इंशुरन्स पाॅलिसी मध्ये कोपेमेंट काय असते?What is copayment in insurance policy
कोमेपेंट हा पाॅलिसी धारकास क्लेम अमाऊंट मधील भरावा लागत असलेला काही टक्के रक्कमेचा भाग असतो.
यात पाॅलिसी धारकाला क्लेम अमाऊंट मधील काही विशिष्ट टक्के रक्कम ही स्वताच्या खिशातुन भरावी लागते.हया रक्कमेलाच कोपेमेंट किंवा कोपे इन इंशुरन्स असे म्हटले जाते.
जेव्हा आपण एखादी मेडिक्लेम पाॅलिसी खरेदी करत असतो.अणि त्यानंतर आजारी पडल्यावर काही अपघात वगैरे झाल्यावर दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत असतो.
तेव्हा दवाखान्यात आपल्यावर सर्व उपचार करून झाल्यावर डिस्चार्ज घेताना जे फायनल बिल हाॅस्पिटल मध्ये भरावे लागते त्यातील सर्व रक्कम इंशुरन्स कंपनी भरत नसते
त्या फायनल बील मधील काही टक्के रक्कम ही पाॅलिसी धारकाला स्वताच्या खिशातुन भरावी लागत असते.हयाच काही टक्के रक्कमेला इंशुरन्स पाॅलिसी मध्ये कोपेमेंट असे म्हटले जाते.
पाॅलिसी धारकाला हाॅस्पिटल मधील बिलाचा हा अर्धा खर्च म्हणजेच कोपेमेंट किती करावे लागेल हे काही टक्केवारी मध्ये ठरवले जात असते.
ही टक्केवारी १० टक्के किंवा २० टक्के अशा पद्धतीने निर्धारित करण्यात येत असते.ही कोपमेंटची रक्कम किती टक्के असेल हे पाॅलिसी धारकाला पाॅलिसी खरेदी करत असताना इंशुरन्स कंपनीकडुन करारा दरम्यान सांगितले जात असते.
कोपेंटची ही टक्केवारी admissible claim amount स्वीकार्य दाव्याच्या रक्कमे वरून लागु केली जात असते.
Admissible claim amount काय असते?
- पाॅलिसी धारकावर दवाखान्यात जे काही उपचार केले जात असतात त्या उपचारातील काही विशिष्ट खर्च हा हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडुन पाॅलिसी धारकाला दिला जातो.
- पण काही विशिष्ट खर्च हा असा असतो जो हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडुन पाॅलिसी धारकाला दिला जात नाही.
- उदा,प्रशासकीय खर्च (administrative charges)
वैयक्तिक सोयीसाठी भरायचे शुल्क (charge for personal comfort),काॅसमॅटिक खर्च इत्यादी. - हया वरील सर्व दवाखान्यातील वैयक्तिक खर्चाला अस्वीकार्य खर्च जो हेल्थ इन्शुरन्स पाॅलिसी मध्ये कंपनीकडुन कव्हर केला जात नाही त्यालाच not admissible charges असे म्हटले जाते.
- अणि हा सर्व अस्वीकार्य खर्च हाॅस्पिटल मधील फायनल बील मधून वजा करून झाल्यावर हाॅस्पिटलच्या बील मधील जी रक्कम शिल्लक राहते त्या रक्कमेला स्वीकार्य दाव्याची रक्कम (admissible claim amount) असे म्हटले जाते.यावरूनच कोपेमेंट कॅल्क्युलेट केले जाते.
म्हणजेच दवाखान्यातील उपचाराचा सर्व अस्वीकार्य खर्च जो पाॅलिसी मध्ये कव्हर केला जात नाही तो अणि कोपेमेंटचे विशिष्ट टक्केवारी असलेले अमाऊंट हे पाॅलिसी धारकाला आपल्या खिशातुन भरावे लागते.
बाकी उरलेल्या रक्कमेला हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडुन भरण्यात येत असते.कोपेमेंट हे सर्व हेल्थ इन्शुरन्स पाॅलिसी मध्ये नसते.
पाॅलिसी धारकाकडुन कोपेमेंट का घेतले जाते?
पाॅलिसी धारकाने महागड्या हाॅस्पिटल मधून आपल्या आजारावर उपचार करू नये यासाठी हेल्थ इन्शुरन्स कंपनी काही टक्के कोपेमेंट आकारत असतात.याने पाॅलिसीचा प्रिमियम देखील कमी राहत असतो.
जेव्हा पाॅलिसी धारक आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी एखाद्या दवाखान्यात दाखल होत असतो तेव्हा त्याने खुप महागड्या सोयीसुविधा असलेल्या उपचाराची संसाधनांची निवड करू नये.यासाठी हे कोपेंटच आकारले जाते.
उदा, समजा एखाद्या हेल्थ इन्शुरन्स पाॅलिसी धारकाची विम्याची रक्कम २ लाख इतकी आहे.ज्यात कोपेमेंट २० टक्के इतके आकारण्यात आले आहे.
अशावेळी पाॅलिसी धारकाला उपचारातील २० टक्के रक्कम खिशातुन भरावी लागत असल्याने त्याला नक्की विचार करावा लागेल की आपल्यावर उपचार करण्यासाठी आपण कोणत्या दवाखान्याची निवड करायला हवी, आपल्या आर्थिक बजेट नुसार हाॅस्पिटल मधील कोणता रूम उपचारासाठी सिलेक्ट करायला हवा कोणत्या हाॅस्पिटल मधील कोणत्या सोयीसुविधा आपल्यावर उपचार करण्यासाठी योग्य अणि पुरेशा आहेत.