Firewall म्हणजे काय?

Firewall म्हणजे काय?

फायरवॉल ही एक संगणक सुरक्षा प्रणाली आहे.जे कुठल्याही अनधिकृत साॅफ्टवेअर तसेच फाईल्सला आपल्या परवानगी शिवाय प्रवेश करू देत नाही.

फायरवॉल हे आपल्या कंप्यूटर सिस्टम मधील इंटरनल नेटवर्कला व्हायरस स्पायवेअर मालवेअर इत्यादी पासुन प्रोटेक्ट करण्याचे काम करते.

जेव्हा आपण आपल्या कंप्यूटर लॅपटॉप दवारे इंटरनेटचा वापर करत असतो.

जेव्हा आपण एखाद्या अनधिकृत वेबसाईट वरील टेक्स्ट व्हिडिओ कंटेट बघता असतो तेव्हा त्या वेबसाइट वरील व्हिडिओ तसेच एखादे साॅफ्टवेअर अॅप्लीकेशन वगैरे आपल्या कंप्यूटर मध्ये आपोआप डाऊनलोड केले जात असते

याला आळा घालण्याचे काम फायरवॉल करत असते.जेव्हा आपण आपल्या कंप्यूटर वरून एखाद्या अनधिकृत वेबसाईटला भेट देत असतो.

तेव्हा त्यातील जेवढेही व्हायरस, स्पाय व्हेअर, मालवेअर आपल्या कंप्यूटर मध्ये प्रवेश करत असतात अशा व्हायरस स्पायवेअर मालवेअरला साॅफ्टवेअरला आपल्या कंप्यूटर मध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचे काम कंप्यूटर मधील फायरवॉल करत असते.

Firewall म्हणजे काय
Firewall म्हणजे काय

थोडक्यात फायरवॉल ही हॅकर्स अणि आपले सिस्टम यामधील एक मजबुत भिंत असते जिच्यामुळे कुठलाही व्हायरस मालवेअर स्पायवेअर आपल्या कंप्यूटर मध्ये आपल्या परवानगी शिवाय प्रवेश करत नाही.

हे फायरवॉल हे सुनिश्चित करण्याचे काम करते की आपल्या कंप्यूटर सिस्टम मध्ये आपल्या नकळत कुठलेही अॅप्लीकेशन फाईल साॅफ्टवेअर आपल्या परवानगी विना डाऊनलोड होऊ नये.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर फायरवॉल हे साॅफ्टवेअर आहे जे आपल्या कंप्यूटर मध्ये प्रवेश करत असलेल्या सर्व फाईल्स डाॅक्युमेंट फोटो व्हिडिओ अॅप्लीकेशन वगैरेला चेक करत असते.

त्यात सिस्टमला खराब करेल हानी पोहोचवेल असा एखादा कुठला व्हायरस मालवेअर स्पायवेअर तर इंस्टाॅल करण्यात आलेला नाहीये ना याची खात्री करत असते.

मग कुठल्याही फाईल्स डाॅक्युमेंट फोटो व्हिडिओ अॅप्लीकेशनला आपल्या कंप्यूटर सिस्टम मध्ये प्रवेश करू देत असते.

See also  इंटरनेट अणि मानवी जीवन - इंटरनेट म्हणजे काय ?

फायरवॉलचे प्रकार किती अणि कोणकोणते आहेत?

१) हार्ड वेअर वर आधारित फायरवॉल –

२) साॅफ्टवेअर वर आधारित फायरवॉल –

हार्ड वेअर वर आधारित फायरवॉल हे सर्व नवनवीन राऊटर मध्ये आपणास पाहावयास मिळतात.हार्डवेअर फायरवॉल एका कंप्यूटर मधून दुसरया कंप्यूटर मध्ये कुठलेही व्हायरस प्रवेश करू देत नाही.

अणि साॅफ्टवेअर आधारित फायरवॉल हे आपल्या सिस्टम मध्ये कुठल्याही अनधिकृत साॅफ्टवेअर अॅप्लीकेशनला आपल्या परवानगी विना डाऊनलोड होऊ देत नाही.

फायरवॉलचे महत्व काय आहे?

फायरवॉल हे आपल्या सिस्टम मध्ये प्रवेश डेटाला डिलीट तसेच करप्ट करेल असे कुठलेही मालवेअर, स्पायवेअर प्रवेश करू देत नाही.