फिनमेन तंत्र : एक प्रभावी शिक्षण पद्धत – The Feynman Technique Art of Learning

फिनमेन तंत्र : एक प्रभावी शिक्षण पद्धत – Feynman Technique Art of Learning

शाळेत किंवा कॉलेज मध्ये मुलांना जर धडा किंवा मुद्दा योग्य रित्या समजवायचा असेल तर ,त्यामध्ये तो धडा शिकवणाऱ्या शिक्षकांचे योगदान मोलाचे असते ,मुलांना तो धडा समजून घेण्यासाठी त्या शिक्षकाची शिकवण्याची पद्धत महत्वाची असते.असाच एक प्रभावी शिक्षण पद्धती बद्दल म्हणजे फिन्मेन शिक्षण पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

फिनमेन तंत्र ही एक प्रभावी शिक्षण पद्धत आहे जी रिचर्ड फिनमन या नोबेल पुरस्कार विजेता असणाऱ्या भौतिकतज्ञाने विकसित केली. ही फिनमेन शिक्षण पद्धत रिचर्ड फिनमेन यांच्या जटिल संकल्पना स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. रिचर्ड फिनमेन यांनी शिकवण्यासाठी विकसित केलेले तंत्र जगभरातील लोकांकडून वापरले जाणारे एक लोकप्रिय शिक्षण धोरण बनले आहे.

फिनमेन शिक्षण पद्धत मध्ये चार मुख्य टप्पे आहेत – Feynman Technique Art of Learning

, फिनमेन शिक्षण पद्धतीमध्ये असणारे चार मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत :

१) निवडने –

तुम्हाला शिकवायचे असलेला एक कोणताही विषय निवडा.

२) समजून घेणे –

त्या विषयाची मूलभूत संकल्पना समजून घ्या.सर्वात सोप्या भाषेत तो विषय स्पष्ट करा . त्या विषयाची मूलभूत संकल्पना इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, जसे की तुम्ही तो मुद्दा किंवा विषय एका लहान मुलाला समजाऊन सांगत आहात.

३) तपासा –

तुमच्या स्पष्टीकरणाची तपासणी करा आणि तुम्हाला अद्याप समजत नसलेल्या कोणत्याही भागांवर काम करा.

फिनमेन तंत्रामुळे तुम्हाला तुम्ही शिकवत असलेल्या विषयावर अधिक चांगले प्रभुत्व मिळण्यास मदत होते ; कारण तुम्हाला तो मुद्दा समजून घेण्यासाठी आणि इतरांना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यामुळे तुम्हाला तुमच्या समजवण्यात कोणत्या त्रुटी आहे ,याची समज होते आणि तुम्हाला त्या त्रुटी दुरुस्त देखील करता येतात.

The Feynman Technique Art of Learning
The Feynman Technique Art of Learning

तुम्हाला जर फिनफेन शिक्षण पद्धतीचा वापर करायचा असेल तर ,फिनमेन तंत्राचा वापर करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील :


  1. तुम्ही सुरवातीला तुम्हाला हवा तो विषय निवडा ,ज्या विषयामध्ये तुम्हाला शिकवायचे आहे.या निवडलेल्या विषयामध्ये कोणताही विषय असू शकतो ,जसे की गणित ,भूमिती ,विज्ञान ,इत्यादी किंवा
  2. यामध्ये काही उपविषय देखील असू शकतात ,जसे की गुरुत्वाकर्षण .तर सर्वात आधी तुम्ही ह्या निवडलेल्या विषयाची संकल्पना समजून घ्या.तुम्हाला त्या विषयामध्ये असणारे महत्वाचे सिद्धांत समजले पाहिजेत.
  3. तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या आहे ,त्या गोष्टी किंवा ते मुद्दे तुम्हाला इतरांना समजावून सांगता यावेत.तुम्ही निवडलेल्या या विषयावर एक लहान व्याख्यान देऊ शकता, किंवा तुमच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता
  4. .तुम्हाला तर तुमचे स्पष्टीकरण परिपूर्ण वाटले नाही तर त्या स्पष्टीकरनामध्ये असणाऱ्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करा.
  5. फिनमेन तंत्राचा वापर करून, तुम्हाला कोणत्याही विषयावर चांगले प्रभुत्व मिळवता येते. याचा वापर तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या कामात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात करू शकता.
  6. फिनमेन तंत्राचा एक फायदा असा आहे की ,ते तुम्हाला तुमच्या समजवण्यातील किंवा समजण्यातील कोणत्याही त्रुटी शोधण्यामध्ये तुमची मदत करते. जेव्हा तुम्ही तुमच्या समजलेल्या गोष्टी इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला ही जाणीव होते की तुम्हाला काय समजले आहे आणि काय समजले नाही ते.
  7. यामुळे तुम्हाला तुमच्या समजण्यातील कमतरता दूर करण्यासाठी मदत होते.फिनमेन तंत्राचा दुसरा फायदा असा आहे की ,ते तुम्हाला विषयावर अधिक चांगले प्रभुत्व मिळवण्यास मदत करते.
  8. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाची मूलभूत संकल्पना समजून घेता आणि इतरांना ते समजावून सांगू शकता, तेव्हा तुम्हाला माहित असते की, तुम्ही त्या विषयावर चांगले प्रभुत्व मिळवले आहे.
See also  नवोदय प्रवेश परीक्षेत किती विषय असतात ?परीक्षेचे स्वरूप कसे असते? प्रवेशासाठी किती गुण आवश्यक ? Navodaya class 6 entrance exam information in Marathi

फिनमेन शिक्षण पद्धत ही एक प्रभावी शिक्षण पद्धत आहे, जी तुम्हाला कोणत्याही विषयावर चांगले प्रभुत्व मिळवण्यास मदत करू शकते.

आजच्या लेखामध्ये एका प्रभावी शिक्षण पद्धतीबद्दल म्हणजे “फिनमेन शिक्षण पद्धतीबद्दल “संपूर्ण माहिती आपण पाहिली.