लाॅरेंस बिष्णोई कोण आहे? – Lawrence Bishnoi

लाॅरेंस बिष्णोई कोण आहे? | Lawrence Bishnoi

लाॅरेंस बिष्णोई याने प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेता सलमान खान याला खुले आम धमकी दिली आहे.

ज्यात लाॅरेंस बिष्णोई असे म्हणाला आहे की सलमान खान याने काळवीट शिकार प्रकरणाबाबत बिष्णोई समाजाची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा त्याला याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागु शकतात.

लाॅरेंस बिष्णोई याच्या धमकीनंतर सलमान खान यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ देखील करण्यात आली आहे.

सलमान याला वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.याचसोबत त्याला आत्मरक्षणासाठी बंदुकीचे लायसन देखील देण्यात आले आहे.

आजच्या लेखात आपण लाॅरेंस बिष्णोई हा कोण आहे? अणि त्याने त्याने खुले आम सलमान खान याला धमकी का दिली हे जाणुन घेणार आहोत.

काय आहे काळवीट शिकार प्रकरण-

जेव्हा राजस्थान मध्ये हम साथ साथ है ह्या चित्रपटाची शुटिंग केली जात होती तेव्हा शुटिंग दरम्यान सलमान खान याने काळवीटाची शिकार केली असा आरोप सलमान वर करण्यात आला होता.

सलमान खान यांच्यावर लावण्यात आलेला हा आरोप नंतर न्यायालयात सिदध देखील झाला होता ज्यामुळे त्यांना सहा ते सात दिवस जोधपुर येथील कारागृहात ठेवण्यात आले.

यानंतर बिष्णोई समाजाच्या लोकांनी सलमान खान याला काळवीट शिकार प्रकरणी कोर्टात खेचायला सुरूवात केली.याबाबद सलमान खान याला अनेक धमक्या पाठविण्यात आल्या असे देखील सांगितले जाते.

ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म द एलिफंट व्हिस्परर्सची कहाणी

लाॅरेंसने सलमानला काय धमकी दिली आहे?

लाॅरेस बिष्णोई याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे ज्यात त्याने असे सांगितले आहे की सलमान खान याने आमच्या बिष्णोई समाजाच्या लोकांचा अपमान केला आहे.

त्यामुळे त्याने बिष्णोई समाजाच्या मंदीरामध्ये जावे अणि आमच्या समाजाच्या लोकांची जाहीर माफी मागावी अन्यथा सलमान खान याला याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील.

लाॅरेंस बिष्णोई कोण आहे?

लाॅरेंस बिष्णोई हा पंजाब राज्यातील एक खूप मोठा गुंड तसेच कुख्यात गॅगस्टर आहे.

मागील वर्षी लाॅरेंस बिष्णोई याच्या गॅगमधील लोकांनी पंजाबी सिंगर सिदधु मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या देखील केली असल्याचे न्युज मध्ये सांगण्यात आले होते.

यानंतर लाॅरेंस याला अटक देखील करण्यात आली होती लाॅरेंस बिष्णोई हा सध्या तुरुंगात आहे.

तुरूंगात त्याची नुकतीच एक मुलाखत घेतली गेली यात त्याने आॅन कॅमेरा खुले आम सलमान खान याला ही धमकी दिली आहे.

लाॅरेंस बिष्णोई याचा जन्म पंजाब राज्यातील फिरोजपुर जिल्ह्यातील दुत्रानवली येथे १२ फेब्रुवारी १९९३ मध्ये झाला होता.

लाॅरेंस बिष्णोई याने आपले प्राथमिक शिक्षण सेक्टर १५ मधल्या डीएव्ही स्कुल मधुन पुर्ण केले होते.

लाॅरेंस याने पंजाब युनिव्हर्सिटी मधुन कायद्याचे शिक्षण देखील घेतले आहे.परीक्षेदरम्यान चिटींग करताना पकडला गेल्यावर त्याने खिडकीतून उडी टाकली होती.

शिक्षण करत असताना लाॅरेंस हा काॅलेज मधील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीमध्ये समाविष्ट झाला होता त्यातही तो सतत वादात येताना दिसुन आला.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना लाॅरेंस याने विद्यार्थी अध्यक्ष पदासाठी निवडणुक लढवली होती.ज्यात त्याला गोल्डी बेरार संपत नेरार यांनी प्रमोट करण्याचे काम केले.

असे म्हटले जाते की लाॅरेंस याची एक गर्लफ्रेंड होती जिच्यावर तो खुप प्रेम करायचा जिची लाॅरेसच्या दुश्मनांनी हत्या केली यानंतरच लाॅरेंस गुन्हेगारी क्षेत्रात पुढे गेला असे म्हटले जाते.