उर्जेत वाढ करण्यासाठी – नऊ महत्वाच्या सवयी – Healthy Habits for a Healthy Life

आरोग्यदायी जीवन – सवयी -Healthy Habits for a Healthy Life

आपण आपल्या दैनंदिन जीवणात रोज दिवसभरात अशी काही कामे करत असतो ज्यामुळे आपल्याला थकवा येतो,मरगळ येते.सकाळी उठुन घरातील कामे आवरण्यासाठी धावपळ करणे,कामाला जाण्यासाठी उशिर होऊ नये म्हणुन लगबगीने दमोदम होईपर्यत पटापट चालत जाऊन आँफिसात पोहचणे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपली उर्जा ही कमी होत असते.

अश्या वेळी मग आपण आपली उर्जा कमी होऊ नये वं ती वाढावी म्हणुन काय करायला हवे.हेच आपण ह्या लेखातुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

धावपळीच्या जीवनात – उर्जेत वाढ करण्यासाठी आत्मसात करावयाच्या नऊ महत्वाच्या सवयी

  1. नेहमी लवकर झोपावे

  2. नेहमी व्यायाम करावा

  3. किमान १० ते १५ मिनिट एक डुलकी घ्यावी

  4. सकाळी आपल्या कामात कठोर परिश्रम तसेच मेहनत करायची.

  5. एक दिवस आधीच आपले आजचे दिवसभराचे ध्येय ठरवुन घ्यावे

  6. चांगले मित्र मिळवावे तसेच ते जोडावे

  7. चांगली पुस्तके वाचावीत

  8. आपले जीवण संरेखित करावे

१) नेहमी लवकर झोपावे:

आपण नेहमी ऐकत आलो आहे की नेहमी रात्रीचे लवकर झोपावे.याला पण एक कारण आहे आपण जर रात्री लवकर झोपलो तर आपल्याला सकाळी लवकर जाग येते त्याचबरोबर रात्री लवकर झोपल्याने आपली झोप देखील पुर्ण होत असते.ज्याचा फायदा असा होतो की आपल्याला सकाळी आपले शरीर एकदम उर्जायुक्त जाणवते.ज्यामुळे आपला चेहरा अणि मुड दोघे अगदी दिवसभर फ्रेश अणि ताजे टवटवीत राहतात.म्हणुन आपण रात्री नेहमी लवकर झोपायला हवे

See also  आंब्याचे औषधी गुणधर्म - Mango Health Benefits Marathi

२) नेहमी व्यायाम करावा:

आपले शरीर अणि स्वास्थय नेहमी निरोगी राहण्यासाठी आपण नियमित व्यायाम करायलाच हवा.कारण व्यायाम केल्याने आपले शरीर निरोगी तर राहतेच त्याचबरोबर व्यायाम केल्याने आपल्याला आपले शरीर उर्जायुक्त जाणवते.दिवसभरात प्रत्येक काम करण्यात एक वेगळीच उर्जा अणि उत्साह आपल्याला जाणवत असतो.म्हणुन आपण नेहमी व्यायाम करायला हवा.

३)किमान १० ते १५ मिनिट एक डुलकी घ्यावी:

तसे पाहता पाहायला डुलकी घेणे हे एक आळशीपणाचे लक्षण आहे.पण कधी कधी आपल्याला खुपच अभ्यास करायचा असतो किंवा विविध बाबी एकाच दिवशी शिकायच्या असतात.अशावेळी किमान १० ते १५ मिनिटांची एक छोटीशी डूलकी घेणे कधीही चांगले.ह्याने आपल्या शरीराला मेंदुला विश्रांती मिळते अणि तो पुन्हा नव्याने काम करण्यासाठी सज्ज होतो.म्हणुन आपल्याला खुपच अभ्यास एकाच वेळेला करायचा असतो किंवा विविध बाबी एकाच दिवशी शिकायच्या असतात.तेव्हा शरीराला अणि मेंदुला विश्रांती मिळण्यासाठी आपण किमान १० ते १५ मिनिट डूलकी घ्यायलाच हवी.

४) सकाळी आपल्या कामात कठोर परिश्रम तसेच मेहनत करायची:

सकाळ ही एक अशी वेळ असते की ज्या क्षणी आपल्यात सर्वात अधिक उत्साह अणि उर्जा भरलेली असते.अणि अशाच क्षणी आपण आपले काम खुप मेहनतीने अणि परिश्रमाने केले तर त्यात आपल्याला मनासारखे यश मिळत असते.कारण तेव्हा आपण त्यात आपली पुर्ण ताकद त्या कामाला करण्यामध्ये लावलेली असते.आपण आपली पुर्ण उर्जा ते काम करण्यासाठी लावलेली असते.

५)एक दिवस आधीच आपले उद्याचे दिवसभराचे ध्येय ठरवुन घ्यावे:

आपण नेहमी आपल्याला उद्या दिवसभरात काय काम करायचे आहे?कशाचा अभ्यास करायचा आहे?किती वेळ तो अभ्यास करायचा आहे?ह्या सर्व काही गोष्टीचा एक दिवस आधी आराखडा तयार करून घ्यायला हवा.याच्याने आपले दिवसभराचे ध्येय आपल्या डोळयासमोर निश्चित असल्यामुळे आपल्या कार्याला गती अणि योग्य ती दिशा प्राप्त होत असते. म्हणुन एक दिवस आधीच आपले आजचे दिवसभराचे ध्येय आपण ठरवुन घ्यायला हवे.

See also  उन्हाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या

६) चांगले मित्र मिळवावे तसेच ते जोडावे:

आपण नेहमी चांगल्या अणि अशा मित्रांची संगत धरायला हवी ज्यांच्या सान्निध्यात राहुन नेहमी आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.ज्यांच्या सोबत राहिल्याने आपल्याला नेहमी सकारात्मकता प्राप्त होते.आपल्या विचार सकारात्मक होत जातात.म्हणुनच असे देखील म्हटले जाते की जशी संगत तसे गुण.म्हणुन आपण नेहमी चांगले मित्र मिळवावे तसेच ते जोडावे.

७) चांगली पुस्तके वाचावीत:

आपल्याला नेहमी असे सांगितले जाते की आपण चांगली पुस्तके वाचावीत याला पण एक कारण आहे.पुस्तकांमुळे आपल्या जीवणाला एक नवीन आकार मिळत असतो तसेच दिशा मिळत असते.पुस्तकांमुळे आपले अनुभवविश्व अधिक समृदध होत असते.आपल्या ज्ञानात अधिक भर पडत असते.आपल्या विचार क्षमतेत अधिक वाढ होते.थोडक्यात पुस्तक वाचनामुळे आपण जुने राहत नाही तर नवीन बनत जात असतो.म्हणुन आपण नेहमी चांगली चांगली पुस्तके वाचायलाच हवीत.

८) आपले जीवण संरेखित करावे:

आपल्या जीवणाचे तीन प्रमुख भाग असतात.एक आपले आरोग्य दुसरे आपले काम अणि तिसरे म्हणजे आपले कुटुंब.या तिघांना आपण एका योग्य पदधतीने संरेखित करायला हवे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आपण स्वताला वेगळा वेळ द्यायला हवा.दुसरे आपल्या कामाला आपण विशिष्ट वेळ ठाराविक वेळ द्यायला हवा अणि आपल्या कुटुंबासाठीही एक ठाराविक वेळ द्यायला हवा.म्हणजेच थोडक्यात आपण आपले जीवण तीन टप्प्यात संरेखित करायला हवे.

निष्कर्ष:

आज आपण आपल्या उर्जेमध्ये वाढ करण्यासाठी आत्मसात करावयाचे नऊ महत्वाचे छंद कोणते अणि ते कसे अणि का आत्मसात करायचे हे आजच्या लेखातुन बघण्याचा प्रयत्न केला आहे.

तरी सदर लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यत हा शेअर करा जेणेकरुन त्यांनाही याचा लाभ उठवता येईल.

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – छंद आणि सवयी