतो.
अणि तिसरया टप्प्यात काही वर्षांनी महिलांना हा त्रास जाणवत असतो.यात हाडे ठिसूळ होणे, स्नायुंची ताकद कमी होणे हदयाशी संबंधित त्रास,थाॅयराॅईड इत्यादींचा त्रास महिलांना होत असतो.
वाढत्या वयाबरोबर महिलांच्या चयापचय क्रिया कमी होत जाते ज्याने महिलांचे वजन अणि चरबी वाढते.
मेनोपाॅजवर उपाय –
- मेनोपाॅज मध्ये वाढत्या वयाबरोबर महिलांच्या चयापचय क्रिया कमी होते अणि चरबी वजन वाढत असते.अशा परिस्थितीत महिलांनी योग्य तो डाएट घ्यायला हवा.
- आपल्या डाएट मध्ये बदल करत महिलांनी कमी कॅलरी आणि जास्त प्रोटीन्स असलेल्या अन्नपदार्थाचे आहारात सेवन करायला हवे.
- जेवणात किमान एका वेळी पोळी न खाता वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी समाविष्ट करायच्या.
- महिलांनी आपल्या आहारात पनीर,दुध डाळी कडधान्ये यांचा समावेश करायला हवा.
- शक्यतो स्वयंपाक करताना तेलात शक्य तितका बदल करत साजुक तूप,आॅलिव्ह आॅईल कोकोनट तेलाचा वापर करायला हवा.
- महिलांनी आपल्या आहारात दुध दही अंडी पनीर इत्यादी उच्च कॅल्शिअम युक्त अन्न पदार्थाचा समावेश करायला हवा.रोज सकाळी नित्यनियमाने योगा एक्सरसाईज स्ट्रेचेस सारखा व्यायाम करायला हवा.याने आपल्या स्नायुंची ताकद देखील वाढते अणि आपले स्नायू अधिक बळकट बनतात.
- मेनोपाॅज मध्ये आपल्या शरीरातील ईस्ट्रोजनचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून ज्या पदार्थांत ईस्ट्रोजनचे प्रमाण अधिक असते अशा पदार्थांचे सेवन करायला हवे.
- ईस्ट्रोजन हा कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक असतो.शरीरातील ईस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे कॅल्शियम शोषून घेण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत असते.
- ज्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते आणि आपली हाडे ठिसूळ बनतात.म्हणून महिलांनी आपल्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा.
- शरीरातील ईस्ट्रोजनचे प्रमाण कमी होत असल्यास आपण आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यात ईस्ट्रोजन नैसर्गिक रीत्या उपलब्ध होते
- उदा,दुध,दही,दाळी,अंडी,कडधान्ये,
- मेनोपाॅज मध्ये अति रक्तस्राव होत असल्याने महिलांच्या शरीरातील रक्त कमी होत असते म्हणून स्त्रियांनी आयर्न युक्त आहाराचे सेवन करायला हवे.
- सोबत व्हिटॅमिन सी अणि फाॅलिक अॅसिडचा देखील आपल्या आहारात समावेश करावा.
- शरीरातील कॅल्शिअमचे व्यवस्थित शोषण होण्यासाठी कॅल्शियम सोबत ओमेगा ३ फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम इत्यादींचा समावेश करायला हवा.
- ओमेगा ३ फॅटी अॅसिड करीता महिलांनी टरबूज, खरबूज भोपळ्याच्या बिया, जवस,तीळ,बदाम इत्यादीचे सेवन करायला हवे.