प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?pm vishwakarma scheme information in Marathi

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?pm vishwakarma scheme information in Marathi

नुकतेच सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आहे.हया योजनेचे पुर्ण नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना असे आहे.

शासनाच्या ह्या योजनेमुळे छोटे व्यापारी उद्योजक यांना आपल्या उद्योग व्यवसायात वाढ करता येईल तसेच आपल्या आर्थिक स्थिती मध्ये देखील सुधारणा करता येईल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी भारत सरकारच्या वतीने १३ हजार कोटी रुपये इतका निधी ह्या योजनेच्या खर्चासाठी मदत म्हणून दिला जाणार आहे.

शासनाच्या ह्या योजनेमुळे तब्बल ३० लाख पारंपारिक कारागिरांना लाभ प्राप्त होणार आहे.

शासनाच्या हया योजनेचा लाभ मुख्यत्वे लोहार, कुंभार,चांभार,धोबी,गवंडी,माळी,मिस्त्री,विणकर,मुर्तीकार, शिल्पकार इत्यादी कौशल्य आधारित काम करत असलेल्या कारागिरांना होईल.

भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत असलेला यांचा वाटा बघता शासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

ह्या योजनेअंतर्गत ज्या कामात कौशल्याची आवश्यकता भासत असते असे काम करत असलेल्या कारागिरांना स्वस्त व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ह्या योजनेअंतर्गत कौशल्य आधारित कारागिरांना पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये इतके कर्ज पाच टक्के

व्याजदराने दिले जाईल.

यानंतर दुसरया टप्प्यात पात्र कारागिरांना २ लाखापर्यंतचे कर्ज सवलतीच्या स्वरूपात दिले जाईल.याचसोबत सर्व कौशल्य कारागिरांना पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट तसेच आयडेंटिटी कार्ड देखील दिले जाणार आहे.

ह्या योजनेचा मुख्य हेतु कौशल्य आधारित काम करत असलेल्या कारागिरांना काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

ह्या योजनेस १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुरूवात करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना आधुनिक स्वरूपाची उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक १५ हजार रुपये इतकी मदत देखील शासन करणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिर तसेच शिल्पकार यांच्यासाठी बेसिक अणि अॅडव्हान्सड अशा दोन प्रकारच्या कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील.

शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणारा हा कोर्स करण्यासाठी कौशल्य आधारित कारागिरांना रोज पाचशे रुपये रोज इतका स्टायपॅड देखील देण्यात येणार आहे.

See also  Top 10 Toughest Exams in India - सर्वात कठीण 10 परीक्षा भारतात कोणत्या आहेत ?

म्हणजेच कुशल तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासोबत कारागिरांना विद्यावेतन देखील प्राप्त होणार आहे.

1 thought on “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?pm vishwakarma scheme information in Marathi”

Leave a Comment