आंतरराष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो?ह्या दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? international youth day history and importance

आंतरराष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो?ह्या दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? international youth day history and importance

युथ म्हणजे काय? youth meaning in Marathi

युथ म्हणजे देशातील तरूण, तसेच युवा होय.

आपल्या भारत देशाच्या विकासात अणि राष्ट्र उभारणीच्या महान कार्यात येथील तरूण वर्गाचा खुप मोलाचा वाटा तसेच भुमिका आहे.

दरवर्षी १२ आॅगस्ट रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक युवा दिन साजरा केला जातो.हया दिवशी तरुणांशी संबंधित विविध अडचणी समस्या यावर प्रकाश टाकला जात असतो.

हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जगभरातील तरूणांच्या अडीअडचणी समस्यांकडे लक्ष केंद्रित करणे हा आहे.

याचसोबत सर्व सामाजिक,आर्थिक, राजकीय विषयांमध्ये तरुणांचा सहभाग तसेच भुमिका ह्या विषयावर देखील ह्या दिवशी चर्चा केली जात असते.

international youth day history and importance
international youth day history and importance

दरवर्षी संयुक्त राष्ट्र हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थीमचा उपयोग करत असते.हया नवनवीन थीमदवारे जगभरातील तरूणांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

ह्या कार्यक्रमात आपणास सामुदायिक मैफिल तसेच प्रदर्शन पाहावयास मिळते.हया दिवशी वेगवेगळ्या माध्यमातून देशभरातील युवा तरूण वर्गासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो.

देशातील तरूण वर्गास मुख्य प्रवाहाशी जोडुन त्यांच्या युवा तसेच सकारात्मक ऊर्जेचा समाज अणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात उपयोग कसा करता येईल यावर चर्चा केली जाते.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी १५ ते २४ ह्या वयोगटातील तरूणांना त्यांच्या अडीअडचणी समस्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा अणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो.

  • संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने united nation सर्वप्रथम १९८५ मध्ये आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरा करण्यात आले होते.
  • यानंतर तब्बल दहा वर्षांच्या कालावधीने world programme for action for youth स्वीकारून त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची आखणी करण्यात आली होती.
  • लिस्बन मध्ये १९९८ साली ८ ते १२ आॅगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ आॅगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याची शिफारस केली गेली.
  • पुढे एक वर्षाच्या कालावधीने १९९९ मध्ये ह्या शिफारशीस संयुक्त राष्ट्र संघाकडून मान्यता मिळाली.यानंतर आंतरराष्टीय युवा दिवस सर्वप्रथम २००० साली साजरा करण्यात आला होता.
  • तेव्हापासून हा दिवस १२ आॅगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला.
See also  भारतातील पहिले थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिस बंगळुरू मध्ये सुरू - india first 3d printed Post office open in Bengaluru

आंतरराष्ट्रीय युवा दिवस ही एक संधी आहे जिचा वापर करून जागतिक पातळीवर युवकांचा आवाज संपुर्ण जगभरात पोहचवला जाऊ शकतो.

आपल्या भारत देशासाठी हा दिवस खुपच खास आहे कारण आपल्या भारत देशात सर्वात जास्त तरूण वर्ग आढळुन येतो.

अणि एक गोष्ट आपल्याला चांगलीच माहिती आहे की कुठल्याही देशाचे उज्वल भवितव्य हे तेथील युवा वर्गावर अवलंबून असते.

म्हणून आंतरराष्ट्रीय युवा दिनी देशातील तरूणांच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो.