प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना २०२२ विषयी माहीती – PMEGP Loan Scheme 2022 Information In Marathi

Table of Contents

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना- PMEGP Loan

पीएम इजीपीचा फुलफाँर्म काय होतो? PMEGP Full Form In Marathi

पीएम इजीपीचा फुलफाँर्म -Prime Minister Employment Generation Programme असा होतो.

पीएम इजीपी काय आहे?

पीएम इजीपी ही एक केंद्र सरकार कडुन सुरू करण्यात आलेली योजना आहे.भारत देशातील जेवढेही तरूण बेरोजगार आहेत त्यांना ह्या योजनेअंतर्गत १० लाख ते २५ लाख इतके कर्ज दिले जाते.

केंद्र सरकारने पीएम इजीपी ही योजना का सुरू केली आहे?

केंद्र सरकारचे यामागचे उददिष्ट काय आहे?

आपल्या भारत देशातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना स्वताचा रोजगार प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकार कडुन ही योजना सुरू करण्यात आली आहे.

देशातील सर्व बेरोजगार तरूणांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज प्राप्त करून देणे जेणेकरून त्यांना स्वताचा रोजगार प्राप्त होईल.स्वताचे हक्काचे कमाईचे साधन उपलब्ध होटल.

पीएम इजीपी कर्ज योजनेचा लाभ कोण  घेऊ शकणार आहे?

पीएम इजीपी ह्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या कर्ज योजनेचा लाभ सर्व कँटँगरीमधील एससी,एसटी, ओबीसी दिव्यांग,महिला,माजी सैनिक अल्पसंख्यांक,डोंगरी क्षेत्रात राहणारे लोक इत्यादी घेऊ शकणार आहेत.

See also  १२ वी आयटीया उत्तीर्ण उमेदवारांची भरती- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये सुरू- NPCIL RECRUITMENT 2023 IN MARATHI

ग्रामीण अणि शहरी दोघे भागातील बेरोजगार तरूण आपला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी घेऊ शकणार आहे.

हे कर्ज अशाच तरूणांना दिले जाईल ज्यांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे.

पीएम इजीपी कर्ज योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

● पीएम इजीपी ह्या कर्ज योजनामुळे देशातील सर्व बेरोजगार तरूणांना स्वताचा उद्योग व्यवसाय सूरू करण्यासाठी केंद्र सरकार कडुन कर्ज प्राप्त होणार आहे.ह्या कर्जाची रक्कम किमान दहा लाख कमाल पंचवीस लाख इतकी असणार आहे.

● पीएम इजीपी कर्ज योजना अंतर्गत प्रत्येक बेरोजगार तरूणाला कास्ट कँटँगरी अणि राहत्या क्षेत्रानुसार अनुदान दिले जाणार आहे.

पीएम इजिपी योजनेची अनुदान रक्कम किती आहे?

● जनरल कँटँगरीसाठी -शहरी क्षेत्राकरीता एकुण प्रकल्प खर्चाच्या पंधरा टक्के ग्रामीण खर्चाच्या क्षेत्राच्या २५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.तसेच एकुण प्रकल्प खर्चाच्या किमान दहा टक्के इतके स्वताचे योगदान आपणास द्यावे लागणार आहे.

● एस सी एसटी ओबीसी अपंग इत्यादी प्रवर्गासाठी -शहरी क्षेत्रातील प्रकल्पाच्या एकुण खर्चाच्या पंचवीस टक्के इतका खर्च अणि ग्रामीण क्षेत्रातील एकुण प्रकल्प खर्चाच्या पस्तीस टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे.यात आपणास एकुण खर्चाच्या पाच टक्के स्वताचे योगदान देखील द्यावे लागणार आहे.

पीएम इजिपी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जात कोणते उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो?

पीएम इजिपी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जात आपण कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो जसे की शेतीशी संबंधित असणारा एखादा उद्योग व्यवसाय,एखादा वस्त्रोद्योग सुरू करु शकतो.खनिज खाद्य,रासायनिक,अभियांत्रिकी इत्यादी संबंधित विविध उद्योग व्यवसाय आपण ह्या कर्जाच्या रक्कमेत सुरू करू शकणार आहे.

पीएम इजिपी योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय ठेवण्यात आल्या आहेत?

पीएम इजिपी योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत –

● सदर योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करणारा उमेदवार मुलत भारताचा नागरीक येथील रहिवासी असणे आवश्यक आहे.

See also  बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये २७ जागांसाठी भरती सुरू

● अर्जदार कमीत कमी आठवी नववी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

● अर्जदाराचे वय हे अठरा पेक्षा कमी नसावे अठरापेक्षा अधिक किंवा किमान अठरा असायला हवे.

● अर्जदार जर आधीपासुन दुसरया एखाद्या अनुदान योजनेचा लाभ उठवत असेल तर त्याला ह्या कर्ज योजनेचा लाभ उठविता येणार नही.

● ह्या योजनेअंतर्गत उमेदवाराला फक्त नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्यात येईल जुना उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी यात कुठलेही कर्ज देण्यात येत नसते.याची सर्वानी विशेष नोंद घ्यावी.

● अशा उमेदवाराला विशेष प्राधान्य दिले जाईल ज्याने एखाद्या सरकारी संस्था संघटना मधून एखाद्या उद्योग व्यवसायाचे खास प्रशिक्षण घेतले आहे.

● सर्व प्रकारच्या सरकारी तसेच सेवाभावी संस्था देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

पीएम इजिपी योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

पीएम इजिपी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास पीएम इजिपीच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन आँनलाईन पदधतीने अर्ज करायचा आहे.

Kvionline.Gov.In ही पीएम इजिपीची आँफिशिअल वेबसाइट आहे. ह्या वेबसाइट वर आपल्याला जायचे आहे.वेबसाईटवर गेल्यावर एक होम पेज ओपन होईल.

ज्यात पीएम इजिपी नावाचे आँप्शन आपणास दिसुन येईल त्यावर क्लीक करायचे.

यानंतर आपल्यासमोर अजुन एक नवीन पेज ओपन होईल ज्यात आपणास Pmegp E Portal वर क्लीक करायचे आहे.

यानंतर आपल्या समोर अजुन एक पेज ओपन होईल त्यात Online Application Form Of Individual ला सिलेक्ट करून घ्यायचे.

यानंतर आपल्यासमोर एक फाँर्म ओपन होईल तो व्यवस्थित भरून घ्यायचा.त्यात आपले नाव पत्ता आपण कुठल्या जिल्हा राज्यातील आहे आपला आधार नंबर सर्व इत्यादी महत्वाची माहीती भरायची आहे.

सर्व फाँर्म व्यवस्थित भरून झाल्यानंतर Save Applicant Data वर क्लीक करायचे.अणि भरलेल्या फाँर्मला सेव्ह करायचे नंतर त्याची एक प्रिंट काढायची अणि काढलेली प्रिंट यातिघांपैकी केवीआयसी/केवीआयबी/डिआयसी जिथे आपण अर्ज केला आहे तिथे जमा करायचा आहे.

See also  भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या - Highest Paid Government Jobs In Marathi

यानंतर आपला अर्ज व्यवस्थित चेक केला जाईल जर आपला अर्ज कर्जासाठी मान्य केला गेला तर यानंतर बँकेत जाऊन सर्व डाँक्यूमेंटची आपणास पडताळणी करून घ्यावी लागेल.

यानंतर बँकेकडून आपल्या अर्जावर प्रक्रिया केली जाईल आणि आपल्या प्रकल्पाच्या जागेची स्थळाची पाहणी देखील बँकेकडुन केली जाईल

सर्व प्रोसेस पुर्ण झाल्यानंतर बँकेकडून कर्ज घेण्यास आपल्याला मान्यता दिली जाईल.आणि आपला अर्जाचा फॉर्म Kvic/Kvib/Dic वर सबमिट केला जाईल.

यानंतर आपल्याला EDP प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळवावे लागेल, हे प्रमाणपत्र Kvic/Kvib/Dic आणि बँकेत जाऊन जमा करावे लागेल.

पीएम इजिपी कर्ज योजनेसाठी अर्ज करायला कोणकोणते महत्वाचे डाँक्युमेंट लागतील?

● अर्ज करणारया व्यक्तीचा उमेदवाराचा मोबाइल नंबर

● अर्ज दार व्यक्तीचे आधार कार्ड अणि पँन कार्ड

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● जातीचा दाखला

● आपले आतापर्यतची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे

पीएम इजिपीची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

Kvionline.Gov.In ही पीएम इजिपीची आँफिशिअल वेबसाइट आहे.

1 thought on “प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना २०२२ विषयी माहीती – PMEGP Loan Scheme 2022 Information In Marathi”

Comments are closed.