गुलाब लागवड – Rose Greenhouse Cultivation

गुलाब लागवड
हरितगृह

गुलाब लागवड -Rose Greenhouse Cultivation

जागतिक बाजारपेठेत गुलाब हे सर्वात म्हत्वाचे व्यापारी फुल म्हणून मानले जाते . युरोपात गुलाब या पिकास प्रचंड मागणी असून फुलांच्या मागणीत प्रथम क्रमांक लागतो.

तसेच भारतात बंगळुरू, पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, कोलकाता, दिल्ली, चंदीगड व लखनौ या शहरांभोवती गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

 • हायब्रीड टी (लांब दांडा व मोठी फुले)
 • फ्लोरीबंडा (आखूड दांडा व लहान फुले) प्रकारच्या फुलांना मोठी मागणी आहे.

हरितगृहात

 • लांब दांड्याच्या (4० ते १२० सें.मी.) मोठ्या फुलांचे १३० ते १५० फुले चौ.मी. एवढे उत्पन्न

आखूड दांड्याच्या (३० ते ७०) से.मी. छोट्या फुलांचे २०० ते ३५० फुले/चौ.मी. एवढे उत्पन्न मिळते

हवामान

 • गुलाब फुलाच्या योम्य वाढीसाठी दिवसाचे कमाल तापमान २० ते २५ अंश सें.ग्रे.
 • रात्रीचे किमान तापमान १६ ते १८ अंश सें.ग्रे. पर्यंत असावे.
 • तापमान वाढत गेल्यास अधिक उत्पादन मिळते पण फुलांची प्रतवारी बिघडते.
 • पाकळ्यांची संख्या कमी होते. फुले लवकर उमलतात व फुलांचे काढणीत्तोर आयुष्य कमी होते.
 • गुलाब फुल पिकासाठी १५०० ते २५०० पीपीएम पर्यंत कार्बन- डाय-ऑक्साइड वायूची पातळी लागते
 • ४००० लक्स ते ५००० लक्स इतका सूर्यप्रकाश आवश्यक असतो
 • सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ६० ते ७५ टक्क्यापर्यंत असावे.
 • अंशतः नियंत्रित हरितगृहामध्ये फॉगर, मिस्टरचा वापर महत्त्वाचा असतो. उन्हाळ्यात ५० टक्के पांढरे शेडनेट वापरून प्रकाशाची तीव्रता कमी करावी आणि पॉलीफिल्मवर चुन्याची फवारणी करावी.
 • हिवाळ्यात पॉलीफिल्मवरील धूळ, शेवाळ, चुना इ. धुऊन फिल्म स्वच्छ करावी जेणेकरून झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.

जमीन

 • लागवडीसाठी शक्यतो लाल रंगाची माती अतिशय उत्तम
 • मातीचा सामू ६.५ ते ७.० पर्यंत असावा व क्षारता १MS /CM उत्तम
 • लागवडीसाठी माध्यम म्हणून लाल माती ३० टक्के, शेणखत ३० टक्के, वाळू ३० टक्के व भाताचा तूस १० टक्के या प्रमाणात वापर करावा.
 • निजंतुकीकरणासाठी फॉरमॅलीन किंवा मिथील ब्रोमाइडचा वापर करावा.
 • पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड मरते.
 • हरितगृहाच्या लांबीप्रमाणे १ ते १.५ मीटर रुंदीचे, ३० सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत,
 • दोन वाफ्यात ५० ते ६० सें.मी. अंतर राखावे.
 • वाफ्यावरच्या दोन ओळीमध्ये 3० ते ४५ सें.मी. व
 • दोन रोपात १५ ते २० सें.मी. अंतर राखावे, अशा पद्धतीने लागवड केल्याने प्रति चौ.मी. क्षेत्रावव साधारणतः ६ ते ९ रोपे बसतात.
 • कोकोपीटमधील गुलाब लागवडीसाठी ३० सें.मी. व्यासाची कुंडी वापरावी. २० लीटर पाणी मावण्याइतके कुंडीचे आकारमान असावे,
See also  फ्लॅक्स सीडस म्हणजे काय?Flax seeds meaning in Marathi

खत व्यवस्थपान

जवळजवळ भारतातील सर्वच जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता आहे. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खतांची आवश्यकता भासते. लागवडीपूर्वी व लागवडीनंतर माती परीक्षण करून खताच्या मात्रा द्याव्यात.

कृषि महाविद्यालय, पुणे येथे झालेल्या संशोधनावरून,

 • १० किलो शेणखत + ३०:३०:२० ग्रॅम नत्रःस्फुरद:पालाश प्रति चौ.मी. क्षेत्रास द्रवरूपात लागवडीनंतर 3 आठवड्यांनी द्यावे,
 • नंतर एक महिन्याच्या अंतराने सुरुवातीला ४ महिने विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे पुढीलप्रमाणे द्यावीत,

नत्र, स्फुरद, पालाश, मिग. प्रतिझाड/ आठवडा

सेंद्रिय खत व्यवस्थापन : Rose Greenhouse Cultivation

लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड, २०० ग्रॅम/ चौ.मी./वर्षी तसेच गांडूळ खत ५०० ग्रॅम/चौ.मी./वर्षी या प्रमाणात द्यावे.

आंतर मशागत

 • फांद्या वाकविणे (बेंडींग) : गुलाबाच्या फांद्या जमिनीलगत ४५ अंश कोनात वाकविणे यालाच गुलाबामध्ये ‘बेंडींग’ असे म्हणतात. याचा मुख्य उद्देश म्हणजे पानातील अन्नद्रव्य जोमाने वाढणाऱ्या फांद्याकडे पाठविणे हा असतो.
 • कळ्या खुडणे (डिसबडिंग) : पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या कळ्या खुडल्यामुळे फुलदांड्याची व फुलाची गुणवत्ता सुधारते.
 • शेंडा खुडणे (टॉपिंग) : फांद्या सरळ व जोमाने वाढविणे हा उद्देश ठेवून फांदीवरील मुख्य कळी शेंड्यासह काढण्याच्या क्रियेला टॉपिंग म्हणतात.
 • डी-सकरिंग : डोळा भरल्यानंतर खुंटावर येणारे फुटवे काढण्याच्या प्रक्रियेस डी- सकरिंग म्हणतात. कोवळी फुटवे झाडातील अन्न मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे ते योग्य वेळी काढून टाकणे महत्त्वाचे असते.

पेरणीची वेळ

 • रोपाची लागवड शक्यतो मे-जून महिन्यात करावी. Rose Greenhouse Cultivation

पाणी व्यवस्थपान

 • हरितगृहातील गुलाबाला ठिबक सिंचनातून पाणी दिले जाते. त्यामुळे रोपांना हवे तेवढेच पाणी देता येते.
 • लागणारे पाणी हे तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश यावर अवलंबून असते.
 • पाण्याचा सामू ६.५ ते ७ दरम्यान असावा.
 • 600 ते 750 मि.ली. पाणी/चौ.मी./ दिवस द्यावे.
 • उष्ण व कोरड्या हवामानाच्या काळात पॉलीहाऊसमधील तापमान कमी करण्यासाठी मिस्टर्स व फॉगर यंत्रणा ठरावीक वेळेनंतर चालू करावी.

flower2

फुलांची काढणी

 • फुलांची काढणी शक्‍यतो सकाळच्या वेळी थंड वातावरणात करावी म्हणजे फुले जास्त काळ शीतगृहात ठेवावी लागत नाहीत.
 • फुलांची काढणी धारदार कात्रीने करावी.
 • कळी घट्ट असण्याच्या अवस्थेत, अर्धवट उमललेली पूर्ग रंग भरलेली आणि फुलदांडा सुमारे १५ ते २० इंच लांब असताना काढणी करावी.
See also  ऑनलाईन पद्धतीने ईपीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?How to check epf balance online in Marathi

काढणीत्तोर काळजी :फुलांची

 • फुले काढल्यानंतर १५ मिनिटात शीतगृहामध्ये न्यावीत. तेथील तापमान १० अंश सें.ग्रे. असावे व त्या ठिकाणी ती फुले १० तासापर्यंत ठेवावीत.
 • प्रिझवॅटीव्ह म्हणून पाण्यात ऐंल्युमिनियम सल्फेट टाकावे. या द्रावणात ३ तास फुले ठेवावीत व पॅकिंग हॉलचे तापमान १० अंश सें.ग्रे. च्या आसपास ठेवावे.
 • नंतर प्रतवारी करावी व प्रतवारीनंतर फुले पुन्हा याच द्रावणात किंवा क्लोरीनच्या पाण्यात ठेवावीत.
 • बादलीत ७ ते १० सें.मी. पर्यंत द्रावण असावे. या द्रावणात फुले पॅकिंग करेपर्यंत ठेवावीत.
 • जर वरील प्रिझर्वेटीव्ह उपळग्ध नसतील तर २०० लीटर पाण्यात ३ किलो साखर व ६ ग्रॅम सायट्रिक अँसिड मिसळून द्रावण तयार करावे व त्यामध्ये फुले ठेवावीत.

पॅकिंग

 • योग्य प्रतवारी केलेली फुले १० ते २० फुलांची एक जुडीयाप्रमाणे फुलांच्या जुडंया बांधाव्यात, त्यानंतर प्रत्येक जुडी पेपरमध्ये गुंडाळावी असे
 • पेपरमध्ये गुंडाळलेले बंच कोरुगेटेड बॉक्समध्ये भरावेत. बॉक्सला आतून पॉलिथिनचे लायनिंग असावे.
 • शीतगृह, प्रिकुलींग युनिट असावे. जेणेकरून बॉक्समधील गरम हवा लगेचच बाहेर काढता येईल.
 • शीतगृहातील तापमान २ अंश सें.ग्रे. पर्यंत असावे. बॉक्सचे तापमान शीतगृहाच्या तापमानाइतके होण्यास १० ते
 • १२ तास लागतात.
 • शीतगृहात ९० टक्क्याच्या आसपास आर्द्रता ठेवावी; म्हणजे फुलांचे डिहायड्रेशन होणार नाही.

उत्पादन-Rose Greenhouse Cultivation

 • अंशतः: नियंत्रित (-२) प्रकारच्या पॉली हाऊसमध्ये १५० ते. २५० फुले प्रति. चौ.मी, क्षेत्रातून तर
 • पूर्णतः नियंत्रित (-३) प्रकारच्या पॉलीहाऊस मधून ३५० ते ४०० फुले मिळतात.

Information source – Agri Department Maharashtra