राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी प्राप्त होतो आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्याचे फायदे कोणते ? – National Party status

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी प्राप्त होतो आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्याचे फायदे कोणते असतात?

नुकतीच एक बातमी आपण वाचली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणुक आयोगाकडुन काढुन घेण्यात आला आहे.

अशा वेळी आपल्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की

काॅग्रेस पक्षाकडुन राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणुक आयोगाकडुन का काढुन घेण्यात आला.राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी अणि केव्हा दिला जातो?सध्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणाला दिला गेला आहे?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी पक्षाला काय करावे लागते?

ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षाला काही निकष असतात जे पुर्ण करणे आवश्यक असते.

आम्ही तुम्हाला खाली काही निकष सांगत आहोत यापैकी एकही निकष पुर्ण केला तर पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होऊ शकतो.

१) ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षास किमान ४ राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा प्राप्त करणे आवश्यक आहे.

२)ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षास लोकसभेच्या निवडणुकी मध्ये किमान चार सीट मिळणे आवश्यक आहे.

३) ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षास विधानसभा,लोकसभा निवडणुकीमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी किमान सहा टक्के मत मिळणे आवश्यक आहे.

४) ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षास लोकसभेच्या निवडणुकी मध्ये एकुण जागांपैकी किमान दोन जागा तरी मिळवणे आवश्यक आहे.अणि ह्या सर्व जागा त्या पक्षाला किमान तीन राज्यांतुन निवडुन येऊन प्राप्त होणे गरजेचे आहे.

See also  चालू घडामोडी १३ मे current affairs in Marathi

वरीलपैकी एकही निकष पुर्ण होत नसल्यास निवडणूक पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द देखील केला जाऊ शकतो.

भारतात सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत?

भारतात सध्या सहा राष्ट्रीय पक्ष आहेत ज्यात आम आदमी पक्षाला देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

भारतात सध्या आम आदमी पार्टी,भाजप,बहुजन समाज पक्ष,नॅशनल पीपल्स पार्टी,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया इत्यादी पक्षांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे.

याधी काँग्रेस पक्षाला देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होता पण आता हा दर्जा काढुन घेण्यात आला आहे.याबाबत नोटीस देखील निवडणूक आयोगाने पक्षाला पाठवली असल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा कायम राहील अशी आशा काॅग्रेस पक्षाकडून केली जात होती पण अखेरीस काॅग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय दर्जा काढुन घेण्यात आला आहे.आता काॅग्रेस कडे फक्त प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणार असे सांगितले जात आहे.

याचसोबत तृणमूल,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय दर्जा देखील रद्द करण्यात आला आहे

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचे फायदे कोणते असतात?

ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे अशा पक्षास निवडणुक आयोगाकडुन एक राखीव निवडणुक चिन्ह दिले जात असते.

ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे अशा पक्षाला निवडणूक आयोग हे फ्री मध्ये निवडणुक याद्या वाटत असते.

ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे अशा पक्षाच्या आॅफिससाठी सबसिडिजीड अनुदानित दरामध्ये जमीन दिली जात असते.याचसोबत दुरदर्शन तसेच आॅल इंडिया रेडिओ वर ह्या पक्षाचे फ्री मध्ये प्रक्षेपण देखील केले जात असते.

प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा प्राप्त करण्यासाठी पक्षाला काय करावे लागेल?

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करण्यासाठी पुढील निकष पुर्ण करावे लागतात-

  1. ज्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षाला विधानसभा निवडणुकीत वैध मतांपैकी किमान ६ टक्के मत प्राप्त होते आवश्यक आहे.अणि विधानसभा निवडणुकीत एकुण सीटपैकी दोन सीट मिळणे आवश्यक आहे.
  2. ज्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षाला लोकसभेच्या निवडणुकी मध्ये राज्यामधील २५ जागांपैकी किमान एक जागा प्राप्त होणे आवश्यक आहे.
  3. ज्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये एकुण सीटपैकी कमाल तीन तसेच किमान दोन सीट मिळणे आवश्यक आहे.
  4. ज्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा प्राप्त करायचा आहे अशा पक्षाला विधानसभा निवडणुकीत वैध मतांपैकी किमान आठ टक्के मते प्राप्त करणे आवश्यक आहे.
See also  चालु घडामोडी मराठी 7 मे २०२३- Current Affairs in Marathi