श्रीलंका राजकीय संकट – Sri Lanka political crises in Marathi

श्रीलंका राजकीय संकट Sri Lanka political crises in Marathi

मित्रांनो आपणा सर्वानाच माहीत आहे की श्रीलंका देश हा सध्या खुप मोठया आर्थिक संकटात सापडला आहे.

म्हणजेच येथील महागाई आटोक्याच्या बाहेर चालली आहे.अणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या ह्या आर्थिक संकटांमुळे श्रीलंकेतील जनता अधिक आक्रमण होऊ लागली आहे.

ज्यामुळे आता श्रीलंकेत राजकीय संकट निर्माण होऊ लागले आहे.कारण श्रीलंकेतील ही आर्थिक परिस्थिती अजुनही आटोक्यात न आल्याने संतापलेली जनता आंदोलन करीत आहे.

अनेक जणांनी राष्टपती भवनाबाहेर गर्दी करायला आता सुरूवात केली आहे.आंदोलकांकडुन असा आरोप करण्यात येत आहे की श्रीलंका देशावर जे आर्थिक संकट ओढावले आहे.त्याला राजपक्षे यांचेच सरकार सर्वस्वी कारणीभुत आहे.

संतप्त नागरीकांनी राष्टपती भवनात वस्तुंची तोडफोड हिंसा देखील केल्याचे सांगितले जात आहे.

आंदोलन करणारया आंदोलकांची काय मागणी आहे?

राष्टपती भवनात तोडफोड करणारया आंदोलकांनी राष्टपती गोटाबाया राजपक्षे यांनी सुदधा महिंदा राजपक्षे यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करणारया जनतेकडुन केली जात आहे.

पण राष्टपतींनी यावर कुठलाही प्रतिसाद न दिल्याने श्रीलंकन जनता आता आक्रमक पवित्रा घेताना दिसुन येत आहे.याचकरीता कुठलीही जीवहानी होऊ नये म्हणुन श्रीलंकेत कफ्यु जारी करण्यात आलेला आहे.

श्रीलंकेतील आर्थिक संकटांचा थोडक्यात आढावा –
श्रीलंका ह्या देशातील वस्तुंच्या महागाईत दिवसेंदिवस घट न होता अधिक वाढ होत आहे.

वस्तुंची आयात करायला सरकारकडे पाहिजे तेवढे विदेशी चलन उपलब्ध नाही ज्याचे परिणामस्वरूप श्रीलंका देशातील सर्व नागरीकांना अनेक जीवनाश्यक वस्तुंचा तुटवडा भासत आहे.

पेट्रोल भरण्यासाठी देखील लोकांना दिवसभर लांबलचक रांगेत उभे राहावे लागत आहे.

ह्या सर्व बाबीस राजपक्षे सरकार कारणीभुत आहे असे श्रीलंकन जनतेचे म्हणने आहे.म्हणुनच राजपक्षे यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

पण राजपक्षे यांनी आपला राजीनामा न दिल्याने संतप्त जनतेने राष्टपती भवनात तोडफोड करायला सुरुवात केली आहे.

See also  आज आंतरराष्ट्रीय महिला दिन.. "महिला पोहोचू शकत नाहीत अशी कोणतीही उंची नाही".. गुगलने विशेष डूडल प्रकाशित केले!

प्रकरण हाताबाहेर जाऊ नये अणि कुठलीही जिवितहानी होऊ नये याकरीता श्रीलंकेत सध्या कोलंबो येथे कफ्युची घोषणा करण्यात आली आहे.

पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी देखील दिला आपल्या पदाचा राजीनामा -sri lanka pm Resighns in Marathi

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन पंतप्रधान पदाची धुरा रनिल विक्रमसिंघे यांनी सांभाळली होती पण आता त्यांनी देखील संतप्त जनतेच्या रोषापुढे हार पत्कारत आपल्या पदाचा आज शनिवारी 9 जुलै 2022 रोजी राजीनामा दिला आहे.

Leave a Comment