Maharashtra Arthsankalp 2023
महाराष्ट्र बजेट २०२३ मध्ये फडणवीस यांनी केलेल्या एकुण २० महत्वाच्या घोषणा
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री यांनी महाराष्ट्र राज्याचा २०२३-२०२४ मधील अर्थसंकल्प आज ९ मार्च रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केला आहे.
अर्थमंत्री म्हणून केलेल्या आपल्या भाषणातुन देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला आहे या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी एकुण २०अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
चला तर मग जाणुन घेऊया महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला पाॅवरबॅक अर्थसंकल्प अणि त्यात त्यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा काय आहेत.
सन्मान आपल्या युगपुरुष चा अंतर्गत श्री शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक निम्मित 350 कोटी रुपयांची तरतूद. आंबेगाव इथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान
पंचामृतावर आधारित महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24
- शाश्वत शेती समृद्ध शेती
- महिला आदिवासी मागासवर्ग सर्व समाजघटकांचा समावेश
- भरीव भांडवली गुंतवणूक – पायाभूत विकास
- रोजगार निर्मिती
- पर्यावरण पूरक विकास
- एनडीए सरकार कडुन शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जाणार आहे.यात त्यांना 1.15 कोटींचा फायदा होणार आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेचा व्यापक विस्तार
- शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ – 2107 मधील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत उर्वरित शेतकऱ्यांना लाभ
- काजू बोंड वर प्रक्रिया उद्योग – काजू फळ विकास योजना
- महाराष्ट्र राज्यत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सरसकट 50% इतकी सुट सवलत दिली जाणार .
- मोदी आवास योजनेंतर्गत पुढील 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
- मोफत उपचार देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 700 बाळासाहेब ठाकरे दवाखाने उभारण्यात येणार आहेत.
- आशा वर्कर्सच्या पगारात ₹1,500 ने वाढ केली गेली आहे.
- मुलींसाठी लाडकी योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिच्या पालकांना तिच्या जन्मानंतर पैसे दिले जाणार आहे जन्मानंतर: ₹5,000.पहिली इयत्ता मध्ये असताना: ₹४०००. 6वी इयत्तेत असताना ₹6,000.11वी इयत्तेत असताना : ₹8,000अणि तिच्या 18 व्या वाढदिवशी तिला ₹75,000. रूपये दिले जाणार आहे.
- धनगर समाजाच्या कल्याणासाठी ₹1,000 कोटी निधी देण्यात येणार आहे.अणि महामंडळाकडुन १० हजार कोटी रूपये इतके बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- केशर कार्डधारकांना ₹1,800 रुपये दिले जाणार आहे.
- लिंगायत सारख्या लहान समुदायांच्या उत्थानासाठी महामंडळे आणि मंडळाची स्थापना केली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ₹291 कोटी.
- नागपुरात 1,000 एकर जागेवर लॉजिस्टिक हब उभारण्यात येईल असा।शासनाचा मानस आहे.
- नाशिक, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि एमएमआर येथे इकॉनॉमी पार्क उभारले जाणार आहे.
- अध्यापन कर्मचार्यांच्या पगारात ₹10,000 ते ₹11,000 इतकी वाढ केली जाणार आहे.सर्व 3 श्रेणींसाठी ही वाढ जवळपास 160% ते 120% आहे.
- शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे वर्ग 5 वी ते 7 वी- ₹ 1,000 वरून ₹ 5,000 इयत्ता 8 वी ते 10वी – ₹ 5,000 वरून ₹7,500 इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- बिरसा मुंडा कनेक्टिव्हिटी कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात रस्ते बांधणीसाठी ₹4,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- 20,000 अंगणवाडी सेविकांची भरती केली जाईल.
- 100 अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या पीएचडी अभ्यासासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- महिलांना ₹25,000 पर्यंत दरमहा व्यावसायिक कर लागनार नाहीये.पूर्वीची मर्यादा ₹10,000 इतकी होती.
- 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिला जाणार आहे. 5 लाख इतके जोतीराव फुले वैद्यकीय विमा संरक्षण.याआधी या योजनेत फक्त 2.5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जात होते.
- शासन 5,150 इतक्या इलेक्ट्रिक बसची खरेदी करणार आहे.
- उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती दुप्पट करून ₹50,000 केली जाणार आहे.
- मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1721 कोटींची तरतूद केली जाणार आहे.
- तसेच मुंबई,नाशिक,नागपूर इत्यादी मेट्रो हया प्रकल्पांसाठी ₹31,000 कोटींची तरतूद केली जाणार आहे.
- नोकरदार महिलांसाठी 50 न्यूज हॉस्टेल सुरू केले जाणार आहे.
हिंदु ग्रोथ रेट म्हणजे काय? | Hindu Growth Rate Meaning In Marathi