भगवान विश्वकर्मा यांनी जयंती -Vishwakarma Divas in Marathi

Vishwakarma Divas in Marathi –भगवान विश्वकर्मा यांनी जयंती


धार्मिक मान्यतांच्या मते , भगवान विश्वकर्मा हे सृष्टीच्या निर्माणतेचे देवता आहेत , त्यामुळे दरवर्षी भारतातील हिंदू धर्मातील लोक विश्वकर्मा जयंती साजरी करतात आणि यावेळी ते आपल्या कंपनी, कारखाना , दुकाने यांमधल्या मशीन ची पूजा करतात.आपण आजच्या लेखामध्ये भगवान विश्वकर्मा जयंती बद्दल आणि भगवान विश्वकर्मा जयंती दिवशी करावयाची पूजा विधी बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.


तुम्हाला रामायण मधील रावण नक्की माहित असेल, रावण ज्या सोन्याच्या लंकेत राहत होता ,ती सोन्याची लंका भगवान विश्वकर्मा यांनी निर्माण केली होती. याचसोबत भगवान विश्वकर्मा यांनी देवलोक, द्वापार युगात भगवान श्री कृष्ण यांची द्वारका नगरी ,आणि महाभारत काळातील इंद्रप्रस्थ, इत्यादी ची निर्मिती त्यांनी केली होती.


Vishwakarma Jayanti – विश्वकर्मा जयंती आज म्हंजे १७ सप्टेंबर रोजी रविवारी आहे. हिंदू पंचांग नुसार विश्वकर्मा यांचा प्रगट दिवस हा दर वर्षीच्या कन्या संक्रांती दिवशी साजरा केला जातो.ह्या विश्वकर्मा जयंती दिवशी भगवान विश्वकर्मा यांची भारतामध्ये, तसेच जगातील हिंदू घरांमध्ये पूजा- अर्चना केली जाते.

दरवर्षी सृष्टीचे सर्वात मोठे आणि अद्भुत शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रानुसार भगवान विश्वकर्मा हे या सृष्टीचे पाहिले शिल्पकार, वास्तुकार आणि इंजिनिअर आहेत.

आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार जेव्हा भगवान ब्रम्हा जींनी या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली ,तेव्हा त्यांनी या सृष्टीच्या निर्मानाची जबाबदारी भगवान विश्वकर्मा यांना दिली. हिंदू धर्मातील शास्त्रानुसार भगवान विश्वकर्मा हे सृष्टीच्या निर्माते असणाऱ्या भगवान ब्रम्हा जींचे सातवे पुत्र आहेत.

See also  CVV क्रमांक काय आहे? CVV Information in Marathi -CVV Full form


दर वर्षी भारतामध्ये विश्वकर्मा जयंती दिवशी देशातील छोट्या मोठ्या दुकानातील, कंपनीतील अवजारे, विशेष करून तेथील यंत्रे आणि दुकान, कारखाना यांची पूजा केली जाते. भगवान विश्वकर्मा यांना यंत्रांचे देवता देखील म्हणले जाते.

हिंदू धर्मातील मान्यता नुसार प्राचीन काळा मध्ये देवी देवतांची महले भगवान विश्वकर्मा यांच्या द्वारेच तयार केली जात होती, त्यामुळे भगवान विश्वकर्मा यांना निर्मानतेचे देवता देखील म्हणले जाते.

भगवान विश्वकर्मा यांनी जयंती -Vishwakarma Divas in Marathi
भगवान विश्वकर्मा यांनी जयंती -Vishwakarma Divas in Marathi


हिंदू धर्मातील मान्यता नुसार भगवान विश्वकर्मा यांनी इंद्रलोक , त्रेता युगात रावणाची सोन्याची लंका, द्वापार युगात भगवान श्री कृष्णा ची द्वारका नगरी, तसेच इंद्रप्रस्थ आणि कलियुगात जगन्नाथ पुरी ची निर्मिती केली होती. याचरोबर भगवान विश्वकर्मा यांनी महादेवांचे त्रिशूळ, पुष्पक विमान, इंद्र देवांचे वज्र,आणि भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र तयार केले होते.


हिंदू धर्मातील मान्यता नुसार भगवान विश्वकर्मा हे प्रत्येक युगातील निर्माणतेचे देवता आहेत.आपल्या या सुदंर अशा सृष्टीमध्ये जेवढ्या गोष्टी चमत्कारिक आहे, त्या सर्व भगवान विश्वकर्मा यांनी तयार केल्या आहेत, अशी मान्यता आहे.त्यामुळे जे लोक निर्मानतेचे कार्य करतात, ते लोक भगवान विश्वकर्मा यांची पूजा करतात.

Vishwakarma Puja 2023: 17 सितंबर ला विश्वकर्मा जयंती आहे, जाणून घेवूया

भगवान विश्वकर्मा यांची पूजाविधि, महत्व आणि पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त –

भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेचे महत्व –


धाम्रिक मान्यता नुसार सृष्टीच्या निर्मानतेचे देवता भगवान विश्वकर्मा आहेत, त्यामुळे भगवान विश्वकर्मा जयंती आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.काही लोक या जयंती दिवशी आपल्या वाहनांची देखील पूजा करतात. अशी मान्यता आहे की , भगवान विश्वकर्मा जयंती दिवशी जर कंपनीतील यंत्रांची पूजा केली तर मनोकामना पूर्ण होते. व्यवसायामध्ये प्रगती येते. भगवान विश्वकर्मा यांची पूजा केल्यानंतर व्यवसायात आणि निर्माण कार्यात येणाऱ्या समस्येचा नायनाट होतो, कंपनी मधे असणारी यंत्रे पुढील वर्ष पर्यंत सुरळीत कामे करतात.

See also  महाराष्ट्र राज्याविषयी महत्वपुर्ण माहिती - Maharashtra information in Marathi

भगवान विश्वकर्मा जयंती दिवशी केली जाणारी पूजा विधि खालीलप्रमाणे असते:


सगळ्यात पहिले तुम्ही विश्वकर्मा जयंती दिवशी लवकर उठा आणि अंघोळ करा आणि शक्य असेल तर नवीन कपडे घाला. त्यानंतर तुमच्या दुकानातील, कंपनीतील किंवा कारखान्यातील असणाऱ्या यंत्रांची साफसफाई करा आणि तिथे भगवान विश्वकर्मा यांची मूर्ती स्थापित करा.

त्यानंतर पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की, अक्षता, फुल,मिठाई इत्यादी साहित्य विश्वकर्मा यांच्या स्थापित केलेल्या मुर्तीपुढे ठेवा.

त्यानंतर भगवान विश्र्वकर्मा यांची आरती करा आणि पूजा करताना “ॐ विश्वकर्मणे नमः” हा मंत्र म्हणा. आणि सर्वात शेवटी प्रसाद एकमेकांना वाटा.


आजचा लेखामध्ये आपण भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीचे महत्व पाहिले आणि त्यांच्या जयंती दिवशी करावयाची पुजे बद्दल माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहिली.