आंतरराष्ट्रीय सहल दिवस विषयी माहीती – International picnic day information ।n Marathi

आंतरराष्ट्रीय सहल दिवस विषयी माहीती international picnic day information in Marathi

मित्रांनो सहल म्हटले की पहिले आपल्याला आपले शाळेचे दिवस आठवतात कारण लहान असताना नेहमी आपल्या शाळेची कुठेतरी ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळी सहल जायची.त्यामुळे सहल ही आपणास लहानपणापासुनच माहीत आहे.

पण आता सहल ही शाळेत जात असलेल्या लहान मुलांपुरताच सिमित राहिलेली नाहीये तर लहानांपासुन मोठयांपर्यत सगळयांच्याच आवडती गोष्ट झाली आहे.

आपल्या कुटूंबासोबत वेळ व्यतित करण्याचे हे एक उत्तम साधन तसेच माध्यम बनले आहे.

आज आपण ह्याच आंतरराष्ट्रीयसहल दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण आंतरराष्ट्रीय सहल दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

कशापदधतीने साजरा केला जातो?का साजरा केला जातो?हा दिवस साजरा करण्यामागचा मुळ इतिहास काय आहे?इत्यादी महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय सहल दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा दरवर्षी 18 जुन रोजी साजरा केला जात असतो.

आंतरराष्ट्रीय सहल दिवस का साजरा केला जातो?

दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहल दिवस साजरा करण्याचे मुख्य उददिष्ट म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन वेळ काढुन आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या फँमिलीसोबत एक चांगला वेळ व्यतीत करायला हवा त्यांच्यासोबत बाहेर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जायला हवे.

त्यांना आपण आपल्या कामातुन सवड काढुन वेळ द्यावा त्यांच्याशी संवाद साधावा हे सांगण्यासाठी, आपणास आपल्या जीवणातील सहलीचे महत्व पटवुन देण्याकरीता हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो.

See also  एनडी आर एफ म्हणजे काय? -NDRF Meaning In Marathi

आंतरराष्ट्रीय सहल दिवस कसा साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय सहल दिनाच्या दिवशी सर्व फँमिली मित्र मैत्रीणी जमतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात किंवा एखाद्या आपल्या आवडत्या पर्यटन ठिकाणी जातात तिथे पर्यटनाचा आनंद घेतात.तंबु गाडुन तिथे पिकनिक साजरा करतात.

किंवा याच दिवशी लहान मुले गार्डनमध्ये जाऊन खेळतात स्विमिंग पुलमध्ये स्वीमिंग करतात,खुप खेळता बागडता गप्पा गोष्टी करतात.बाहेरगावी एखाद्या पाहण्या जोग्या स्थळी ट्रिपला जातात.तर मोठी माणसे याचदिवशी एखाद्या धार्मिक देव स्थळाला भेट देतात.

शाळेत देखील हा दिवस एखाद्या सुटटीप्रमाणे साजरा केला जातो.या दिवशी सर्व शिक्षक आपल्या विदयार्थ्यांना घेऊन एखाद्या बगीचात जातात.किंवा एखाद्या समुद्रठिकाणी,निसर्ग सौदर्य असलेल्या किंवा ऐतिहासिक स्थळी जातात.

आंतरराष्ट्रीय सहल दिवसाचा इतिहास –

● आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा फ्रान्स ह्या देशात एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला होता.तेव्हापासुन दरवर्षी 18 जुन रोजी हा दिवस साजरा केला जात असतो.

● आंतरराष्ट्रीय सहल दिवस सगळयात प्रथम फ़्रान्स ह्याच देशात साजरा करण्यात आला होता.या दिवशी इथे राहणारे लोक निसर्गाचे सान्निध्य असलेल्या समुद्राकाठी एखाद्या शांत निरव ठिकाणी जातात आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ व्यक्तीत करतात.सोबतच चीज ब्रेड फ्रूटस तसेच वाईन इत्यादींचा आनंद देखील घेतात.

● पिकनिक डे साजरा करणे हे फ्रान्स ह्या देशात फ्रेंच राज्यक्रांतीचा शेवट झाल्यानंतर सुरू झाले फ्रेंच राज्यक्रांती संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच येथील जनतेसाठी राँयल नावाचे गार्डन सुरू करण्यात आले.त्यानंतर फ्रेंच देशातील लोक आपल्या फँमिलीसोबत येऊन वेळ व्यतीत करू लागले घरून स्वयंपाक तयार करुन गार्डनमध्ये जाऊन गप्पागोष्टी करत खाऊ पिऊ लागले तेव्हापासुन ही इथली प्रथाच बनुन गेली.

● पण आता हाच दिवस फ्रान्स व्यक्तीरीक्त संपुर्ण जग देखील हळुहळु मान्य करू लागले आहे म्हणुनच भारत देशात तसेच जगभरात दरवर्षी 18 जुन रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला आहे.

See also  मेडिटेशन म्हणजे काय -? What is meditation and its benefits

आंतरराष्ट्रीय सहल दिनाविषयी वारंवार विचारले जाणारे काही इतर महत्वाचे प्रश्न –

1)आंतरराष्ट्रीय सहल दिवस साजरा करायला कधीपासुन आरंभ झाला?

आंतरराष्ट्रीय सहल दिवस साजरा करायला एकोणिसाव्या शतकापासुन आरंभ झाला होता.

2)आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा सगळयात पहिले कोणत्या देशामध्ये साजरा करण्यात आला होता?

आंतरराष्ट्रीय सहल दिवस सगळयात प्रथम फ़्रान्स ह्या देशामध्ये करण्यात आला होता.

3)इंटरनँशनल पिकनिक डे ला मराठीत काय म्हणुन संबोधिले जाते?

इंटरनँशनल पिकनिक डे ला मराठीत आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाणारा सहलीचा दिवस म्हणुन संबोधिले जाते.