टीपीएचा फुलफाँर्म काय होतो? TPA Full Form In Marathi

टीपीएचा फुलफाँर्म काय होतो? TPA Full Form In Marathi

जेव्हा आपण एखादा मेडिकल इंशुरन्स खरेदी करत असतो.तेव्हा आपला टीपीए सोबत संबंध येत असतो किंवा मेडिकल इंशुरन्स खरेदी करताना आपण टीपीए च्या संपर्कात तर नक्कीच येत असतो.

पण टीपीए म्हणजे नेमकी कोण असतो याचे काम काय असते?हे आपल्यातील मेडिकल इंशुरन्स खरेदी करत असलेल्या बरयाच बंधु आणि भागिनींना माहीत देखील नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण टीपीए विषयी सर्व सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याविषयी कुठलीही शंका राहुन जाणार नाही.

चला तर जाणुन घेऊया टीपीए विषयी अधिक सविस्तरपणे.

टीपीएचा फुलफाँर्म काय होतो? TPA Full Form In Marathi

टीपीएचा फुलफाँर्म Third Party Administrator असा होतो.

थर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय?थर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटर हा कोण असतो?(TPA Meaning In Marathi)

थर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटर म्हणजे आरोग्य विमा कंपनीचे प्रतिनिधित्व करणारा असा एक व्यक्ती वा संस्था (Agent) असतो.जी विमा खरेदी करत असलेला विमाधारक आणि विमा विकत असलेली कंपनी या दोघांमध्ये मध्यस्थी(Agent) म्हणुन काम करतो.

थर्ड पार्टी अ़ँडमिनिस्ट्रेटरचे मुख्य काम काय असते? Role Of TPA In Marathi

थर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटरचे काम विमा खरेदी करत असलेल्या कुठल्याही विमाधारकास क्लेम आणि सेटलमेंट च्या प्रक्रियेत मदत करणे हे असते.

See also  फ्लॅक्स सीडस म्हणजे काय?Flax seeds meaning in Marathi

यासाठी थर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटर जो एक मेडिकल इंशुरन्स एजंट असतो तो आपल्यासाठी एक कार्ड इशू करतो.

थर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटरने इशु केलेल्या ह्या कार्डच्या मदतीने आपणास म्हणजे मेडिकल विमा खरेदी करत असलेल्या कुठल्याही ग्राहकास,विमा धारकास,स्वतावर कुठलीही कँश न भरता,विदाऊट कँश म्हणजेच कँश लेस पदधतीने विमा कंपनीने सुचित केलेल्या एखाद्या क्लीनिकमध्ये,दवाखान्यात,हाँस्पिटलमध्ये उपचार करण्याची सुविधा प्राप्त होत असते.

यात आपण इतर हाँस्पिटलमध्ये देखील ह्या कार्डचा वापर करून खर्चाची परतफेड(Reimbursement) करण्याचा दावा करून उपचार घेऊ शकतो.

फक्त दावा करण्याआधी आपण थर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटरला याबाबद सुचित करणे गरजेचे असते.

टीपीएची निवड कोणाकडुन केली जाते?

टीपीएची निवड आरोग्य विमा कंपनी करत असते.

आपण कशा टीपीएची निवड करायला हवी? Which Type Of TPA We Have To Choose?

कुठल्याही टीपीएची निवड करण्याच्या आधी आपण त्याचा आधीचा परफाँर्मन्स चेक करायला हवा.जे टीपीए फार जुने असतात त्यांच्याकडे भरपुर रूग्णालयाच्या नावांची यादी पडलेली असते.

म्हणुन ह्या भल्यामोठया यादीतुन कुठलेही एक हाँस्पिटल निवडताना आपण कुठले हाँस्पिटल आपल्याला आपल्या घरापासुन जवळ पडेल आणि तिथे आपल्यावर उपचार देखील चांगल्या पदधतीने होईल याचा विचार करायला हवा.

असे टीपीए जे डिजिटल आणि एआयमध्ये अधिक गुंतवणूक करीत असतात ते आपणास अधिक फायदेशीर ठरत असतात कारण यात क्लेम सेटल मेंट प्रोसेसमध्ये देखील आपणास कमी वेळ लागत असतो.

काही अत्यंत प्रसिदध टीपीए आरोग्य विम्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत-(Best Health Insurance TPA In Marathi)

● रक्षा टीपीए प्रा.लि

● युनायटेड हेल्थ केअर पारेख टीपीए प्रा.लि

● पार्क मेडिक्लेम टीपीए प्रा.लि

● मेडिकेअर टीपीए सर्विसेस प्रा.लि

● फोकस हेल्थ सर्विस टीपीए प्रा.लि

टीपीएचे फायदे किती आणि कोणकोणते असतात?(Advantages Of TPA In Marathi)

टीपीएचे पुढीलप्रमाणे काही महत्वाचे फायदे असतात-

● मेडिकल इंशुरन्समधील क्लेम आणि सेंटलमेंटशी संबंधित कुठलीही बाब हाताळण्याचे काम टीपीए करत असते.

See also  जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस माहिती - World brain tumor day information in Marathi

● कमीत कमी इंशुरन्स प्रिमियम

● आपल्याला 24 तास मार्गदर्शन करण्यासाठी स्वताचा एक टोल फ्री नंबर टीपीए कडुन आपणास दिला जातो.

टीपीएचे नियमन करण्याचे काम कोण करते(Who Regulates TPA In Marathi)

टीपीए ही एक कंपनी तसेच एजंसी असते जिला आय आर डीए(Insurance Regulatory Development Authority)कडुन क्लेम प्रोसेस पाडण्यासाठी परवाना दिला गेलेला असतो.