नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी कसे राहायचे-How To Stay Fit And Healthy In Marathi

Table of Contents

नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी कसे राहायचे-How To Stay Fit And Healthy In Marathi

आपल्याला सर्वानाच माहीत आहे की आपले आरोग्य ही आपली सगळयात मोठी आणि अमुल्य संपत्ती आहे.

जिची काळजी घेणे ही आपल्या प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी तसेच कर्तव्य देखील आहे.कारण आपले शारीरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तर आपण आयुष्यात कुठलेही ध्येय प्राप्त करू शकतो.

तसेच जर आपल्याला जीवणात प्राप्त झालेल्या कुठल्याही मोठया यशाचा,आनंदाचा आपणास मनसोक्त उपभोग घ्यायचा असेल आनंद लुटायचा असेल तर त्यासाठी देखील आपण शारीरीक आणि मानसिकदृष्टया फिट असणे निरोगी असणे फार गरजेचे असते.

कारण आपले शरीर आणि मन जर निरोगी आणि तंदुरस्त असेल तर आपल्या कामातील Productivity मध्ये देखील वाढ होत असते.कुठलेही काम आपण आपली 100 Percent Energy देऊन पार पाडु शकतो.

म्हणुन जगातील सर्व यशस्वी तसेच श्रीमंत व्यक्ती आपल्या कामाकडे लक्ष देण्यासोबत आपल्या आहाराकडे,व्यायामाकडे विशेष लक्ष देतात.म्हणजेच आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेताना आपणास नेहमी दिसुन येत असतात.

याचसाठी आजच्या लेखात आपण नेहमी Fit आणि Healthy राहण्यासाठी काय करायला हवे.हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

See also  दही खाण्याचे आरोग्यदाही फायदे -Health benefits of eating curd daily

Healthy आणि Fit राहण्यासाठी काही टिप्स

नेहमी तंदुरस्त आणि निरोगी राहण्यासाठी आपण काय करायला हवे?(How To Stay Fit And Healthy In Marathi)

नेहमी तंदुरस्त आणि निरोगी राहण्यासाठी आपण पुढील काही उपाय करायला हवेत.

 Daily Exercise आणि Walk करायला हवे –

रोज सकाळी पाच दहा मिनिट का होईना व्यायाम करायला हवा.याने आपले शरीर नेहमी Strong,Active,निरोगी आणि तंदूरस्त राहत असते.

शरीराला निसर्गाची शुदध हवा लागावी यासाठी निसर्गाच्या शुदध हवेत सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस फिरायला जायला हवे.निसर्गाच्या शुदध हवा मिळल्याने आपले शरीर आणि मन नेहमी फ्रेश,आणि प्रफुल्लित राहत असते.

 रोज Meditation करायला हवे:

मेडिटेशन केल्याने आपली रोजच्या कामातील एकाग्रता क्षमता वाढते Productivity Increase होते.ज्याने कुठलेही काम आपल्याला पुर्ण फोकसमध्ये Without Distraction करता येते.

आणि शिवाय मेडिटेशन केल्याने आपले मन एका जागी शांत आणि स्थिर होत असते.म्हणुन आपण रोज सकाळी पाच मिनिट का होईना मेडिटेशन करायलाच हवे.

 योगा तसेच प्राणायम करावे :

योगा तसेच प्राणायम केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होत असते.वृदधत्वात देखील आपण फिट आणि तंदुरस्त राहत असतो.

तसेच आपल्याला कुठलाही आजार जडत नाही.आणि योगासने केल्याने आपल्या शरीराचा फँट देखील कमी होत असतो.

याचसोबत प्राणायम केल्याने आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेमध्ये आणि लवचिकतेत वाढ होत असते.आपल्या रक्तामधील आँक्सीजनचे प्रमाण वाढुन आपली सर्व इंद्रिये Refresh होत असतात.शिवाय आपल्याला श्वसनाशी संबंधित कुठलाही आजार जडत नाही.

शरीराला नेहमी कष्ट करण्याची,मेहनत करण्याची सवय लावावी Make Habit To Work Hard Constantly :

नेहमी शरीराला सातत्याने शारीरीक कष्ट करण्याची मेहनत घेण्याची सवय लावावी याने आपल्या शरीराचा भरपुर व्यायाम होतो,घाम निघतो आपल्याला भरपुर भुक देखील लागते.

ज्याने आपले शरीर फिट Active राहत असते आणि आपल्याला कुठलाही रोग देखील जडत नसतो.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे याने आपले शरीर तंदुरस्त आणि सदैव क्रियाशील राहते ज्याने वयस्कर झाल्यावर देखील आपले शरीर काम करू शकते.कार्यशील राहते कारण आपण आपल्या शरीराला तशी Active राहण्याची काम करत राहण्याची सवय लावलेली असते.

See also  मेनोपाॅज म्हणजे काय?menopause meaning in marathi

सर्व प्रकारच्या आहाराचे सेवण करावे-

आपण कडु,गोड,तिखट,आंबट,अशा सर्व प्रकारच्या आहाराचे सेवण करायला हवे.कारण शरीराला वाढीसाठी सर्व प्रकारच्या रसांची आवश्यकता असते

नेहमी सकस आणि पौष्टिक आहारच घ्यायला हवा आणि शक्यतो आहारात कच्च्या भाज्यांचा,फळांचा देखील समावेश करावा याने खाल्लेले अन्न लवकर पचते.

 कधीही घाईघाईत जेवण करू नये:

आपण जेवण कधीही घाईघाईत करू नये नेहमी चावून आणि त्याचा आनंद आस्वाद घेऊन ते अन्न ग्रहण करावे.आणि जेवताना कुठलाही विचार देखील करायचा नाही किंवा टीव्ही बघत बसायचे नाही पुर्ण एकाग्रतेने फक्त जेवणाचा आनंद घ्यायचा.याने खाल्लेले अन्न अंगी लागत असते.

 जेवणाचे एक पथ्य ठेवावे –

जेवणाचे एक रोजचे पथ्य ठेवावे जो पर्यत आपल्याला कडकडुन भुक लागत नाही तोपर्यत जेवायला बसायचे नाही.आणि पोट फुटेपर्यत,गँस होईपर्यत अमर्याद जेवण करायचे नाही.पोट पुर्ण भरायला थोडी जागा कमी असेल तेव्हा लगेच जेवण थांबवायला हवे.

जेवणाचा देखील एक निश्चित टाईमटेबल ठेवायचा कधीही अवेळी जेवायला बसायचे नाही जेवणाचे एक पथ्य ठेवायचे.

शरीराला हितकारक आणि पोषक असेल तोच आहार घ्यावा :

शरीरासाठी हितकारक आणि पोषक आहे असाच आहार आपण घ्यायला हवा.आपल्याला जे खायला आवडते ते खाण्यापेक्षा बाहेरील उघडयावरील हाँटेलातील तळलेले तेलगट अन्नपदार्थ फास्टफुड,जंकफुड न खाता आपल्या शरीराला पोषक आहे तेच अन्नपदार्थ आपण खायला हवे.

म्हणजेच ज्याने आपले शरीर निरोगी आणि तंदुरस्त राहील असा सकस आणि सात्विक आहारच घ्यायला हवा.शरीराला सर्व जीवनसत्वे मुबलक प्रमाणात प्राप्त होतील याची काळजी घ्यायला हवी.

 शरीराला सतत चालना देईल अशा सर्व Physical Activities नेहमी करायला हव्यात:

शरीराला चालना देईल अशा सर्व Physical Activities आपण रोज करायला हव्यात जसे की

रोज थोड का होईना पायी चालणे,सायकल चालविणे,हाताला नेहमी काम करत राहण्याची Physical Activity करण्याची सवय लावणे याने आपले शरीर सुस्त आणि आळशी होत नाही नेहमी कार्यशील राहते.आणि शरीराचे सर्व अवयव जर नेहमी कार्यशील राहिले तर आपल्याला कुठलाही रोग देखील जडत नाही.

कुठल्याही प्रकारचा Stress तसेच Tension घ्यायचे नाही:

असे कुठल्याही प्रकारचे टेंशन घ्यायचे नाही ज्याने आपल्या शरीरावर आणि मनावर अधिक ताण तणाव निर्माण होईल आणि आपले स्वास्थ बिघडेल.

See also  केटो डाएट म्हणजे काय ? केटो आहार - Keto Diet Plan Information In Marathi

कारण जास्त Tension आणि Stress घेतल्याने Heart Attack,Anxiety Attack सारखे विकार आपल्याला जडत असतात.

 नेहमी स्वच्छतेचे पालन करावे :

आपण नेहमी स्वच्छतेचे पालन करायला हवे बाहेरून आल्यावर तसेच जेवणाच्या आधी साबणाने स्वच्छपणे हात धुवायला हवेत,नेहमी स्वच्छ कपडे परिधान करायला हवेत.आपले घर आणि आपल्या आजुबाजुचा परिसर देखील स्वच्छ ठेवायला हवा.

 पुरेशी झोप घ्यावी :

शरीराला आवश्यक तेवढी झोप आपण घ्यायलाच हवी नाहीतर दुसरया दिवशी झोप पुर्ण न झाल्याने आपल्याला काम करताना सुस्ती झोप तसेच आळस येत असतो आणि याने आपले कोणतेच काम पुर्ण होत नाही.आणि आपल्याला दिवसभर Restless Feel होत असते.शिवाय झोप पुर्ण न झाल्याने अनेक शारीरीक आजारांना देखील बळी पडावे लागते.

पण आपण झोपेचे देखील प्रमाण ठेवायला हवे खुप अति प्रमाणात झोपु नये आणि रोज रात्री वेळेवर झोपायला हवे.

 कुठल्याही मादक पदार्थाचे सेवण करू नये.

जर आपल्याला आपले शरीर निरोगी आणि तंदुरस्त ठेवायचे असेल तर आपण दारू,गुटखा,तंबाखु सिगारेट,पानमसाला इत्यादी अशा मादक पदार्थाचे अजिबात सेवण करू नये कारण याने आपले शरीर डँमेज होत असते आणि अनेक गंभीर आजार देखील आपणास जडत असतात.

बाहेरचे उघडयावरील जंक फुड खाणे टाळावे:

बाहेरचे उघडयावरील तसेच हाँटेलातील तेलगट तिखट अन्नपदार्थ खाणे आपण टाळायला हवे कारण त्यावर विविध जंतु बसलेले असतात आणि तेच अन्न जर आपण खाल्ले आणि ते जंतु आपल्या पोटात गेले तर याने आपल्याला Food Poison देखील होऊ शकतो.

डाँक्टरांचा सल्ला न घेता कुठलेही गोळया औषधी घेऊ नये:

डाँक्टरांचा सल्ला न घेता कुठलेही गोळया औषधी घेऊ नये कारण कित्येकदा गोळया औषधांचा देखील साईड इफेक्ट होत असतो.

16) भरपुर पाणी प्यायला हवे:

सकाळी झोपेतुन उठल्या उठल्या अन्नाशापोटी आपण एक ग्लास पाणी तरी रोज प्यायला हवे याने आपल्या पोटातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडत असतात आणि आपल्याला बदधकोष्ठते सारखी समस्या देखील जाणवत नाही.

17) सकाळी उपाशीपोटी चहा पिऊ नये :

सकाळी उपाशीपोटी चहा पिणे हे शरीरासाठी एक विष असते ज्याने आपल्या भुकेवर याचा परिणाम होतो शरीराच्या आतडयांवर देखील ताण पडतो म्हणुन आपण नाश्ता केल्यावरच चहा प्यायला हवा.

17) Less Processed Food खावे :

आपण नेहमी कमी प्रक्रिया केलेले अन्न खायला हवे.

 नेहमी डाँक्टरांकडून Routine Check Up करत राहावे.

नेहमी आपल्या फँमिली डाँक्टरकडून महिन्यातुन एकदा तरी आपल्या तब्येतीचे Routine Check Up करत राहावे.

नेहमी तंदुरस्त आणि निरोगी राहण्यासाठी काही इतर उपाय-

● नेहमी सकारात्मक विचार करावा.

● भरपुर हसावे कारण डाँक्टरांचे देखील असे म्हणने आहे की रोज किमान दहा मिनिट हसल्याने आपले अर्धे रोग बरे होत असतात.

● चांगली पुस्तके वाचावी तसेच चांगले विचार आत्मसात करावे.

● नकारात्मक भावनांपासुन,उर्जेपासुन विचारांपासुन,व्यक्तींपासुन नेहमी दुर राहावे. (उदा,राग,लोभ,मोह,अहंकार,दवेष इत्यादी).

● नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत सान्निध्यात राहावे.