जीवनावर प्रेरणादायी मराठी विचार -30 Life Quotes


जीवन हे खूप सुंदर आहे

जीवन खुप सुंदर आहे, त्याला सुदंर बनवणे आपल्या हातात आहे, जसे कुंभार मडकी घडवतो तसे आपण आपल्या पालकांकडून, गुरूजनांकडून घडत आसतो, ति घडण्याची वय ही ठरावीक आहे, जे काम त्याच वेळेत पूर्ण केल तरच तो मनुष्य आयुष्यात खुप पुढे जातो, यश संपादन करणेम्हणजे नेमक काय? तर, स्वतःला कर्मात झोकावून घेण, मग कर्म कोणते?, एखाद्या विशिष्ट संदर्भ घेवून आपण यशाकडे पाऊलवाट करत आसतो, या प्रवासात नक्कीच आपणांस कठीण व कठोर अडथळ्यांना सामोरे जावे लागते, या येणार्या अडथळ्यांवर मात करणे म्हणजेच कर्म.

मित्रांनो भारत देश हा तारूण्यांने भरलेला देश आहे, या देशांत तरुणांची संख्या अधिक आहे, तर आपल्या देशाला व आपल्या संस्कृतीला आणी आपल्या अस्तित्वाला जर ठिकवायच आसेल तर सर्व प्रथम या तारूण्य बयोगटातून करणार्या प्रवासाकडे लक्षपूर्वक दुष्टीक्षेप करावा लागतो, तारूण्य म्हणजे यशाचे दोन मार्ग, याच वयात आपल्या जिवनाची जिवनशैली बदलते, आपल्या आवडी निवडीकडूनआपल ध्येय आपल्या समोर असते, मित्र परिवारांचा संगत याच वयात वाढीस येते, या संगतीनेच माणूस घडतो, संत तुकाराम म्हणतात.

“द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कावूळ झाला संगती गुणे.. !”

रसाळ गोड आसलेला द्राक्ष जरी लिंबाच्या सहवासात आल्यास द्राक्षास कडू पाडण्याची ताकद त्या लिंबा मध्ये आहे, म्हणूनच संगतीचा महत्व आपल्या राहणीमाणात जास्तिचा आहे, म्हणूनच मित्रांनो या वयात आपणांस चांगल्या मार्गदर्शनाची व मार्गदर्शकांची गरज आहे, याच तारूण्यात अनमोल विचारांची गोडी लावणार्या मित्र परिवरांची गरज आहे, परंतु आज आपण पाहतो आहोत, मित्र परिवारांच्या संगतीत हा तारूण्य व्यसनाधिनतेला कवटाळत आहे, व्यसन हा आपल्या जिवनातल्या ताण तणावांचा एक मुलमंत्र बनला आहे, तसेच संगतीचे फळ आपणांस चाखायला मिळत आहेत.

 मित्रांनो हे वयच आडनिड असल्याने या वयात आपणांस अनेक मार्ग दिसतात, एखादी चमकणारी चकाकणारी वस्तू दिसते, तो उचलण्याचा, त्याला संपादन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो काच आसतो, हाताला जखम करून सोडते व त्या जखमेपासून नानाप्रकारच्या रोगांना अमत्रित करतो, व कधि आपल अयुष्य उध्वस्त होते हेच समजेनासे नाही, तारूण्यात सर्वात जलद अकर्शीत होणारी गोष्ट म्हणजे प्रेम.

See also  शिवम दुबे यांच्या विषयी जाणून घ्यायची 7 महत्वाची तथ्ये 7 important facts about Shivam Dubey in Marathi

मित्रांनो प्रेम नक्कीच करावे, आवडी निवडीचा भाग वेगळा, प्रेम करतो म्हणजे नेमक काय?, तर आपल्या अयुष्याची साथीदार आपण निवडत आसतो, हे खर प्रेम, हल्ली प्रेम हे एकप्रकारची टाईमपास झाला आहे, प्रेमाची व्याख्या म्हणजेच टाईमपास हि एक मनोवृत्ती या समाजात पसरली आहे, आणी हाच तो टाईमपास आपल्या जीवनात सर्वात मोठा धोका पत्करण्यास भाग पाडतो आहे, मित्र परिवारांच्या संगतीमुळे अनेक वाईट परिणाम आपल्यावर होत आसतात, एखादा व्यक्ती ही प्रेमा सारख्या वा अन्य कुठल्या तणावांनी व्यसनाधीनतेचा मार्ग स्विकारतो, तो स्विकार स्वता:पासून नसून कुठल्यातरी संगतीचा परिणाम आसतो, संत कबिर म्हणायचे.

“संगत करे बडे की तो, बडत बडत बड जाऐ,

संगत करे गद्धेकी तो,दो दो लाथा खा जाऐ.

संगत जर सजण्णांची , मोठ्या व्यक्तीमत्वांची व मोठया विचारांची केली तर, आपल्याही विचारधारेत, व्यक्तीमत्वात बदल होतो, कबिर म्हणतात मोठ्या व्यक्तींची संगत केल्यास मोठे व्हाल, गाढवांची संगत केल्यास दोनदोन लाथा खाल, म्हणूनच म्हणतात, “दुर्जन मंठळीत बसण्यापेक्षा, संजन्न मंडळीत बसणे बरे”.

तरुणांच्या हातात देश्याचे भवितव्य आहे, हाच तो तरूण उद्याचा देश घडवणारी व्यक्तीमत्व, या तरूणांनाभगतसिंहांचे नेतृत्व पाहीजे, या तरूणांना महापुरूषांच्या विचारांची गरज आहे, देश प्रेमेची गरज आहे, हा तरूण हल्ली अन्य क्षेत्रात, “दांडा आमचा, झेंडा तुम्हचा “म्हणत राजकीय नेत्यांच्या चपला सांभाळत निघाले आहेत, नेत्यांच्या नामघोषीत करत, त्यांच्या सावलीत कुत्र्यांच जिवन जगत आहेत,

मित्रांनो राजकारणात नक्कीच प्रवेश करा ते आपल्या हक्काच व्यासपीठ आहे, प्रत्येक युवकांनी आज राजकारणांत उतरणे गरजेचं आहे, परंतु विचार करा एखाद्या मोठया झाडाखाली छोटे झाड वाढत नाहित, त्याकरीता स्वभळावर, आपल अस्तित्व निर्माण करण्यासाठी नवे बिजे पेरण्याची उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.

ह्या व्यतितिरिक्त खुप काही जीवनात सुखकर गोष्टी आहेत, ते आपणांस अनुभवायच आहे, हे हिरवी शाल पत्करून सौंदर्याची खाण साजूनी, सुजवूनी आपणांस हस्तक्षेप करतोय, त्या सौदर्याच्या खाणीत आपल जीवन अनंदिमय करायच आहे, जिवनात अनमोल विचारांना अमत्रिती करून, दुर्जन गोष्टींचा नाश करा,कोणाची निंदा करण्याऐवजी, मदतीचा हात समोर करा, या निसर्गाने आपल्याला दोन हाते दिलेत, त्यात मावेल तेव्हढेच घ्यायच, खाली पाडून माती होण्या अधी ते इतरांना वाटा, बघा त्यात काय सुख असते, महाविर गौतम बौद्ध म्हणतात, अहिंसेला हिंसक प्रवृतीने मारण्यापेक्षा, शांततेने वार कण तिथे यश नक्कीच आपल आहे, कुठल्याही कारणांच्या, युद्धांच्या समस्येला, युद्ध हे कोणत्याही समस्येच समाधान नाही, तर युद्धांनी दुसर्या युद्धांची बिजे पेरली जातात, म्हणून मानवी जीवनात असंख्य संकट येत आसतात त्या संकटांना शांततेने सोडवले तरच ते प्रश्न सुटतात.

See also  टेलिमार्केटिंग कंपन्यांना आळा घालण्यासाठी ट्रायने केला नवीन नियम जारी  - TRAI cracks down on unauthorized telemarketers

आजच्या तरूण पिढ्यांना या विचारांची गरज आहे, स्वत:च्या हातावरील नागमोडी रेषांवर किंवा कपाळावर आपल भाग्य कोरलेले नसते तर त्या आपल्या हाताने केलेल्या कर्मावार व कपाळी आलेल्या कष्टाच्या घामावर आपल भविष्य उमठून दिसते, कवयित्री बहिनाबाई चौधरी आपल्या ओळीत मांडते,

नको नको रं जोतिष्या, माझा हात नको पाहू,

माझ दैव मला कळे,माझ्या दारी नको येवू.

माझ्या हातवर माझ दैव नसून माझ्या कष्टावर माझ्या जीवनातल फळ मला चाखायला मिळणार आहे,म्हणून मित्रांनो जीवन खुप सुंदर आहे, त्यास सुंदर बनवणे आपल्या हातात आहे; ते कुठल्या हाताच्या रेषेवर नाही, साहित्यरत्न आण्णा भाऊ साठेंनीही सांगून गेले, पृथ्वी ही कुठल्याच शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून कष्टकर्यांच्या तळहातवर उभी आहे, म्हणून मित्रांनो जिवनात असंख्य वाईट गोष्टी येत आसतात त्यास त्याग करत, पुढे सरसावणे म्हणजेच आपल्या अस्तित्वाची लढाई आहे.

सदरील लेख हा लेखक श्रीपाद नागनाथ राऊतवाड  ह्यांच्या माणुसकी ह्या पुस्तकातील असून .संपूर्ण पुस्तक वाचण्याकरता खालील लिंक वर क्लिक कारवे.

ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने  हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.

पुस्तकांची पर्वणी अश्या http://www.esahity.com ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा

Humidity Sensor With Display

1 thought on “जीवनावर प्रेरणादायी मराठी विचार -30 Life Quotes”

Comments are closed.