आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीमध्ये वाढ करणारया काही महत्वाच्या अन्नपदार्थांची यादी – red blood cells increase food list

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीमध्ये वाढ करणारया काही महत्वाच्या अन्नपदार्थांची यादी red blood cells increase food list

आपले शरीर नेहमी निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरात लाल रक्तपेशी खुप महत्वाची भुमिका बजावतात.

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींचे मुख्य कार्य हे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना आॅक्सिजनचा पुरवठा करणे त्यांच्यापर्यंत आॅक्सिजन पोहोचवणे हे आहे.

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी झाल्या आहेत ज्यामुळे आपल्याला नेहमी अशक्तपणा,थकवा जाणवतो घाम येतो आहे किंवा कुठलेही काम करताना आळस येतो आहे.

तर आपणास अॅनेमिया झाला असण्याची शक्यता असु शकते म्हणून आपण खाली दिलेल्या अन्न पदार्थांचे सेवन करायला हवे याने आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीं मध्ये लवकरात लवकर वाढ होण्यास मदत

होईल.

red blood cells increase food list
red blood cells increase food list

१) व्हिटॅमिन बी १२ युक्त अन्नपदार्थाचे सेवन करा –

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी झाल्या आहे अणि आपल्याला त्या वाढवायच्या आहेत तर आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन बी १२ युक्त अन्नपदार्थाचा समावेश करायला हवा.

याने आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीमध्ये वाढ होण्यास मदत होईल.व्हिटॅमिन बी १२ युक्त आहाराचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्तात वाढ होत असते.अणि हिमोग्लोबिनची निर्मिती होते.

काही व्हिटॅमिन बी १२ युक्त अन्नपदार्थांची नावे –

See also  Eat Right Station - FSSAI द्वारे गुवाहाटी रेल्वे स्टेशनला देण्यात आले ईट राईट स्टेशनचे प्रमाणपत्र Guwahati Railway Station - Eat Right Station Certificate

१)दुध अणि दुधापासून तयार करण्यात आलेले इतर अन्नपदार्थ दही ताक चीज बर्गर इत्यादी.

२) टुना मासे

३) लाल मांस

४) अंडी

२) आयर्न युक्त,लोहयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करा –

काही लोहयुक्त अन्नपदार्थांची नावे-

आपल्याला जर आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी वाढवायच्या असतील तर आपण आपल्या आहारात लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करायला हवा.

ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे अणि त्यांना अॅनिमियाची समस्या असेल अशा व्यक्तींनी आपल्या आहारात लोहयुक्त आयर्न युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा.

याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन अणि आरबीसीचे प्रमाण देखील वाढेल.

आयर्न युक्त अन्नपदार्थांचे नाव –

१)पालक

३) हरभरा

३) तृणधान्ये

४) टुना मासा

५) डाळी

६) डाळींब

३) व्हिटॅमिन ए युक्त अन्नपदार्थांचे सेवन करा –

  • गाजर
  • रताळे
  • पालक
  • भोपळा
  • ब्रोकोली
  • आंबा

सॅलमिन फिश

४) व्हिटॅमिन सी युक्त अन्नपदार्थांचे सेवन करा-

  • संत्री
  • टोमॅटो
  • किवी फळ
  • मिरपुड
  • लाल तसेच हिरवी मिरची
  • ब्रोकोली
  • स्ट्राॅबेरी
  • द्राक्ष
  • बटाटा

५) व्हिटॅमिन बी ९ युक्त अन्नपदार्थांचे सेवन करा –

  • संत्री
  • शतावरी
  • पालक
  • शेंगदाणे
  • ब्रेड तसेच धान्य

६) काॅपर युक्त अन्नपदार्थांचे सेवन करा –

  • सुर्यफुलाच्या बिया
  • हरभरा
  • काजु
  • बटाटे
  • चाॅकलेटस
  • तीळ
  • अॅवोकॅडो

शरीरातील आरबीसीची नाॅरमल रेंज किती असणे आवश्यक आहे? RBC normal range

एका निरोगी हेल्दी पुरूषाच्या शरीरातील आरबीसीची नाॅरमल रेंज ४.७ ते ६.१ मिलियन सेल्स/एम सीएल ब्लड असणे आवश्यक आहे.

एका निरोगी गर्भवती नसलेल्या हेल्दी महिलेच्या शरीरातील आरबीसीची नाॅरमल रेंज ४.२ ते ५.४ मिलियन सेल्स/एम सीएल ब्लड असणे आवश्यक आहे.

एका निरोगी हेल्दी लहान मुलाच्या शरीरातील आरबीसीची नाॅरमल रेंज ४.० ते ५.५ मिलियन सेल्स/एम सीएल ब्लड असणे आवश्यक आहे.

red blood cells increase food list
red blood cells increase food list

शरीरातील आरबीसीचे प्रमाण कमी झाल्यावर कोणकोणती लक्षणे दिसुन येतात?low rbc symptoms

सुरूवातीची लक्षणे –

  • थकवा येणे
  • श्वास घ्यायला त्रास होणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • चक्कर आल्यासारखे वाटणे
  • डोके जड पडणे डोके दुखणे
  • त्वचेचा रंग उडणे
  • हदयाची धडधड वाढणे
  • ब्लड प्रेशर कमी होणे
  • डोळे पिवळे पडणे
See also  राज्य कामगार विमा योजना विषयी माहिती - Employee State insurance scheme information in Marathi

आपल्या शरीरातील आरबीसीचे प्रमाण कमी होण्याची कारणे – low RBC causes

खालील काही परिस्थितीत आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी होत असतात.

१) अॅनेमिया असणे

२) अस्थीमज्जा फेलर

३) इरिथरो पोईटिन कमतरता

४) हिमोलिसेस किंवा आरबीसी नाश होणे

५) अंतर्गत अणि बाह्य रक्तस्राव

६) लयुकेमिया

७) कुपोषण

८) मल्टिपल मायलोमा

९) व्हिटॅमिन अणि खनिजांची कमतरता

१०) प्रेगनेंसी

११) थायरॉईड निदान

१२) औषधांचे अधिक सेवन

शरीरातील आरबीसीचे प्रमाण प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यावर जाणवणारी लक्षणे high RBC symptoms

सांधेदुखी

त्वचेवर खाज येणे

श्वास घ्यायला त्रास होणे

थकवा येणे

रक्तदाब वाढणे

त्वचेवर लाल चटटे डाग पडणे

डोळे लाल पडणे

पोटदुखी

डोके दुखी

शरीरातील आरबीसीचे प्रमाण अधिक वाढण्याची कारणे -High RBC causes

खालील काही परिस्थितीत आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी अधिक वाढुन जात असतात.

धुम्रपान करणे

हृदयरोग

डिहायड्रेशन

रेनल सेल कार्सेलोमा

फुप्फुसीय फायब्रोसिस

अस्थी मज्जा रोग

आरबीसी काऊंटची आवश्यकता का असते? why RBC count is important

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या साधारणतः रेंजमध्ये नसली ती खुप कमी असली किंवा खुप जास्त असली तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागु शकते.हे आपल्याला वरील माहीतीतुन लक्षात आलेच असेल.

आरबीसी काऊंटमुळे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी झाली आहे किंवा जास्त झाली आहे आपणास हे लक्षात येते.

अणि आपल्याला आपल्या शरीरातील वाढलेले तसेच कमी झालेले आरबीसीचे काऊंट नाॅरमल रेंज मध्ये नेण्यासाठी योग्य ते उपचार करता येतात.

आपल्या शरीरातील आरबीसी काऊंट करण्यासाठी आपल्याला सीबीसी complete blood count ही एक टेस्ट करावी लागते.

याचसोबत आपणास संतुलित आहार घेणे,नियमित एक्सरसाईज करणे, धुम्रपान करणे टाळावे,अॅसपीरीन कॅफिन टाळणे,अल्कोहोल पिणे टाळणे,योग्य प्रमाणात पाणी पिणे इत्यादी गोष्टी देखील आपले आरबीसी रेंज नाॅरमल ठेवण्यासाठी कराव्या लागतील.