राष्ट्रीय नागरी सेवा दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?-National Civil service day

राष्ट्रीय नागरी सेवा दिवस -National Civil service day

दरवर्षी २१ एप्रिल रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिवस हा आपल्या भारत देशात साजरा केला जात असतो.

प्रशासकीय सेवेत स्वताला समर्पित केलेल्या जनतेच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो.

National Civil service day
राष्ट्रीय नागरी सेवा दिवस -National Civil service day

२१ एप्रिल १९४७ रोजी भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्ली येथील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या प्रथम गटास संबोधित केले होते.

म्हणजे ह्याच दिवशी आॅल इंडिया सर्विसेसचे उद्घाटन केले गेले होते.

यानंतर ह्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जाईल असे २००६ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात घोषित करण्यात आले होते.

ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा मराठीत

तेव्हापासुन दरवर्षी २१ एप्रिल रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिवस हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

आपल्या भारत देशाच्या विकासासाठी संरक्षणासाठी आपले महत्वाचे योगदान देणाऱ्या प्रशासकीय सेवा बजावणारया प्रशासकीय अधिकारींचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

२१ एप्रिल ह्याच दिवशी सार्वजनिक प्रशासनातील उत्तम कामगिरी बजावण्यासाठी प्रशासकीय अधिकारींना नागरी सेवकांना देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते पंतप्रधान पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात येते.

नागरी सेवकांच्या कार्याची प्रशंसा कौतुक गौरव करण्यासाठी हा सन्मान त्यांना दिला जातो.

भारतीय नागरी सेवचे एकुण दोन प्रमुख प्रकार पडतात –

1)आखिल भारतीय सेवा -all India services

2) केंद्रीय सेवा -central services

1)आखिल भारतीय सेवा -all India services-

अखिल भारतीय सेवेचे तीन प्रकार आहेत –

1)भारतीय प्रशासकीय सेवा -indian administrative services यालाच संक्षिप्त मध्ये आय ए एस असे देखील म्हटले जाते.

2) भारतीय पोलिस सेवा -indian police services
यालाच संक्षिप्त मध्ये आयपीएस असे देखील म्हटले जाते.

राष्ट्रीय पंचायत राज दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व इतिहास काय आहे?

3) भारतीय वन सेवा -indian forest service

यालाच संक्षिप्त मध्ये आय एफ एस असे देखील म्हटले जाते.

2)केंद्रीय सेवा -central services

केंद्रीय सेवेमध्ये एकुण सतरा सेवांचा समावेश होतो हया सेवा दोन गटांत गट अ गट ब मध्ये विभागल्या जातात.

वरील सर्व राष्ट्रीय लोकसेवा अधिकारी पदावर भरती होण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या मार्फत परीक्षा घेतली जात असते.हया परीक्षेची दरवर्षी लाखो उमेदवार तयारी करत असतात.

लेखी परीक्षा मुलाखतीत उमेदवारांची अंतिम निवड झाल्यानंतर त्याला वरील अधिकारी पदासाठी नियुक्त केले जाते.