रविंद्रनाथ टागोर यांच्या विषयी माहिती -Information about Rabindranath Tagore in Marathi

रविंद्रनाथ टागोर यांच्या विषयी माहिती information about rabindranath tagore in Marathi

आज मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विषयी काही महत्वपूर्ण माहिती जाणुन घेणार आहोत.

Information about Rabindranath Tagore in Marathi
Information about Rabindranath Tagore in Marathi

रविंद्रनाथ टागोर हे एक थोर साहित्यिक,कवी,लेखक, चित्रकार अणि समाजसेवक होते.

रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी पश्चिम बंगाल मध्ये जोडासाको गावात एका सधन बंगाली परिवारात झाला होता.रविंद्रनाथ टागोर यांच्या आईचे नाव शारदा.अणि वडिलांचे नाव देवेंद्रनाथ असे होते.

रविंद्रनाथ टागोर हे लहानपणापासूनच कुशाग्र बुध्दीचे होते.टागोर यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेविअर स्कुल मध्ये झाले होते.रविंद्रनाथ टागोर यांनी बॅरिस्टर बनावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.

म्हणून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांना त्यांच्या वडिलांनी लंडनमधील जागतिक महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करून दिला पण रविंद्रनाथ टागोर यांची आवड साहित्यात असल्याने त्यांनी ते लंडनहून अर्धवट शिक्षण सोडून निघुन आले होते.

लंडनहून अर्धवट शिक्षण सोडून परत आल्यावर रविंद्रनाथ टागोर आपले वडिलोपार्जित जमिनीचे काम करू लागले.सोबतच ते लिखाण अणि साहित्य निर्मिती देखील करत होते.

रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म जरी ७ मे रोजी झाला होता तरी रविंद्रनाथ टागोर यांची जयंती वैशाख महिन्यातील २५ व्या दिवशी साजरा करण्यात येत असते

९ मे रोजी दरवर्षी साजरा करण्यात येत असते.हया वर्षी देखील ९ मे २०२३ रोजी ही जयंती साजरी करण्यात येणार आहे.

कारण रविंद्रनाथ टागोर यांची बंगाल मध्ये खुप ख्याती आहे ते खुप प्रसिद्ध लोकप्रिय साहित्यिक व्यक्ती आहेत बंगाली कॅलेंडर नुसार वैशाख महिन्यातील २५ वा दिवस २०२३ मध्ये ९ मे रोजी येतो आहे.

रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले एशियाई व्यक्ती होते याचसोबत ते साहित्य मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले नाॅन युरोपियन व्यक्ती देखील होते.

रविंद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली ह्या ग्रंथासाठी १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते.रविंद्रनाथ टागोर यांना आतापर्यंत मिळालेल्या सन्मानापैकी मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान मानला जातो.

See also  पुस्तक परीक्षण - इगो इज एनेमी-अहंकार आपला शत्रू - Book Review of Ego Is The Enemy In Marathi

रविंद्रनाथ टागोर यांनी आतापर्यंत २२३० गीते लिहिली आहेत.

भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनीच १९११ मध्ये लिहिले होते.रविंद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रगीत लिहिण्यासोबत १९०६ रोजी बांगलादेश ह्या देशाचे राष्ट्रगीत देखील लिहिले होते.

रविंद्रनाथ टागोर हे आपल्या भारत देशातील सर्वात प्रसिद्ध लेखक तसेच कवी होते.

रविंद्रनाथ टागोर यांना आदर सम्मानाने गुरूदेव ह्या टोपणनावाने संबोधित केले जायचे.

रविंद्रनाथ टागोर यांनीच ६ मार्च १९१५ रोजी मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी दिली होती.कारण रविंद्रनाथ टागोर यांच्या मते गांधीजींच्या आगमनानंतर भारत देश एक नवीन देश बनण्यास सुरूवात झाली होती.

नोबेल पारितोषिकातुन प्राप्त झालेल्या रक्कमेचा वापर करत रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन मध्ये विश्व भारतीय विश्व विद्यालयाची निर्मिती केली होती.हयाच युनिव्हर्सिटी मधुन सत्यजित रे,इंदिरा गांधी सारखे दिग्दज व्यक्ती देशाला लाभले होते.

भारताच्या साहित्य क्षेत्रात मुख्यतः बंगाली साहित्यात रविंद्रनाथ टागोर यांनी दिलेले आपले योगदान अमुल्य आहे.

अशा ह्या महान कवी लेखक साहित्यिक समाजसेवक अणि चित्रकार म्हणून ओळखले जाणारया रविंद्रनाथ टागोर यांचे १९४१ मध्ये कोलकता येथे निधन झाले होते.

1 thought on “रविंद्रनाथ टागोर यांच्या विषयी माहिती -Information about Rabindranath Tagore in Marathi”

  1. 1912 मध्ये, टागोरांनी “गीतांजली” प्रकाशित केला, ज्याने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली.

Comments are closed.