आर एस- एस संघटन -RSS full form in Marathi
आपल्या देशात आज अनेक अशा संघटना आहेत.ज्या निस्वार्थपणे देशसेवेचे कार्य करीत आहेत.
मित्रांनो आज आपण अशाच एका देशातील प्रमुख संघटनेविषयी माहीती जाणुन घेणार आहोत जिचे नाव आर एस एस असे आहे.
आर एस एस ही एक अशी एकमेव संघटना आहे जी आपल्या देशात देशसेवेच्या,राष्टसेवेच्या कार्यात सदैव कार्यरत असलेली आपणास दिसुन येते.
चला तर मित्रांनो मग आजच्या लेखातुन जाणुन घेऊया ह्या आर एस एस विषयी अधिक सविस्तरपणे.
आर एस एस काय आहे?
आर एस एस म्हणजेच राष्टीय स्वयंसेवक संघ ही एक सामाजिक तसेच हिंदुत्ववादी स्वयंसेवी संस्था संघटना आहे.जी हिंदुत्ववादी तत्वांचे पालन करते.
आर एस- एसचा फुलफाँर्म काय होतो? (rss full form in marathi)
आर एस एसचा फुलफाँर्म राष्टीय स्वयंसेवक संघ असा होतो.
आर-एस एसची स्थापणा कोणी आणि केव्हा केली होती?
आर-एस एस म्हणजेच राष्टीय स्वयंसेवक संघ ह्या संघटनेची स्थापणा केशव बळीराम हेडगेवार यांच्या हस्ते करण्यात आली होती.
केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्टीय स्वयंसेवक संघाची स्थापणा केली होती.
भारतामध्ये आर एस एसच्या शाखा कुठे कुठे आहेत?
आज आर एस एसच्या शाखा भारतातील प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरात असलेल्या आज आपणास दिसुन येतात.
आर एस एसचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
आर एस एसचे मुख्य कार्यालय भारत देशातील नागपुर महाराष्ट येथे आहे.
आर एस एसचे मुख्य उददिष्ट काय आहे?
आर एस एस या स्वयंसेवी संघटनेचे प्रमुख उददिष्ट हे आपल्या राष्टाला खुशहाल आणि सुख समृदधीत ठेवणे,जातीव्यवस्थेमुळे दोन भागात विभागल्या गेलेल्या हिंदु धर्मियांना एकत्र आणने,हिंदु धर्मातील प्रथा परंपराचे संवर्धन करणे हे ह्या संघटनेचे प्रमुख उददिष्ट आहे.
आर एस एस जाँईन करण्याचे फायदे कोणकोणते आहेत?
आपल्यातील असे खुप जण असतात ज्यांना मनापासुन आर एस एस मध्ये भरती व्हायचे असते कारण आर एस एस मध्ये भरती होण्याचे आपणास फारसा वैयक्तिक तर नाही पण अनेक सामाजिक आणि राष्टीय लाभ प्राप्त होत असतात.
अड अडचणीत संकटामध्ये सापडलेल्या लोकांना जनतेला कशा पदधतीने निस्वार्थ भावनेने मदत करावी हे येथे आपणास शिकायला मिळते.
आर एस एस मध्ये हिंदु धर्मातील सर्व जाती तील लोक समाविष्ट असतात म्हणजेच इथे आपण जातीभेद विसरून हिंदु म्हणुन संघटित व्हायला शिकतो.
आर एस एस मध्ये भरती झाल्याने आपल्यात राष्टभक्तीची राष्टप्रेमाची भावना जागृत होत असते.
इथे रोजच्या रोज कडक शिस्तीने आपल्याकडुन सुर्यनमस्कार तसेच इतर शारीरीक कसरतीचे व्यायाम देखील करवून घेतले जात असतात ज्याने आपले शरीर देखील निरोगी राहते.आणि आपल्याला एक शिस्तप्रियता लाभत असते.
आणि सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे आपणास निस्वार्थ भावनेने राष्टाची समाजाची गोरगरीबांची जनतेची सेवा करण्याची एक अमुल्य संधी प्राप्त होते.
आर एस एसचा इतिहास काय आहे?
जेव्हा आर एस एसची स्थापणा करण्यात आली तेव्हा ह्या संघटनेमध्ये मोजुन फक्त सतरा सदस्य होते.पण आज ह्या संघटनेतील सभासद वर्गाची संख्या करोडोंच्या संख्येमध्ये असलेली आपणास दिसुन येते.
17 एप्रिल 1926 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) असे ह्या संघटनेचे नामकरण करण्यात आले होते.
जेव्हा ह्या संघटनेची स्थापना करण्यात आली तेव्हा केशव बळीराम हेडगेवार यांच्यासोबत विश्वनाथ केळकर,भाऊजी कावरे हे ह्या संघटनेचे सदस्य होते याचसोबत अण्णा साहणे,बालाजी हुद्दार,बापूराव भेदी हे देखील ह्या संघाचे सभासद होते.
अशा ह्या संघटनेमध्ये सहभागी झालेल्या काही प्रमुख व्यक्तींनी ह्या संघटनेचा सर्व नकाशा तयार केला आणि आज आपण बघु शकतो की आज ही संघटना आपल्या देशातील एक सगळयात मोठी संघटना म्हणुन ओळखली जाते.
आर एस एस संघटनेमध्ये भरती होण्यासाठी काय करावे?
मित्रांनो आपल्यातील खुप जण असे ज्यांना आर एस एसला जाँईन करायचे असते.म्हणुन खुप जण नेहमी हेच विचारत असतात की आर एस एसला जाँईन करण्यासाठी शैक्षणिक तसेच इतर पात्रतेच्या अटी काय आहेत.
तर ज्यांना आर एस एस जाँईन करायचे आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की इथे तशी पात्रतेची कुठलीही मोठी अट नसते.
आणि विशेष म्हणजे अठरा वयापेक्षा कमी वयोगटातील विदयार्थ्यांना ह्या संघटनेत सामावून घेण्यासाठी ह्या संघटनेकडुन विविध उपक्रम राबवले जात आहेत.ज्या उपक्रमादवारे ते आर एस एसला जाँईन करू शकतात.
आर एस एस जाँईन करण्यासाठी आपण दोन पदधतींचा वापर करू शकतो
1)आर एस एसच्या आँफिशिअल वेबसाईटवर जाऊन आधी सदस्य म्हणुन आपले नाव रेजिस्टर करून घ्यावे.त्यासाठी एक फा़र्म असतो तो आधी भरून टाकावा.इथे रेजिसट्रेशनसाठी आपल्याकडुन कुठलेही चार्जेस घेतले जात नाहीत.
मग नाव रेजिस्टर करून झाल्यानंतर काही दिवसात आपण आर एस एसचे सभासद झाले आहे असा संघटनेकडुन एक मँसेज पाठवला जातो.आणि मग आपण आपल्या राहत्या शहरात जिथेही आर एस एसची संघटना असेल तिथे जाऊन आपले मेंबर आयडी कार्ड प्राप्त करू शकतो.
2) आपण ज्या शहरात राहतो आहे त्या शहरात जिथेही आर एस एसची शाखा भरत असेल तिथे परत्यक्ष जाऊन सदस्य बनण्यासाठी आपली संपुर्ण माहीती असलेला एक फाँर्म भरून अर्ज करू शकतो.
आर एस एस जाँईन केल्यावर आपल्याला काही वेतन दिले जाते का?
खुप जण हा प्रश्न विचारत असतात की आर एस एस जाँईन केल्यावर त्याची मेंबरशीप घेतल्यावर आम्हाला काही महिन्याचे वेतन वगैरे पण दिले जाईल का?
मित्रांनो आर एस एस ही एक राष्टवादी संघटना आहे जी देशात राष्ट प्रेमाची राष्टभक्तीची भावना जागृत करण्याचे कार्य करते.आणि हे एक निस्वार्थ समाजसेवचे काम आहे जे आपण आपल्या इतर कौटुंबिक जबाबदारया सांभाळुन पार पाडुन देखील रिकाम्या वेळेत करू शकतो.ज्यासाठी आपणास संघटनेकडुन कुठलेही वेतन दिले जात नसते.
पण यात असे व्यक्ती देखील आहेत जे आपले घरदार सर्व कुटुंब घर सोडुन आपले संपुर्ण जीवन हे आर एस एसच्या राष्टसेवेच्या कार्यात समर्पित करून देत असतात.
अशा स्वयंसेवकांचा राहण्या खाण्याचा कपडे लत्ते इत्यादी बेसिक खर्च स्वता आर एस एस करत असते.पण त्यांना कुठलेही वेतन देत नसते.
तर मित्रांनो आशा बाळगतो की आपणास आपल्या ह्या प्रश्नाचे योग्य आणि समाधानकारक उत्तर नक्कीच प्राप्त झाले असेल.
आर एस एसचे प्रमुख कोण आहेत?
मोहन भागवत हे आर एस एसचे प्रमुख आहेत.
आर एस एसची आँफिशिअल वेबसाईट कोणती आहे?
आर एस एसची आँफिशिअल वेबसाईट https:/www.rss.org ही आहे.