झिरो डेप इंशुरन्स म्हणजे काय zero dep insurance in car

झिरो डेप इंशुरन्स म्हणजे काय zero dep insurance in car

झिरो डेप इंशुरन्स तसेच झिरो डेप्रिसिएशन इंशुरन्स हा एक अॅड आॅन इंशुरन्स असतो.यालाच आपण अतिरिक्त इंशुरन्स देखील म्हटले जाते.

याच्यामुळे आपले वाहन कितीही जुने झाले तरी देखील आपल्याला विम्याची पुर्ण रक्कम प्राप्त होत असते.

  • जेव्हा आपल्या वाहनाचा अपघात होतो अणि आपण आपल्या वाहनाची नुकसान भरपाई करण्यासाठी इंशुरन्स क्लेम करत असतो.
  • तेव्हा विमा कंपनी आपल्याला वाहनाची पुर्ण रक्कम देत नसते आपल्या वाहनाच्या वयानुसार ही रक्कम दिली जात असते.यासाठी आपल्या वाहनाच्या मुळ किंमतीमधुन डेप्रीसिएशनची रक्कम वजा केली जात असते.
  • थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपले वाहन जितके नवीन असेल तेवढी अधिक विम्याची रक्कम यात आपणास प्राप्त होत असते.
  • अणि आपले वाहन जितके जुने असेल तेवढी विम्याची रक्कम इंशुरन्स मध्ये दिल्या जात असलेल्या रक्कमे मधुन कमी केली जाते.हे सर्व घडुन येत असते वाहनाच्या मुल्यातुन घसारा कमी करण्यात आल्यामुळे.

पण याचठिकाणी आपण आपल्या वाहनाच्या विम्यासोबत झिरो डेप इंशुरन्स देखील खरेदी केलेला असेल तर आपल्याला क्लेम केल्यावर प्राप्त होत असलेल्या कार इन्शुरन्स रक्क्मेत कुठलीही घट होत नाही.

म्हणजेच आपले वाहन जुने असल्यामुळे आपल्या वाहनाच्या विम्याची रक्कम कमी केली जात नाही.याचसोबत आपणास आपल्या वाहनाच्या सर्व पार्टसच्या नुकसानीचा खर्च देखील यात दिला जात असतो.

म्हणुन ह्या इंशुरन्सला झिरो डेप इंशुरन्स किंवा झिरो डेप कव्हरेज असे म्हटले जाते.

झिरो डेप इंशुरन्स म्हणजे काय zero dep insurance in car
झिरो डेप इंशुरन्स म्हणजे काय zero dep insurance in car

कार डेप्रेसिएशन म्हणजे काय?

आपल्या घरातील वस्तू खरेदी केलेले कुठलेही सामान जसजसे जुने होत जातात त्यांची किंमत देखील कमी होत जाते.

  • कारण जसजशी ती वस्तू जुनी होते तिच्यात बिघाड निर्माण होऊ लागतो तिचा वरील लुक देखील नवीन राहत नाही.त्या वस्तुला गंज चढु लागतो.
  • एकदम त्याचप्रमाणे आपण शोरूम मधून खरेदी केलेले नवीन वाहन जसजसे जुने होत जाते तसतशी त्याची किंमत देखील कमी कमी होत जाते यालाच वाहनाच्या किंमतीत झालेली घट म्हणजेच कार डेप्रेसिएशन असे म्हटले जाते.
  • आपल्या वाहनाच्या किंमतीत घट झाल्याने त्याच्या इंशुरन्स रक्कम मध्ये देखील इंशुरन्स कंपनी कडुन ह्या डेप्रिसिएशन नुसार कपात केली जात असते.
See also  पॅन कार्डचा फुलफाॅम काय होतो - Pan card Full form in Marathi

झिरो डेप इंशुरन्स घेणे कोणासाठी अधिक महत्वपूर्ण आहे?

१)नवीन कार घेतलेले व्यक्ती –

ज्यांनी नवीनच एखादी कार खरेदी केली आहे अशा कार मालकाने झिरो डेप इंशुरन्स घेणे गरजेचे आहे.कारण जेव्हापासून आपण वाहन खरेदी करतो त्यादिवसापासुन आपल्या वाहनाच्या घसारयात घट होण्यास सुरुवात होत असते.

  • अणि अशातच आपले वाहनाला अपघात झाला किंवा ते डॅमेज झाले तर आपल्याला क्लेम केल्यावर कमी इंशुरन्सची रक्कम दिली जाते.कारण आपण झिरो डेप इंशुरन्स घेतलेला नसतो.
  • पण जर आपण हा झिरो डेप इंशुरन्स घेतलेला असेल तर आपणास वाहनाच्या विम्याची पुर्ण रक्कम दिली जाते अणि वाहनाच्या पार्टसचे जे काही नुकसान झाले असेल हे सर्व नुकसान देखील यात कव्हर केले जाते.

२) ज्यांच्याकडे महागडी कार आहे –

  • ज्या व्यक्तींनी अतीशय महाग अणि खर्चिक कार खरेदी केली आहे त्यांच्यासाठी झिरो डेप इंशुरन्स घेणे गरजेचे आहे.
  • कारण महागड्या अलिशान खर्चिक कारचे पार्टस देखील महाग असतात अणि अशातच कारचा अपघात वगैरे झाला तर हा गाडीचे नवीन महगडे पार्टस बसवणे वाहनाची संपूर्ण दुरूस्ती करणे हा सर्व महागडा खर्च आपल्याला खिशातुन करावा लागत असतो.
  • अशावेळी आपणास जर विम्याची पुर्ण रक्कम प्राप्त झाली तर आपल्याला बरयापैकी आर्थिक हातभार लाभतो.म्हणुन विम्याची पुर्ण रक्कम प्राप्त करण्यासाठी आपण झिरो डेप कव्हरेज प्राप्त करणे आवश्यक असते.

३) अपघाती क्षेत्रात राहत असलेल्या व्यक्ती –

जे व्यक्ती अपघाती क्षेत्रात वास्तव्यास राहत अशा व्यक्तींचा अपघात होण्याची अधिक शक्यता असते.अशा व्यक्तींनी झिरो डेप कव्हरेज प्राप्त करणे अधिक महत्वाचे ठरते.

४) नवीन वाहनचालक –

जे व्यक्ती ड्रायव्हर लाईन मध्ये आहेत अणि नवीनच वाहन चालवायला शिकत आहेत अशा व्यक्तींकडून गाडी शिकत असताना अपघात होण्याची गाडी चालवताना एखाद्याशी भांडण होऊन गाडीची तोडफोड होण्याची,एखाद्या गाडीला धडक देण्याची अधिक शक्यता असते.

See also  Telecentre Entrepreneur Courses (TEC)

अशा परिस्थितीत देखील आपल्याकडे झिरो डेप इंशुरन्स असणे आवश्यक आहे.जेणेकरून वाहनाचे कुठलेही नुकसान झाले तर आपणास वाहनाची पुर्ण रक्कम प्राप्त होईल.

५) जुने वाहन चालक –

जुन्या वाहनांवर इंशुरन्स कंपनी झिरो डेप कव्हरेज देत नसतात कारण ही वाहने लवकर बिघडण्याची खराब होण्याची शक्यता असते.

अशा जुन्या वाहनांमुळे अपघात देखील घडुन येऊ शकतो.पण आपल्या जुन्या कारवर झिरो डेपरीसिएशन कव्हरेज प्राप्त होत असेल तर अधिक उत्तम कारण वाहन छोट असे किंवा मोठे जुने असो किंवा नवे दुरुस्ती करीता खर्च हा लागतच असतो.

जुन्या वाहनाच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च येत असतो अशा परिस्थितीत कंपनीकडुन विम्याची पुर्ण रक्कम प्राप्त झाली तर खुप मदत होते.

वाहनाचे डेपरिसिएशन कसे मोजले जाते?

कुठल्याही वाहनाचे डेपरिसिएशन मोजण्यासाठी ते वाहन किती जुने आहे त्याची आयु काय आहे हे बघितले जाते तसेच सध्या त्याची बाजारातील किंमत काय आहे यावरून वाहनाचे डेपरिसिएशन कॅल्क्युलेट केले जाते.

वाहनाचे डेपरिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी कंपनी वाहनाच्या पार्टसचे देखील मुल्यमापन करत असते.अणि मग त्यानुसार दाव्यातुन घसारा किंमतीत घट केली जात असते.

वाहन जुने झाल्यावर डेपरीसिएशन कट करण्याचे दर –

१० वर्ष जुन्या वाहनांवर ५० टक्के,५ ते १० वर्ष जुन्या वाहनांवर ४० टक्के,४ ते ५ वर्ष जुने वाहन ३५ टक्के,३ ते ४ वर्ष जुन्या वाहनांवर २५ टक्के,२ ते ३ वर्ष इतक्या जुन्या वाहनांवर १५ टक्के,१ ते २ वर्ष जुन्या वाहनांवर १० टक्के,६ महिने ते एक वर्ष जुन्या वाहनांवर ५ टक्के इतके डेपरिसिएशन दर आकारले जाते.

पण याच ठिकाणी आपले वाहन ६ महिने जुने आहे तर आपल्याला कुठलेही डेपरिसिएशन रेट लागु केले जात नाही.

जर आपल्या वाहनाला अपघात झाल्यावर वाहनाचे काही विशिष्ट पार्टच डॅमेज झाले असतील पुर्ण वाहन डॅमेज झाले नसेल तर वाहनाच्या पार्टसवरून त्याचे घसारा दर ठरविण्यात येत असते.

See also  मातृत्व दिनासाठी स्पेशल गिफ्ट आयडिया - Mothers day special gift ideas 2023 in Marathi

Leave a Comment