ओबीसीचा फुलफाॅम काय होतो?OBC full form in Marathi

ओबीसीचा फुलफाॅम काय होतो?OBC full form in Marathi

ओबीसीचा फुलफाॅम other backward class असा होतो.ओबीसीलाच मराठी मध्ये इतर मागास वर्ग असे म्हणतात.

ओबीसी म्हणजे काय?

आपल्या भारत देशात विविध जातीपातीचे लोक वास्तव्यास आहेत.ओबीसी हा सुद्धा भारतातील एक मागास प्रवर्ग तसेच जात आहे.

ओबीसी मध्ये एकच नव्हे तर यात अनेक प्रकारच्या मागासवर्गीय जातींचा समावेश होताना आपणास दिसून येतो.ओबीसीला आपण शैक्षणिक अणि सामाजिक दृष्टीने थोडा मागासलेला समाज असे म्हणुन देखील ओळखतो.

एससी एसटी कॅटॅगरी मधील लोक अधिक मागासलेले असल्याने त्यांना ओबीसी पेक्षा वेगळ्या सोयी सुविधा सवलती प्रदान केल्या जातात.

आपल्या भारताच्या संविधानात देखील ओबीसी समाज एक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग असा आहे असा उल्लेख केला गेला आहे.

ओबीसी समाजाला शैक्षणिक क्षेत्रात अणि नोकरी मध्ये केंद्रात २७ टक्के इतके आरक्षण देण्यात आले आहे.अणि राज्यात १९ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

ओबीसीचा फुलफाॅम काय होतोOBC full form in Marathi
ओबीसीचा फुलफाॅम काय होतोOBC full form in Marathi

मंडल आयोगाच्या मते,महाराष्ट्र राज्यात एकूण ३६० ओबीसी जाती आहेत.अणि संपुर्ण भारतात हीच संख्या ३ हजार ७७४ इतकी आहे.

१९७९ मध्ये मंडल आयोगाच्या वतीने एक शिफारस करण्यात आली होती ज्यात दिले होते की ओबीसी कॅटॅगरी मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना समाविष्ट करण्यात आले आहे.

मंडल आयोगाने ओबीसी प्रवर्गास नोकरी मध्ये आरक्षणाचा लाभ व्हीपी सिंग सरकारच्या शिफारशीनुसार दिला होता.

जेव्हा शासनाकडुन एखाद्या सवलतीची योजनेची घोषणा करण्यात येत असते तेव्हा ती एका विशिष्ट जातीला नव्हे तर संपूर्ण ओबीसी प्रवर्गाला लागु केली जात असते.

ओबीसी मध्ये कोणकोणत्या जातींचा समावेश होतो?

  • ओबीसी मध्ये साळी,माळी,शिंपी,लोहार,घडवीत,तांबट,मोमीन,तांडेल,सोनार,कोळी,तेली,आगरी,कुंभार,बंजारा
  • भावसार,नाभिक,परीट,कुणबी,गवळी,गुरव,कोष्टी,वाणी,फुलारी,पांचाळ,जंगम,धनगर,सुतार, कासार,भंडारी,रंगारी,विणकर इत्यादी जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश होतो.
  • याव्यतिरिक्त मुस्लिम समाजातील ३७ पोटजाती देखील ह्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
See also  गोल्डन सिटी गेट पर्यटन पुरस्कार २०२३ विषयी माहिती | Golden City Gate Tourism Award 2023 in Marathi

ओबीसी समाजाला ओबीसी प्रवर्गातील घटकांना दिले जाणारे लाभ –

ओबीसी प्रवर्गातील घटकांना नोकरी मध्ये जवळपास २७ टक्के इतके आरक्षण दिले आहे.

याचसोबत ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना सरकारी नोकरी मध्ये वयाच्या बाबतीत देखील सुट सवलत प्रदान करण्यात येत असते.

ओबीसी कॅटॅगरी मधील विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा खर्च स्वता करता यावा म्हणून शिक्षणासाठी ओबीसी स्काॅलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती देखील दिली जाते.