ncb- नो क्लेम बोनस म्हणजे काय? कसा मिळवाल?- No claim bonus in vehicle insurance policy information

नो क्लेम बोनस म्हणजे काय? No claim bonus in vehicle insurance policy information

कार इन्शुरन्स पॉलिसी मध्ये एनसीबीचा फुलफाॅम no claim bonus असा होत असतो.

नो क्लेम बोनस ही एक सुट,सवलत तसेच बक्षिस आहे जे गाडीच्या मालकाला कार विमा कंपनीकडुन देण्यात येत असते.

पाॅलिसी कालावधी दरम्यान जर गाडीच्या मालकाने गाडी व्यवस्थित चालवली गाडी चालवताना कुठल्याही प्रकारचा अपघात केला नाही.अणि कुठल्याही प्रकारचा क्लेम दाखल केला नाही तर पाॅलिसी रिनिव्हल करताना विमा कंपनीकडून त्याला बक्षिसाच्या स्वरूपात काही सुट दिली जाते.हया सवलतीलाच नो क्लेम बोनस असे म्हटले जाते.

यात गाडीच्या मालकाने गाडीचा कुठल्याही प्रकारचा अपघात न केल्याने कंपनीला एक प्रकारे लाभ प्राप्त झालेला असतो.ज्यामुळे कार इन्शुरन्स कंपनी कार मालकाला पाॅलिसी रिनिव्हल करताना बक्षिस म्हणून एक नो क्लेम बोनस प्रदान करत असते.

उदा, रमेश याने एक कार खरेदी केली आहे जिचा त्याने कार इन्शुरन्स कंपनी कडुन इन्शुरन्स देखील काढला आहे.

१२ महिन्यांच्या पाॅलिसी कालावधी दरम्यान रमेशने गाडीचा कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ दिला नाही गाडीचे कुठलेही नुकसान होऊ दिले नाही.ज्यामुळे त्याल कार इन्शुरन्स करीता कुठलाही क्लेम दाखल करण्याची आवश्यकता पडली नाही.

रमेशने पाॅलिसी कालावधी दरम्यान कुठलाही क्लेम दाखल न केल्याने कार इन्शुरन्स कंपनीला फायदा झाला आहे.

म्हणुन कंपनीने आपल्या ह्या फायद्यासाठी रमेशला पाॅलिसी रिनिव्हल दरम्यान एक विशेष सुट दिली.

No claim bonus in vehicle insurance policy
No claim bonus in vehicle insurance policy

कधी अणि किती डिस्काउंट दिला जातो?

  • गाडीच्या मालकाने जर एक वर्ष पाॅलिसी करीता क्लेम नाही केला तर त्याला पुढच्या रिनिव्हल दरम्यान २० टक्के सुट दिली जाते.
  • गाडीच्या मालकाने दुसरया वर्षी देखील कुठलाही क्लेम केला नाही तर पाॅलिसी रिनिव्हल करताना गाडीच्या मालकाला २५ टक्के सुट दिली जाते.
  • गाडीच्या मालकाने जर तीन वर्षे कुठलाही क्लेम दाखल नाही केला तर त्याला पाॅलिसी रिनिव्हल करताना ३५ टक्के इतकी सवलत दिली जाते.
  • गाडीच्या मालकाने जर सलग चार वर्षे कुठलाही क्लेम दाखल नाही केला तर त्याला पुढच्या वेळी पाॅलिसी रिनिव्हल करताना ४५ टक्के इतकी सवलत दिली जाते.
See also  टाटा गृपच्या ह्या शेअर्सने केली तुकान बॅटिंग १० हजाराचे केले ६ लाख - Share price of Tata Elxsi rises

गाडीच्या मालकाने जर सलग पाच वर्षे कुठलाही क्लेम दाखल नाही केला तर त्याला पाॅलिसी रिनिव्हल करताना ५० टक्के इतकी सवलत कंपनीकडुन बक्षिस म्हणून दिली जाते.

हा डिस्काउंट आपणास जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत प्राप्त करता येतो.

नो क्लेम बोनसचा लाभ कार मालकाला पाॅलिसीचे बारा महिने पुर्ण झाल्यानंतर रिनिव्हलच्या वेळी घेता येत असतो.एखादी व्यक्ती हा लाभ घेणे विसरली तर त्यास नंतर देखील हा कंपनीकडून नो क्लेम बोनसचा लाभ प्राप्त करता येतो.

ज्यांच्या कारची पाॅलिसी डेट संपली आहे त्यांना देखील एनसीबीचा लाभ प्राप्त होऊ शकतो समजा आपली पाॅलिसी ४५ दिवसांच्या आत एक्सपायर झाली आहे अणि आपण आपली पाॅलिसी रिनिव्ह करत आहे तेव्हा आपणास एनसीबीचा लाभ प्राप्त होऊन जातो.

पण समजा आपल्या कारची पाॅलिसी एक्सपायर झाली आहे अणि ही ४५ दिवसांच्या नंतर एक्सपायर झाली आहे अशा वेळी आपणास एनसीबीचा लाभ प्राप्त होत नाही.

इंशुरनस काढलेली गाडी विकल्यानंतर एनसी कोणाला मिळतो?

इंशुरनस काढलेली गाडी विकल्यानंतर एनसीबीचा लाभ हा गाडी विकत घेतलेल्या दुसरया व्यक्तीला मिळत नाही हा लाभ फक्त विमाधारक व्यक्तीला प्राप्त होत असतो.गाडीला किंवा पाॅलिसीला दिला जात नाही.

म्हणुन गाडी विकल्यानंतर देखील एनसीबीचा लाभ गाडीच्या मुख्य मालकालाच मिळत असतो.हा लाभ मुख्य कार मालकाला नवीन गाडी विकत घेतल्यावर तिच्या पाॅलिसी वर तीन वर्षांच्या आत प्राप्त होत असतो.

पाॅलिसी खरेदी करत असताना जास्त एनसीबी निवडला गेल्यावर काय होईल?

समजा पाॅलिसी खरेदी करत असताना आपली एनसीबी पात्रता ३५ टक्के इतकी आहे

अणि आपण पाॅलिसी खरेदी करत असताना ४५ किंवा ५० सिलेक्ट केले आहे तर अशा परिस्थितीत कंपनीकडुन कार मालकाला म्हणजे आपल्याला नोटीस पाठवली जाते यात असे दिलेले असते की एनसीबीची जी अतिरिक्त रक्कम कार मालकाला प्राप्त झाली आहे त्याला ती कंपनीला वापस करावी लागेल.किंवा त्याची पाॅलिसी कॅन्सल करण्यात येईल.

See also  ब्रिजिंग लोन म्हणजे काय? - Bridging loan meaning in Marathi

अणि समजा कंपनीकडुन नोटीस येण्याअगोदर आपल्या कारचा अपघात वगैरे झाला तर आपल्या क्लेमवर तोपर्यंत प्रक्रिया केली जात नाही जोपर्यंत आपण कंपनीला एनसीबीची अतिरिक्त प्राप्त झालेली रक्कम परत करत नाही.

५० टक्के सुट मध्ये म्हणजे कार मालकाला प्रिमियमची फक्त ५० टक्के रक्कम भरावी लागते का?

  • नाही,एनसीबी हा कार मालकाला फक्त स्वताच्या नुकसान झालेल्या घटकावर(own damage components) वर दिला जातो.
  • पॉलिसीमधील प्रत्येक कव्हरमध्ये प्रीमियमचा वेगवेगळे घटक समाविष्ट असतो.यात आपली NCB सूट आपल्या वाहनाला कव्हर करण्यासाठी पॉलिसीच्या एकूण प्रीमियमवर मोजली जाते.