भारतातील रामसर स्थळांविषयी संपूर्ण माहीती | Ramsar Sites Information in India

Table of Contents

भारतातील रामसर स्थळ | Ramsar Sites Information in India

रामसर स्थळे म्हणजे काय? तसेच रामसर स्थळांना रामसर स्थळे असे नाव का देण्यात आले?

रामसर हे एक ठिकाण आहे जे इराण ह्या देशामध्ये आहे.
इराण मधील रामसर नावाच्या ह्याच स्थळावर १९७१ साली भरविण्यात आलेल्या परिषदेत एक करार करण्यात आला होता.

ह्या घडुन आलेल्या करारात एकुण १८ देशांचा समावेश होता.हया कराराबाबद एकूण १८ देशांनी आपली स्वाक्षरी केली होती.

१९७१ मध्ये झालेल्या ह्या रामसर कन्व्हेनशन आॅन वेटलॅड करारात असे ठरविण्यात आले की जे पाणथळ अणि दलदलीचे प्रदेश आहे त्यांचे संरक्षण करण्यात यावे.

अणि हा पाणथळ अणि दलदलीचे प्रदेश यांचे संरक्षण करण्याचा करार इराण देशातील रामसर ह्या ठिकाणी घडुन आला होता.म्हणून जी पाणथळ अणि दलदलीचे प्रदेश स्थळे आहेत ज्यांना संरक्षण देण्यासाठी घोषित केले जाते त्या स्थळांना रामसर स्थळे असे म्हटले जाऊ लागले.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर ज्या पाणथळ अणि दलदलीच्या प्रदेशांना ठिकाणांना संरक्षण देण्यासाठी घोषित केले जाते त्यांनाच रामसर स्थळे असे संबोधिले जाते.

World Kidney Day 2023 In Marathi : किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

रामसर करार कोठे घडुन आला?

रामसर करार इराण मधील रामसर नावाच्या ठिकाणी घडुन आला.

रामसर करार का घडुन आला त्याचे उद्दिष्ट काय होते?

इराण येथील रामसर ह्या ठिकाणी झालेला रामसर कन्व्हेनशन आॅन वेटलॅड करार हा करार पाणथळ आणि दलदलीच्या प्रदेशांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केला गेला होता.

रामसर स्थळे कशाशी संबंधित असतात?

रामसर स्थळे ही पाणथळ अणि दलदलीच्या प्रदेशांशी संबंधित असलेली स्थळे असतात.

जागतिक पाणथळ दिवस कधी असतो?

जागतिक पाणथळ दिवस हा २ फेब्रुवारी रोजी असतो.

रामसर कन्व्हेनशन ऑन वेटलॅड हा करार भारतात कधी अंमलात आणला गेला?

इराण देशातील रामसर ह्या ठिकाणी झालेला रामसर कन्व्हेनशन आॅन वेटलॅड हा करार आपल्या भारत देशात १ फेब्रुवारी १९८२ साली अंमलात आणण्यात आला होता.

रामसरचे सचिवालय हे कोठे आहे?

संपूर्ण जागतिक पातळीवर राजसरचे कामकाज पाहणारे रामसरचे मुख्य सचिवालय हे स्वीत्झलॅड देशातील ग्लांड ह्या ठिकाणी आहे.

आंतरराष्ट्रीय रामसर स्थळाचा दर्जा कोणाला दिला जातो?

संपुर्ण जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या स्थळांना आंतरराष्ट्रीय रामसर स्थळाचा दर्जा रामसर सचिवालया मार्फत देण्यात येतो.

डिसेंबर २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यात एकुण किती रामसर स्थळे आहेत?

डिसेंबर २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यात एकुण तीन रामसर स्थळे आहे.

ज्यात पहिले रामसर स्थळ आहे नांदुर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य,नाशिक ज्याला २०१९ मध्ये मान्यता प्राप्त झाली होती.

दुसरे रामसर स्थळ आहे लोणार सरोवर जे बुलढाणा जिल्ह्यातील आहे याला नोव्हेंबर २०२० मध्ये मान्यता प्राप्त झाली होती.

तिसरे रामसर स्थळ आहे ठाण्याची खाडी जे ठाणे जिल्ह्यात आहे अणि याला आॅगस्ट २०२२ मध्ये मान्यता प्राप्त झाली होती.

भारतातील टाॅप 10 आयटी कंपन्या । Top 10 IT Companies In India

जगातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे?

१९७४ साली रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेले आॅस्ट्रेलिया ह्या देशातील कोबोर्ग दविप्रकल्प हे जगातील पहिले रामसर स्थळ म्हणून ओळखले जाते.

रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे?

रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या ब्रिटन ह्या देशात आहे.ब्रिटनमध्ये एकुण १७५ रामसर स्थळे आहेत.

अणि रामसर स्थळांच्या सर्वाधिक संख्येच्या बाबतीत मेक्सिको ह्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो.मेक्सिको येथे एकुण १४२ रामसर स्थळे आहेत.

रामसर स्थळांचे सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला देश कोणता आहे?

रामसर स्थळांचे सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला देश (१४८००० चौकिमी) बोलिव्हिया हा आहे.

डिसेंबर २०२२ पर्यंत जगामध्ये एकुण किती रामसर स्थळ आहेत?

डिसेंबर २०२२ पर्यंत जगामध्ये एकुण २४०० रामसर स्थळे आहेत.

डिसेंबर २०२२ पर्यंत भारतामध्ये एकुण किती रामसर स्थळे आहेत?

डिसेंबर २०२२ पर्यंत भारतामध्ये एकुण ७५ रामसर स्थळे आहेत.

अणि ह्या आॅगस्ट २०२२ मध्ये एकुण ११ नवीन रामसर स्थळांना मान्यता दिली गेली आहे.१३ आॅगस्ट २०२२ पर्यंत भारतात फक्त ६४ रामसर स्थळे होती.

पण आॅगस्ट महिन्यात अजुन ११ नवीन स्थळांना रामसर स्थळ असा दर्जा प्राप्त झाला आहे ज्यामुळे त्यांचा रामसर स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

डिसेंबर २०२२ पर्यंत किती हेक्टर क्षेत्रावर रामसर स्थळे आहेत?

डिसेंबर २०२२ पर्यंत भारतामध्ये १३२६६७७ हेक्टर क्षेत्रावर रामसर स्थळ असलेली आपणास दिसून येतात.

भारत देशात कोणत्या राज्यात सर्वात जास्त रामसर स्थळांची संख्या आहे?

भारत देशात उत्तर प्रदेश ह्या राज्यात सर्वात जास्त रामसर स्थळांची संख्या असलेली आपणास दिसून येते.

डिसेंबर २०२२ पर्यंत भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकुण आठ रामसर स्थळे असलेली आपणास दिसून येतात.

भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे?

भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ पश्चिम बंगाल मधील सुंदरबन मध्ये आहे.(४२२० चौकिमी)

भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ कोणते आहे?

हिमाचल प्रदेश मधील रेणुका वेटलॅड हे भारतातील सर्वांत लहान रामसर स्थळ (०.२ चौकिमी) हे आहे.

भारतातील रामसर स्थळांची नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करते?

रामसर स्थळांची नोडल एजन्सी म्हणून भारत सरकारचे पर्यावरण वन अणि हवामान बदल मंत्रालय हे भारतातील रामसर स्थळांची नोडल एजन्सी म्हणून कार्य करतात.

कोणत्याही पाणथळ तसेच दलदलीच्या प्रदेशाला ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा देण्याकरीता आधी कोणते महत्वाचे निकष विचारात घेतले जातात?

पाणथळ तसेच दलदलीच्या प्रदेशास रामसर स्थळाचा दर्जा देण्यासाठी आधी नऊ निकष विचारात घेतले जातात.

Ramsar Sites Information in India

हे नऊ निकष खालील प्रमाणे आहेत-

१) ज्या ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा दिला जात आहे ते ठिकाण नैसर्गिक असायला हवे किंवा अर्धनैसर्गिक दुर्मिळ पाणथळ असलेले स्थळ असणे आवश्यक आहे.

२) ज्या संबंधित ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा दिला जात आहे त्या ठिकाणी संकटग्रस्त म्हणजेच संपुष्टात येण्याच्या वाटेवर असलेल्या वन्यजीव प्रजाती आढळुन येणे गरजेचे आहे.

३) ज्या पाणथळ तसेच दलदलीच्या ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा दिला जात आहे तिथे असलेल्या वनस्पती आणि वन्यजीव यांचे संवर्धन होणार आहे असे त्या समितीला वाटायला हवे.

४) वन्यजीव अणि वनस्पती यांच्या जीवन चक्रामध्ये संबंधित पाणथळाचे असलेले महत्त्व.

५) संबंधित पाणथळ अणि दलदलीच्या जागेवर सुमारे वीस हजार पाणपक्षांचा म्हणजेच पाण्यात दलदलीच्या ठिकाणी राहतात अशा पक्ष्यांचा आढळ असायला हवा.

६) संबंधित पाणथळ तसेच दलदलीच्या जागी एखाद्या पक्षी प्रजातींच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांचा आढळ असायला हवा.

७) संबंधित पाणथळ अणि दलदलीच्या जागी मत्स्य प्रजातीचा देखील आढळ असणे आवश्यक आहे.

८) संबंधित पाणथळ अणि दलदलीच्या जागी पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातींच्या जागतिक संख्येच्या एक टक्का आढळ असणे आवश्यक आहे.

९) संबंधित पाणथळ अणि दलदलीचे ठिकाण हे महत्त्वाचे ठिकाण असणे आवश्यक आहे.

भारतातील ७५ रामसर स्थळे –

१) कोलेरू तलाव -हे आंध्र प्रदेश मध्ये आहे यास २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२) दिपोर बील –

हे आसाम मध्ये आहे यास २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३) काबर्टल वेटलॅड –

हे बिहार मध्ये आहे याला २०२० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४) खिजाडीया वन्यजीव अभयारण्य –

हे गुजरात मध्ये आहे.हे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५) नळ सरोवर पक्षी अभयारण्य –

हे गुजरात राज्यामध्ये आहे याला २०१२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६) तलाव वन्यजीव अभयारण्य –

हे देखील गुजरात मध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

७) वाधवणा वेटलॅड –

हे देखील गुजरात राज्यामध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

८) भिंडावास वन्यजीव अभयारण्य –

हे हरियाणा मध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

९) सुलतानपुर राष्ट्रीय उद्यान –

हे हरियाणा मध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१०) चंदरताल वेटलॅड –

हे हिमाचल प्रदेश मध्ये आहे याला २००५ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

११) पाॅग डॅम तलाव –

हे हिमाचल प्रदेश मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१२) रेणुका वेटलॅड –

हे हिमाचल प्रदेश मध्ये आहे याला २००५ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१३) वुलर सरोवर –

हे जम्मु व काश्मीर मध्ये आहे याला १९९० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१४) होकेरा वेटलॅड –

हे जम्मु व काश्मीर मध्ये आहे याला २००५ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१५) सुरीनसर मनसार तलाव –

हे जम्मु व काश्मीर मध्ये आहे याला २००५ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१६) त्सोमोरीरी तलाव –

हे जम्मु व काश्मीर मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१७) अस्थमुडी वेटलॅड –

हे जम्मु व काश्मीर मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१८) सस्थम कोटा तलाव-

हे केरळ राज्यामध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

१९) वेंबनाड कोल वेटलॅड –

हे केरळ मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२०) त्सो कार वेटलॅड काॅम्पलेक्स-

हे लडाख मध्ये आहे याला २०२० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२१) भोज वेटलॅड –

हे मध्य प्रदेश मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२२) लोणार सरोवर –

हे महाराष्ट्र मध्ये आहे याला २०२० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२३) नांदुर मधमेश्वर –

हे महाराष्ट्र मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२४) लोकतक तलाव –

हे मणिपूर मध्ये आहे याला १९९० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२५) भितरकणिका खारफुटी –

हे ओरिसा राज्यामध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२६) चिलका सरोवर –

हे ओरिसा मध्ये आहे याला १९८१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२७) बियास संवर्धन –

हे पंजाब मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२८) हरीके सरोवर –

हे पंजाब मध्ये आहे याला १९९० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२९) कांजळी सरोवर –

हे पंजाब मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३०) कोशोपुर मियाणी –

हे पंजाब मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३१) नांगल वन्यजीव अभयारण्य –

हे पंजाब मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३२) रोपल सरोवर –

हे पंजाब मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३३) केवलदेव घाना अभयारण्य –

हे राजस्थान मध्ये आहे याला १९८१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३४) सांभर सरोवर –

हे राजस्थान मध्ये आहे याला १९९० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३५) पाॅईट कॅलिमरे वन्यजीव अणि पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३६) रूद्रसागर सरोवर –

हे त्रिपूरा मध्ये आहे याला २००५ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३७) बखिरा वन्यजीव अभयारण्य –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३८) हैदरपुल वेटलॅड –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

३९) नवाबगंज पक्षी अभयारण्य –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४०) पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४१) समसपुर पक्षी अभयारण्य –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४२) सांडी पक्षी अभयारण्य –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४३) सामन पक्षी अभयारण्य –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४४) सरसाई नवर झील –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४५) सुर सरोवर –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २०२० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४६) अप्पर गंगा नदी –

हे उत्तर प्रदेश मध्ये आहे याला २००५ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४७) आसन स़ंवर्धन क्षेत्र –

हे उत्तराखंड मध्ये आहे याला २०२० मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४८) पुर्व कोलकाता वेटलॅड –

हे पश्चिम बंगाल मध्ये आहे याला २००२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

४९) सुंदरबन वेटलॅड –

हे पश्चिम बंगाल मध्ये आहे याला २०१९ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५०) कारीकिली पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५१) पललीकरणाई पाणथळ राजु अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५२) पिचावरम कांदळवन –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५३) पाला पाणथळ प्रदेश –

हे मिझोराम मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५४) सख्य सागर –

हे मध्य प्रदेश मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५५) कुंथनकुलम पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५६) सातकोसिया घाट –

हे ओरीसा मध्ये आहे याला २०२१ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५७) नंदा सरोवर –

हे गोवा मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५८) मननार मरीन बायोस्पीअर रिझर्व्हेचे आखात –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

५९) रंगनाथिटु बीएस –

हे कर्नाटक मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६०) वेंबनुर वेंटलेंट काॅम्पलेक्स –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६१) वेल्लोड पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६२) सिरपुर वेटलॅड –

हे मध्य प्रदेश मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६३) वेंदांतगल पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६४) उदय मार्तंड पुरम पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६५) तांपारा सरोवर –

हे ओरिसा मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६६) हिराकुड जलाशय –

हे ओरिसा मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६७) अनसुपा सरोवर –

हे ओरिसा मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६८) यशवंत सागर –

हे मध्य प्रदेश मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

६९) चित्राकुडी पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

७०) सुचिंद्रम थेरूर वेटलॅड काॅम्पलेक्स-

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

७१) वडुवुरू पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

७२) कांजीरकुलम पक्षी अभयारण्य –

हे तामिळनाडू मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

७३) ठाणे खाडी –

हे महाराष्ट्र मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

७४) हायगम वेटलॅड कंझरव्हेशन रिझर्व्ह –

हे जम्मु व काश्मीर मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

७५) शालबुग वेटलॅड कंझरव्हेशन रिझर्व्ह –

हे जम्मु व काश्मीर मध्ये आहे याला २०२२ मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.

२०२२ मध्ये आॅगस्ट महिन्यात समाविष्ट करण्यात आलेली नवीन ११ रामसर स्थळे –

१)हायगम वेटलॅड कंझरव्हेशन रिझर्व्ह – जम्मु व काश्मीर

२) शालबुग वेटलॅड कंझरव्हेशन रिझर्व्ह – जम्मु व काश्मीर

३) ठाणे खाडी -महाराष्ट

४) कांजीरकुलम पक्षी अभयारण्य -तामिळनाडु

५) वडुवुरू पक्षी अभयारण्य -तामिळनाडु

६) सुचिंद्रम थेरूर वेटलॅड काॅम्पलेक्स- तामिळनाडू

७) चित्राकुडी पक्षी अभयारण्य – तामिळनाडू

८) यशवंत सागर -मध्य प्रदेश

९) अनसुपा सरोवर -ओडिसा

१०) हिराकुड जलाशय -ओडिसा

११) तांपारा सरोवर -ओडिसा