सरकार बंदी – नेमकं काय असते? अमेरिकेतील एक गंभीर समस्या – Shutdown in America

सरकार बंदी – नेमकं काय असते? अमेरिकेतील एक गंभीर समस्या

आपण सध्या वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर टीव्ही वर बातमी ऐकत आहोत की अमेरिकेत शांत डाऊन होणार , सरकार बंदी येणार ?

ही सरकार बंदी नेमकं काय असते या लेखात आपण पाहणार आहोत.

अमेरिकेत सरकार बंदी (Shutdown) ही एक मोठी गंभीर समस्या आहे. सरकार बंदी म्हणजे फेडरल सरकारची कामे तात्पुरती थांबवली जातात. या बंदी मुळे अनेक अमेरिकन नागरिकांना ,संस्थांना आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते.

सरकार बंदी कधी होते? Shutdown in America

भारतात आपण पाहतो की दर वर्षी फेब्रुवारी माहित्यात आर्थिक संकल्प मांडले जातात आणि यात विविध क्षेत्रा करता जसे संरक्षण , शिक्षण , रस्तेविकास,,,,, येऊ घातलेल्या वर्ष साठी आर्थिक तरतूद करण्यात येते जेणेकरून विविध विकास योजना पार पाडण्यासाठी मदत होते. या आथिक तरतुदीला मग संसदेच्या दोन्ही सभागृहात मान्यता मिळवावी लागते.

तसेच अमेरिकेतील कायद्यानुसार, प्रत्येक वर्षी 1 ऑक्टोबरपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. या नवीन आर्थिक वर्षासाठी फेडरल सरकारला निधी मिळवण्यासाठी संसदेने कायद्यात तरतूद करणे आवश्यक असते. जर संसदेने निधी कायद्यात तरतूद केली नाही किंवा दोन्ही पक्षांमध्ये निधी कायद्यावर सहमती झाली नाही, आर्थिक तरतूद मंजून न झाल्याने सरकार बंदी होऊ शकते.

सरकार बंदीचा परिणाम कोणावर होतो?

सरकार बंदीचा बरेच वाईट परिणाम समाजावर होतात, अनेक अमेरिकन नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होतात, आर्थिक अडचणीना सामोरं जावं लागते. उदाहरणार्थ, अनेक सरकारी कर्मचारी कामावरून घरी बसावे लागते आणि त्यांना पगार मिळत नाही,दैनंदिन उदरनिर्वाह कठीण होतो. राष्ट्रीय उद्याने बंद केली जातात असल्यामुळे अनेक लोकांना मनोरंजन आणि विश्रांतीसाठी ठिकाण मिळत नाही. हवाई वाहतूक बंद असल्यामुळे, काही महत्त्वाचे काम असली, अर्जंट काम असली तरी अनेक लोकांना प्रवास करता येत नाही.इतकंच न्हवे तर सार्वजनिक आरोग्य सेवा बंद असल्यामुळे अनेक लोकांना आरोग्य सेवा मिळत नाही आणि मोठ्या अडचणी येऊ शकतात

See also  VEGGICARE-How to clean vegetables and fruits :Best solution

सरकार बंदीचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. सरकार बंदीमुळे अनेक संस्था मध्ये कामे थांबतात आणि याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर नकारात्मक परिणाम होतो.

सरकार बंदी कधीकधी काही दिवसांसाठी चालते किंवा काही महिन्यांच्यासाठीही चालू शकते. अमेरिकेमध्ये आजवर अनेक सरकार बंदी झाल्या आहेत.

सरकार बंदी टाळण्यासाठी काय करता येऊ शकते?

Shutdown in America
Shutdown in America

सरकार बंदी टाळण्यासाठी संसदेने निधी कायद्यावर वेळीच सहमती करणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांशी चर्चा करून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ,काही बाबीवर मतमतांतरे असतील तर योग्य ती पावलं उचलून शंका दूर केल्या पाहिजेत, विवादित असे मुद्दे दूर सरून . संसदेतील नेत्यांनी देशाच्या हिताच्या दृष्टीने काम केले पाहिजे.
.

सरकार बंदी ही अमेरिकेसाठी एक गंभीर समस्या आहे. सरकार बंदीमुळे अनेक नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते. सरकार बंदी टाळण्यासाठी संसदेतील नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने काम करावे.