नीट पीजी २०२३ परीक्षेचा निकाल घोषित – NEET PG 2023 result in Marathi

नीट पीजी २०२३ परीक्षेचा निकाल घोषित – NEET PG 2023 result in Marathi

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करीता एमडी/एम एस/ डीएनबी इत्यादींच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त करण्यासाठी घेतल्या गेलेल्या नीट पीजी २०२३ या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.

National board of exam in medical science म्हणजेच एनबी ईएम एस कडुन हा नीट पीजी २०२३ परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे.

सदर नीट पीजी २०२३ परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विभागाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे्.

NEET PG 2023 result in Marathi

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या आॅफिशिअल टविटर अकाऊंट वरून हा निकाल जाहीर झाल्याचे सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे.

मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून नीट पीजी २०२३ परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असल्याचे कळवले तसेच ज्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यास यश प्राप्त झाले आहे त्यांचे अभिनंदन देखील मांडविया यांनी केले आहे.

तसेच एनबी ईएम एसकडुन नीट पीजी २०२३ परीक्षेचे जे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले त्याबाबत एनबी ईएम एसचे तोंडभरून कौतुक देखील मांडविया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून टविट करून केले आहे.

एन बी ईएम एस कडुन आयोजित करण्यात आलेल्या नीट पीजी २०२३ परीक्षेसाठी लाखोंच्या संख्येत विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी केली होती.हया परीक्षेसाठी एकूण २.९ लाख इतक्या विद्यार्थ्यानी रेजिस्ट्रेशन केले होते.

सदर परीक्षा मार्च २०२३ मध्ये ५ तारखेला यशस्वीपणे पार पडली होती.

जुनी पेंशन योजना अणि नवीन पेंशन योजना मध्ये नेमका काय फरक आहे?

निकाल कुठे अणि कसा बघायचा?

नीट पीजी २०२३ परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना एनबी ईएम एस च्या खालील दोन आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे.

See also  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देण्यात आला सुरीनाम देशातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार _Suriname's highest distinction, "Grand Order of the Chain of the Yellow Star

natboard.edu.in तसेच nbe.edu.in ह्या दोन वेबसाईटवर जाऊन उमेदवारांना आपल्या नीट पीजी २०२३ परीक्षेचा रिझल्ट बघता येणार आहे.

जे विद्यार्थी नीट पीजी २०२३ परीक्षेमध्ये पास झाले आहेत त्यांना आपल्या निकालाची प्रत २५ मार्च २०२३ हया तारखेपासून वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड करता येईल.

एन बी ईएम एसचा फुलफाॅम काय होतो? NBEMS Full form in Marathi

एन बी ईएम एसचा फुलफाॅम national board of examination in medical science असा होतो.

NBEMS म्हणजे काय?

एन बी ईएम एस म्हणजे वैद्यकीय विज्ञानातील राष्ट्रीय परीक्षा मंडळ.

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि परीक्षांचे प्रमाणीकरण करण्यासाठी दिल्ली सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत एक सोसायटी म्हणून 1975 मध्ये नवी दिल्ली भारतामध्ये हिची स्थापना करण्यात आली आहे.