पंतप्रधान मुद्रा लोन घेऊन आजच चालू करा तुमचा व्यवसाय –MUDRA LOAN
पंतप्रधान मुद्रा लोन च्या मदतीने आजच मिळवा १० लाख पर्यंतचे लोन आणि आपले स्वप्न साकार करा –
आपल्या देशामध्ये बरीच लोकं नोकरी करतात आणि क्वचितच लोक असतात,जे की व्यवसाय करतात. आपल्या देशातील जास्तीत जास्त व्यावसायिक वाढावे, नवीन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय मध्ये फायदा व्हावा ,या साठी आपल्या भारत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मुद्रा लोन योजनेची स्थापना केली.
या मुद्रा लोन योजने अंतर्गत देशातील नागरिकांना १० लाख पर्यंतचे लोन मिळणार आहे.या मिळालेल्या १० लाख पर्यंतच्या लोन चा वापर करून भारतातील नवीन व्यावसायिक नवीन व्यवसाय टाकतील किंवा जे असे व्यावसायिक आहेत ज्यांचा छोटा व्यवसाय आहे,ते या लोन च्या मदतीने त्यांच्या छोट्या व्यवसायाला मोठ्या व्यवसायामध्ये परिवर्तित करतील.
तर आजच्या लेखामध्ये आपण मुद्रा लोन विषयी सर्व माहिती पाहणार आहोत,जसे की मुद्रा लोन साठी पात्रता काय आहे ? , मुद्रा लोन चा उद्देश्य काय आहे ?,
मुद्रा लोन साठी apply करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट असायला हवी ? आणि मुद्रा लोन साठी कशा पद्धतीने apply करायचे ? यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
माइक्रो यूनिट्स डेवलपमेंट आणि रिफाइनेंस एजेंसी (MUDRA) लोन योजना ही भारत सरकारची एक चांगली लोन योजना आहे.या योजने अंतर्गत देशातील लघु उद्योगाला प्रोत्साहन मिळेल आणि देशातील खूप लोक या योजनेचा लाभ घेऊन नवीन व्यवसाय टाकतील.
भारत सरकारच्या मुद्रा लोन योजनेचे तीन प्रकार आहेत,
- प्रकार म्हणजे शिशु (ज्यात सरकारकडून ५०,००० पर्यंतचे लोन मिळेल),
- दुसरा प्रकार म्हणजे किशोर योजना(ज्यामध्ये सरकारकडून ५०,००१ पासून ५,००,००० पर्यंतचे लोन मिळेल), यातील
- तिसरा प्रकार म्हणजे तरुण (ज्यामधे सरकारकडून ५ लाख ते १० लाखरुपयांपर्यंतचे लोन मिळेल). मुद्रा योजनेच्या या तीन प्रकारापासून भारतातील विविध वयो गटातील लोकांना त्याचा फायदा होईल. जेणेकरून देशातील विविध वयो गटातील लोक या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा फायदा घेऊ शकतील.
प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेचे उद्देश्य काय आहे ?
प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेचे प्रमुख उद्देश्य हे आहे की, “देशातील लोकांना ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यामध्ये मदत करणे”.या मुद्रा लोन योजनेचे अजून एक उद्येश्य हे की, “देशातील लोकांना आर्थिक मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनवणे.”
पंतप्रधान मुद्रा लोन योजनेसाठी apply करण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स आणि मर्यादा –
१) ज्या व्यक्तीला या पंतप्रधान मुद्रा लोन योजनेमध्ये apply करायचे आहे, अशा व्यक्तीचे वय १८ पेक्षा जास्त असले पाहिजे.
२) आधार कार्ड
३) Pan कार्ड
४) निवेदकाचा राहणारा पत्ता
५) Income Tax Returns आणि Self tax Returns
६) बिजनेस पत्ता
७) मागील तीन वर्षाचे balance शिट
८) पासपोर्ट साइज फोटो
पंतप्रधान मुद्रा लोन योजनेसाठी ऑनलाइन apply कशा पद्धतीने करायचे ?
१) तुम्ही या मुद्रा लोन योजनेसाठी apply करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या ऑफिसियल साईट वरती जा
२) त्यानंतर तुम्हाला एक आर्टिकल दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करा.
३) त्यानंतर तुमच्या पुढे नवीन पेज ओपन होईल.
४) त्यानंतर तुम्ही मुद्रा लोन योजनेचा योग्य प्रकार निवडा आणि आपला मोबाईल नंबर टाकून,OTP टाकून रजिस्टर क्रा.
५) त्यानंतर तुम्ही प्रोसेस पर्याया वरती क्लिक करा.
६) त्यानंतर तुमच्या पुढे ओपनिंग रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
७) त्यानंतर तुम्ही Entrepreneur Registration Form वर विचारलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून तो फॉर्म सबमिट करा.
८) त्यानंतर तुम्हाला एक संदेश भेटेल. परत तुम्ही Process Option वरती क्लिक करा.
९) त्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती नवीन पेज ओपन होईल.
१०) त्यानंतर पुढच्या पेज वरती तुम्हाला ऑनलाइन एप्लीकेशन सेंटर अप्लाई चा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करा.
११) त्यानंतर नवीन पेज वरती तुम्ही तुम्हाला गरज आहे तेवढे लोन रक्कम सिलेक्ट करा आणि apply now पर्यायावरती क्लिक करा.
१२) त्यानंतर पुढच्या पेज वरती तुम्हाला निवेदन फॉर्म दिसेल, तो निवेदन फॉर्म तुम्ही व्यवस्थित रित्या भरा आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
१३) शेवटी परत होम पेज वरती येईन सबमिट ॲप्लिकेशन वरती क्लिक करा.
१४) तुमचे पंतप्रधान लोन मुद्रा योजनेसाठी निवेदन सबमिट होईल.