एप्रिल महिन्याच्या सुरवातीला पूर्व जेरुसलेम मध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराचा विस्तार आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमधील लष्करी हल्ल्यांमध्ये झाला आहे. मोठ्या प्रमाणात जखमी व जीवितहाणीच्या बातम्या येत असून , स्थानिक पॅलेस्टाईन अरब आणि इस्रायलमधील ज्यू गटां दरम्यान सुद्धा चकमकी सुरू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायात ह्या विषयावर मतभेद असू,सध्याच्या इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढून युद्धात परावर्तीत होणायची भीती असून अश्या वेळी कुणाची बाजू घ्यावी किंवा हा संघर्ष आताच कसा थांबविता येईल ह्यावर विविध देशात विचरविनिमय सुरू आहेत
कालक्रमानुसार इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांचा हिंसाचाराचा दीर्घ इतिहास आहे पाहूया -Israel Palestine Conflict
- ख्रिस्तपूर्वी: इस्राएलचा राजा शलमोन याने यहुदी लोकांसाठी जेरूसलेममध्ये एक मंदिर बांधले. त्यांच्यासाठी ही सर्वात पवित्र स्थान राहिल आहे. जेरुसलेमवर इजिप्शियन व नंतर रोमन प्रचारकांनी आक्रमण केले व त्या मंदिरावर हल्ला केला. 70 इ.स.पू मध्ये. रोमननि जेरूसलेममध्ये पुनर्बांधणी केलेलं मंदिराचा पुन्हा नाश केला. या शतकांमध्ये ज्यू लोक मोठ्या संख्येने स्थलांतरित झाले
- 7 व शतक: इस्लामिक खलिफा सैन्याने जेरूसलेमचा ताबा घेतला. शतकानुशतके यहुदी लोकांचे स्थलांतरण सुरूच राहिले. युरोप, विशेषत: जर्मनी आणि आसपासच्या भागात यहूद्यांची सर्वाधिक लोकसंख्या होती.
- 19 व शतक: जियोनिस्ट चळवळ सुरू – यहूदी किंवा इस्राईल किंवा पॅलेस्टाईनला परत जावे म्हणून आवाहन म्हणून केली गेली.
- पहिल्या महायुद्धानंतरचा: युद्धाच्या जर्मनीतील पराभवामुळे (अॅडॉल्फ हिटलरचा उदय झाला ज्याने देशाच्या पराभवाचा दोष यहुद्यांना दिला. त्याने जर्मनीचा विस्तार केला आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या यहुद्यांचा छळ केला गेला . युद्धानंतरच्या तहात ब्रिटनला पॅलेस्टाईन आणि ट्रान्स-जॉर्डन (इस्त्राईल, वेस्ट बँक आणि गाझा समाविष्ट असलेले भाग) यांचा अधिकार देण्यात आला होता. ज्यूच इस्त्राईलला होणार स्थायिक होणायच प्रमाण वाढल.
- 2 र्या विश्वयुद्धानंतर: अमेरिका आणि ब्रिटनच्या पाठिंब्याने यहुद्यांनी इस्रायल मध्ये राज्य स्थापन केले . ज्यूं पॅलेस्टाईन करता स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरता अरबांशी करार करण्यात असफल झाल्याने ही घोषणा करण्यात आली.
- 1948: ब्रिटनचा नियंत्रण व हुकूम संपुष्टात आल्यानंतर पहिला इस्त्राईल-अरब युद्ध सुरू झाला अरब देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली, पण अमेरिकेने पाठिंबा दर्शविलेल्या, इस्त्राईलबरोबर युद्ध होवून. अंदाजे 7 लाख पॅलेस्टाईन लोकांना आपली घरे गमावून शरण जाव लागले .
- 1956: इजिप्तने सुएझ कालव्याच्या महत्त्वपूर्ण व्यापार मार्गाचे राष्ट्रीयकरण जाहीर केल्यानंतर दुसरे इस्त्राईल-अरब युद्ध सुरू झाले. इस्त्राईलने इजिप्तवर आक्रमण केले, ब्रिटन आणि फ्रान्सचा पाठिंबा मिळाला.पॅलेस्टिनींनी इस्रायलविरूद्ध संघर्ष करण्यासाठी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) संघटित केले.
- 1967: सहा दिवसांचे युद्ध झाले ज्यामध्ये इस्रायलने इजिप्त, जॉर्डन आणि सिरियाचा पराभव केला. इस्राईलने गाझा पट्टी, वेस्ट बँक, सिनाई प्रायद्वीप, गोलन हाइट्स आणि पूर्व जेरुसलेम या ताब्यात घेतले आणि तेथून नवीन हिंसाचाराची मालिका सुरू झाली व 2.50 लाखाहून अधिक पॅलेस्टाईनियन विस्थापित झाले.
- 1973: अरब राष्ट्रांनी इस्रायलवर हल्ला करण्यासाठी युतीची स्थापना केली. त्यात त्यांचे नुकसान ह्या युद्धामुळे तेलाचे प्रचंड संकट ओढवले.
- 1978: अमेरिकेने इस्राईल आणि इजिप्त दरम्यान शांतता करार केला. पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडविणे हा कॅम्प डेव्हिड एकॉर्ड म्हणून ओळखल्या जाणार्या कराराचा एक भाग होता परंतु दुर्द्वैयाने त्याची कधीच अंमलबजावणी झाली नाही.
- 1987: प्रथम पॅलेस्टाईन इंतिफादा लाँच केले गेले. इंतिफादा म्हणजे उठाव किंवा बंडखोरी. गाझा, वेस्ट बँक आणि इस्त्राईलच्या आतील भागात वर्षानुवर्षे चकमकी तनाव निषेध व संघर्ष चालू आहे. इन्फिदादरम्यान बरीच जीवित हानी आणि अनेक जखमी झाले.
- 1993: प्रथमच दोन्ही त मोठी संधि स्थापित झाली,ओस्लो पीस समझौता म्हणून ओळखल्या जाणार्या इस्त्राईल आणि पीएलओने सही केली. याला संयुक्त राष्ट्राने पाठिंबा दर्शविला.
- 1994: इस्रायल आणि पीएलओ दरम्यान कैरो करार नावाचा दूसरा करार झाला. या करारामुळे पॅलेस्टाईन प्राधिकरण तयार झाले ज्याला पश्चिम किनार व गाझा येथील प्रशासकीय कारभाराची जबाबदारी देण्यात आली होती.. इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्ही जेरुशलेमला आपली भावी राजधानी म्हणून पाहतात.
- 1995: इस्राईलचे पंतप्रधान यित्झाक रबीन यांची हत्या करण्यात आली. पॅलेस्टाईन प्राधिकरणाला दोषी ठरवले गेले.
- 2000: दुसरा पॅलेस्टाईन इंतिफाडा लाँच झाला. इस्त्रायली कट्टरपंथी एरियल शेरॉनने सध्याच्या हिंसाचाराच्या ठिकाणी मंदिर माउंट आणि अल-अक्सा या दोन्ही कंपाऊंडला भेट दिल्यानंतर संघर्ष सुरू झाला.
- 2002: पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास ने पहिल प्रमुख आत्मघातकी suicide attack हल्ला केला त्यात 30 इस्रायल नागरिकांची हत्या
- 2006: हमासने गाझामधील निवडणूक जिंकली आणि फताह पक्षाचे राजकीय आव्हान म्हणून उभा राहिला.
- 2008:पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्राईलवर रॉकेट फेकले आणि त्यास प्रतयुतर म्हणून इस्राइल ने पॅलेस्टाईनच्या भूभागात क्षेपणास्त्रांनी मार केली. 1,100 हून अधिक पॅलेस्टाईननी आपला जीव गमावला, तर 13 इस्रायली सैनिक मारले गेले.
- २०१२: इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन दरम्यान रॉकेटच्या आणखी एक फेरी. हल्ल्यात इस्राईलने हमास लष्करी प्रमुखला ठार केले.
- २०१:: हमासने पश्चिमेकडील ज्यू वस्तीतून तीन इस्रायली मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यावर सात आठवड्यांच्या चकमकीला सुरुवात झाली. २,००० हून अधिक पॅलेस्टाईननी आपला जीव गमावला. इस्त्राईलमध्ये नागरीकांच्या मृत्यूसह 73 मृत्यूची नोंद झाली आहे .
- २०१:: पुन्हा निवडणूकीची मागणी करत इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले की इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नावर कोणताही दोन राज्याचा तोडगा निघणार नाही.
- 2017: अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जेरुसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली आणि आपले दूतावास तेल अवीव येथून या शहरात हलविण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे वेस्ट बँक आणि गाझा येथे नव्याने निषेध व संघर्ष पाहायला मिळाले.
- 2021: पूर्व जेरुसलेममध्ये 12 एप्रिल रोजी इस्त्रायलीने दमास्कस गेट प्लाझा ला बॅरिकेड्स करून मोठया प्रमाणवर हालचालीस बंदी आणली . ते रमझान दरम्यान पॅलेस्टाईन लोकांसाठी एक म्हत्वच धार्मिक स्थान आहे आहे. 16 एप्रिल रोजी इस्त्राईल ने अल-Aqsa मशिदीत किती लोक नमाज करू शकतात ह्यावर मर्यादा आणल्या ह्यावरून संघर्ष ची ठिणगी पडून हिंसाचार ल सुरवात होवून गाझा आणि वेस्ट बँक पर्यंत हिंसाचार पोहचला.