Polycythemia म्हणजे काय?polycythemia information in Marathi

Polycythemia म्हणजे काय? Polycythemia information in Marathi

आपल्या मानवी शरीरात प्रामुख्याने तीन प्रकारच्या रक्तपेशी असतात.त्या म्हणजे लाल रक्तपेशी, पांढरया रक्तपेशीं अणि प्लेटलेट्स.

जेव्हा आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची निर्मिती ही असामान्यपणे होत असते आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची वाढ असामान्य रीत्या होत असते अणि ही वाढ अधिक होऊन नियंत्रणाच्या बाहेर जात असते.

पाॅलिसिथेमिया याला एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग आहे.याचे कुठलेही ठाराविक कारण विज्ञानाकडे देखील असलेले आपणास दिसून येत नाही.

पाॅलिसिथेमिया हा अनुवांशिक आजार देखील नाहीये म्हणजे आईवडिलांपासुन मुलांना जडणारा आजार देखील नाहीये.हा एक असा रक्ताचा आजार आहे ज्यामुळे आपल्या अस्थीमज्जा असामान्य रीत्या लाल रक्तपेशींची निर्मिती करू लागतात.

ह्या निर्माण झालेल्या अतिरिक्त लाल रक्तपेशीमुळे रक्त घट्ट दाट होऊ लागते.त्याच्या प्रवाहास देखील विलंब होत असतो.यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत असतात.

पाॅलिसिथेमिया हे उत्परिवर्तन तसेच बदल आहे जो आपल्या शरीरातील पेशींमध्ये घडुन येत असतो.पाॅलिसिथेमिया यालाच आपण मायलो प्रोरीफिएटिव्ह निओ प्लाझम असे देखील म्हणतो.

पाॅलिसिथेमिया ही एक अवस्था असते जी अस्थीमज्जा दोषामुळे उदभवत असते.जेव्हा आपल्या शरीरात हाडांमध्ये असलेल्या अस्थीमज्जा व्यवस्थित कार्य करत नाही अणि त्या असामान्य रीत्या लाल रक्तपेशींची निर्मिती करू लागतात.

पाॅलिसिथेमिया ही अवस्था एकाएकी एक किंवा दोन दिवसांत उदभवत नसते कुठल्याही व्यक्तीला हा आजार एकाएकी जडत नसतो.हा आजार अनेको वर्षापासुन आपल्या शरीरात विकसित होत असतो.अणि आपल्याला याची लक्षणे लक्षात देखील येत नसते.

हायपर व्ही स्काॅसिटी मुळे याची लक्षणे आपल्या निदर्शनास येत असतात.यामुळे एकाच ठिकाणी रक्त जमा होत असते तसेच क्लाॅट थ्रोंबोसिसची समस्या देखील निर्माण होत असते.याचे परिणाम स्वरुप आपल्या शरीरातील आॅक्सिजनचा पुरवठा कमी कमी होऊ लागतो.

See also  निरोगी जीवणासाठी आपली रोजची दिनचर्या कशी असायला हवी?How should our daily routine be for a healthy life in Marathi?

ज्यामुळे डोके दुखणे, दृष्टी दोषाची समस्या निर्माण होणे, चक्कर येणे,व्हरटिगो टिनिटस,आतडयांमधुन तसेच हिरडयांमधुन रक्त वाहणे हाता पायाला खाज सुटते इत्यादी समस्या निर्माण होतात.

जेव्हा आपण एखाद्या वेळी आपली रक्तचाचणी करतो अणि त्यात आपल्याला आपल्या शरीरातील आरबीसी काऊंट जास्त असलेला दिसुन येतो तेव्हा आपल्याला आपणास पाॅलिसिथेमिया झाला आहे असे लक्षात येते.

पाॅलिसिथेमिया हा आजार महिलांपेक्षा पुरुषांना अधिक जडत असतो.पाॅलिसिथेमिया हा कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो साधारणतः हा 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तीं मध्ये पाहावयास मिळत असतो.

Polycythemia information in Marathi
Polycythemia information in Marathi

पाॅलिसिथेमियाची लक्षणे कोणकोणती आहेत? polycythemia symptoms

१)गरम पाण्याने अंघोळ केल्यावर पुर्ण अंगाला खाज सुटते

२) चेहर्यावर लाल डाग पडणे

३) श्वास घ्यायला त्रास होणे

४) हातापाया मध्ये जळजळ होते हात पाय झणझण्या मारतात

५) हातापायास अत्यंत वेदनादायी सुज येणे

इतर सामान्य लक्षणे –

 • डोके दुखी
 • नजर कमी होणे
 • कमजोरी येणे
 • वजन कमी होणे
 • घाम येणे विशेषतः रात्री
 • पाॅलिसिथेमिया होण्याची कारणे कोणकोणती आहेत? polycythemia causes
 • धुम्रपान करणे
 • रसायनांच्या अधिक संपर्कात राहणे
 • विकीरण अनावरण
 • अनुवांशिक उत्परिवर्तन
 • Family history

पाॅलिसिथेमिया वर करावयाचे उपचार-polycythemia treatment

पाॅलिसिथेमिया वर उपचार करताना सर्वप्रथम आपले complete blood count test करण्यात येते यात आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन अणि आरबीसीची संख्या तपासणी केली जाते.

समजा तपासणी दरम्यान या तिघांचीही संख्या अधिक वाढलेली दिसुन आली तर blood smear examination अणि bone marrow biopsy केले जाते.

स्क्रिनिंग करून झाल्यावर रोगाचे पक्के निदान करण्यासाठी flow cytometry pannels चा वापर केला जातो.

यानंतर यावर औषध काम करतील का नाही हे बघण्यासाठी prognosis test केली जाते.यात सायटोजेनेटिक टेस्ट,माॅलिकयुलर मार्कर jak2v617,fak2exon12,calar mpl gene mutation इत्यादींचा समावेश होतो.

पाॅलिसिथेमिया वर उपचार करण्यासाठी आपल्या हाताच्या नसेतुन रक्त काढले जाते.रक्त पेशी कमी करत असलेल्या हायड्राॅकसीयुरिया हे औषध दिले जाते.कमी डोस असलेल्या अॅसपीरीन टॅबलेट दिल्या जातात.याचसोबत इंटरफेरोन अलफा,बुसलफान, इत्यादी देखील दिले जाते.

See also  मनोबाला कोण होते? Manobala

उपचारादरम्यान आपण धुम्रपान करणे टाळावे, थोडाफार व्यायाम करायला हवा,पाय अणि घोटयाचा व्यायाम देखील करायला हवा.प्रोटीन युक्त आहाराचे सेवन करावे,फळ भाज्यांचा आहारात अधिक समावेश करावा.कमी तळलेले कमी तिखट जेवन करणे.

गरम पाण्याने अंघोळ करायला त्रास होत असल्यास थंड पाण्याने अंघोळ करणे,त्वचेवर खाज येत असल्यास आपण लोशन किंवा क्रिमचा वापर देखील करू शकतात.

पाॅलिसिथेमिया झालेला रूग्ण जो कुठलाही औषधोपचार करत नाही तो जास्तीत जास्त दीड ते तीन वर्षे गोळ्या औषधे न घेता जिवंत राहु शकतो.पण वेळेवर गोळ्या औषधे घेतल्यास तो 15 पेक्षा अधिक वर्षे जिवंत राहु शकतो.