लेपरोसी म्हणजे काय? लक्षणे, उपचार- Leprosy meaning in Marathi

लेपरोसी म्हणजे काय?Leprosy meaning in Marathi

लेपरोसी हा एक जुना संसर्गजन्य आजार आहे.हया आजाराला हॅनसन रोग महारोग किंवा कुष्ठरोग म्हणून देखील ओळखले जाते.

हा आजार,त्वचेचा संसर्ग आपणास मायक्रो बॅक्टेरिअम लेपरोई नावाच्या एका विषाणुमुळे होत असतो.

कुष्ठरोगाचे बॅक्टेरिया हे आपल्या हात पाय तसेच त्वचेच्या नसेवर विशेषतः परिणाम करत असतात.

कुष्ठरोग हा एक अतिशय महाभयंकर रोग आहे.पण यावर योग्य वेळ असताच उपचार केला गेला तर हा आजार बरा देखील होत असतो.

कुष्ठ रोगामध्ये बाधित जागी जखम तसेच अल्सर होत असते.बाधित भागावरील मज्जातंतूना हानी पोहोचते अणि मांसपेशी देखील कमकुवत बनत असतात.

ह्या आजारावर वेळ असताच उपचार केला गेला नाही तर रूग्ण ह्या आजारामुळे कायमचा अपंग देखील होण्याची शक्यता असते.

हा आजार लहान मुलांपासून मोठया माणसांपर्यंत कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.

कुष्ठरोग कशामुळे होतो?हा कसा पसरतो? leprosy causes

कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे जो मायक्रो बॅक्टेरिअम लेपरोई नावाच्या एका विषाणुचा संसर्ग झाल्या मुळे आपणास होत असतो.

ज्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला आहे त्याच्या खोकलल्याने किंवा शिंकल्याने देखील हयाचे जीवाणु दुसरया व्यक्तीपर्यंत पोहोचु शकतात.

एखादी अशी व्यक्ती जिला कुष्ठरोग झाला आहे पण ती स्वतावर कुठल्याही प्रकारचा उपचार करत नाहीये अशा व्यक्तीमुळे त्याच्या आसपासच्या लोकांना देखील त्याच्या संपर्कात आल्याने कुष्ठरोग होऊ शकतो.

कुष्ठरोगाची काही प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत? leprosy symptoms

लेपरोसी म्हणजे काय? लक्षणे, उपचार- Leprosy meaning in Marathi
लेपरोसी म्हणजे काय? लक्षणे, उपचार- Leprosy meaning in Marathi

कुष्ठरोगाचे बॅक्टेरिया हळुवारपणे पसरत असल्याने लगेच तत्काळ आपणास याची लक्षणे लक्षात येत नाही त्यामुळे ही लक्षणे समजण्यास आपणास दोन ते २० वर्ष इतका कालावधी लागु शकतो.

  • १)बोटे वेडेवाकडे होणे
  • २)हात पाय सुन्न होणे किंवा बधिर पडणे
  • ३) त्वचेवर लाल तसेच सफेद डाग निशान तसेच चटटे येणे
  • ४) हाडे मांसपेशा कमजोर अशक्त होणे
  • ५) त्वचेच्या बाधित जागेवर कोणतीही संवेदना न जाणवने
  • ६) उग्र किंवा कोरडी त्वचा होणे
  • ७) पायाच्या तळव्यावर अल्सर होणे
  • ८) चेहरयावर वेदनारहीत सूज किंवा गाठ येणे
See also  मंकीपॉक्स आजार - प्रमुख लक्षणे व उपचार - Monkey pox information in Marathi

९) भुवया किंवा डोळ्याच्या पापण्यांना हानी पोहोचते

कुष्ठरोगाचे प्रकार किती अणि कोणकोणते आहेत? leprosy types

1)Tuberculoid leprosy –

हा एक सौम्य प्रकारचा कुष्ठरोग मानला जातो.ह्या कुष्ठरोगाच्या प्रकारात कुष्ठरोग झालेल्या रूग्णाची कुठल्याही आजाराशी लढण्याची प्रतिकार क्षमता ही बरी असते.यात बाधित रूग्णाच्या शरीरावर एक किंवा दोन चटटे आपणास पाहावयास मिळतात.

2) lepromatous leprosy-

हा एक तीव्र प्रकारचा कुष्ठरोग आहे.हा कुष्ठरोगाच्या प्रकारात कुष्ठरोग झालेल्या रूग्णाची कुठल्याही आजाराशी लढा देण्याची रोगप्रतिकारक क्षमता फार कमी झालेली दिसुन येते.

त्यामुळे इन्स्पेक्शन झाल्यावर शरीराच्या इतर अवयवांवर फार प्रभाव पडत असतो.रूग्णाच्या शरीरावर खुप जागी जखम तसेच चटटे पाहावयास मिळतात.

कुष्ठरोग हा आजार कसा पसरत नसतो?

कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मिठी मारल्याने किंवा त्याचा हात हातात घेतल्याने त्यांच्यासोबत जेवन केल्याने एकत्र बसल्याने हा अजीबात पसरत नसतो.

कुष्ठरोगाचे निदान कसे केले जाते?

कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर त्वचेवर असलेले डाग चटटे त्याच्या मध्ये दिसुन येत असलेली कुष्ठ रोगाची लक्षणे ह्या आधारावर डाॅक्टर फिजिकल चेक अप करून रोग्यावर उपचार करू शकतात.

लेपरी बॅसिलिची स्मेअर तपासणी केली जाते.अणि जाणुन घेतले जाते की हे लक्षणे मायक्रो बॅक्टेरिअमचे आहे किंवा नाही.

कुष्ठरोगाचे निदान अधिक योग्य पद्धतीने स्पष्टपणे व्हावे म्हणून बायोप्सी नावाची टेस्ट केली जाईल.यात रूग्णाच्या शरीराचा त्वचेचा तुकडा काढला जातो अणि लॅबरोटरी मध्ये बायोप्सी टेस्ट करीता पाठविला जातो.

कुष्ठरोगावर वेळ असताच उपचार केला नाही तर व्यक्ती बाधित व्यक्ती आंधळी होऊ शकते.तिला वंध्यत्व येऊ शकते.त्याची किडनी खराब होऊ शकते.त्याच्या मांसपेशा देखील कमकुवत होत असतात.

कुष्ठरोगावर उपचार कसा केला जातो?

कुष्ठरोग बरा करण्यासाठी मल्टी ड्रग थेरपी वापरली जाते.कुष्ठरोगाचे जिवाणू विषाणू नष्ट करायला डाॅक्टर रिफामपमिन,क्लोफेजिमिन,मिनो साईक्लीन,डॅपसोन,अॅपलो सासिन इत्यादी अॅटी बायोटीक मेडिसिन्सचा वापर कुष्ठरोग बरा करण्यासाठी त्याचे जिवाणू नष्ट करायला केला जातो.

See also  उन्हाळ्यात महिलांनी आहारासंबंधित घेण्याची काळजी

कुष्ठरोगावर निदान करण्यास आलेल्या व्यक्तीने किमान सहा महिने जास्तीत जास्त २ वर्ष इतका कालावधी तरी डाॅक्टरांनी लिहुन दिलेल्या गोळ्या औषधांचे नियमित सेवन करायला हवे.

कुष्ठरोगावर सरकारी रुग्णालयात मोफत मध्ये उपचार केला जातो.

कुष्ठरोगापासुन बचावासाठी कसा आहार घ्यायला हवा?

  • कुष्ठरोगापासुन बचावासाठी आपण प्रोटीन युक्त आहाराचे सेवन करायला हवे.
  • हेल्दी आणि संतुलित आहाराचे सेवन करायला हवे.शेंगा,नट अणि बटर सोया खाद्य पदार्थाचे सेवन करायला हवे.
  • डेअरी पदार्थ दुध दही ताक मटण मासे फळे भाज्या इत्यादीचे सेवन करायला हवे.