क्रेडिट कार्ड म्हणजे काय?What is credit card in Marathi

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?What is credit card in Marathi

सध्याचे जग हे डिजीटल होत असल्याने सर्व पैशांचे देवाणघेवाणीचे व्यवहार आज डिजीटल माध्यमातून घडुन येत आहेत.

आज जिथे पाहावा तिथे आॅनलाईन पदधतीने वस्तुंची खरेदी करण्यासाठी शाॅपिंग करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले जाते हाॅटेलमधील बिल पे करण्यासाठी माॅलमध्ये शाॅपिंग केल्यावर बिल देण्यासाठी सुदधा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो.

सर्व हाॅटेल रेस्टॉरंट माॅल शाॅपिंग सेंटर इत्यादी मध्ये क्रेडिट कार्ड दवारे बिल पे करण्यासाठी स्वाईप मशिन मध्ये क्रेडिट कार्ड टाकले जाते अणि बिलाचे पेमेंट केले जाते.

यामुळे खरेदीसाठी शाॅपिंग वगैरे साठी आपणास खिशात पैसे घेऊन फिरावे लागत नाही.क्रेडिट कार्डदवारे आपणास सहज पेमेंट करता येत असते.

What is credit card in Marathi
What is credit card in Marathi

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड हे एटीएम तसेच डेबिट कार्ड सारखे दिसणारे एक प्लास्टिकचे कार्ड असते.

क्रेडिट कार्ड ही बॅकाकडुन ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात असलेली एक सुविधा आहे.हया सुविधेचा वापर करून आपणास खिशात पुरेसे पैसे नसता देखील आॅनलाईन आॅफलाईन शाॅपिंग करता येत असते.कुठल्याही वस्तुची तात्काळ खरेदी करता येते.

क्रेडिट कार्डला लायबिलिटी असे देखील म्हटले जाते.कारण याने आपल्या खिशातुन पैसे जात असतात.

क्रेडिट कार्ड दवारे आपण खिशात पैसे नसताना देखील स्वाईप मशिन दवारे कार्ड स्वाईप करून आपण कुठल्याही बिलाचे पेमेंट करू शकतो.

उदा एखाद्या हाॅटेल रेस्टॉरंट मधील जेवणाचे राहण्या खाण्याचे बील,माॅल दुकान तसेच शाॅपिंग सेंटर मधील वस्तु खरेदीचे बील इत्यादी

पण ह्या क्रेडिट कार्डचे देखील एक विशिष्ट लिमिट ठरलेले असते याच्यापेक्षा अधिक पैसे आपणास काढता येत नाही अणि महिन्याच्या अखेरीस क्रेडिट कार्ड दवारे खर्च केलेले सर्व पैसे आपल्याला बॅकेला परत द्यावे लागत असतात.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर हे एक प्रकारचे लोन आहे जे आपण एमरजन्सी मध्ये बॅकेकडुन घेऊ शकतो अणि नंतर आपणास ते बॅकेला व्याजासकट फेडावे लागते वेळेवर हे लोन नाही फेडण्यात आले तर बॅक आपल्याकडुन दंड देखील आकारू शकते.

See also  रिपेमेंट अणि प्रिपेमेंट म्हणजे काय? Repayment and prepayment meaning in marathi

यात देखील लोन लिमिट प्रमाणे क्रेडिट लिमिट असते.ज्यामुळे आपणास एका ठाराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे क्रेडिट कार्ड दवारे काढता येत नाही.

ही क्रेडिट कार्डची सुविधा प्राप्त करण्यासाठी आपणास आपले खाते असलेल्या बॅकेत क्रेडिट सुविधा प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागतो मग आपणास ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

सध्या क्रेडिट कार्ड करीता आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.यासाठी आपणास क्रेडिट कार्ड सुविधा देत असलेल्या बॅकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

आपला मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर इंटर करावा लागेल यानंतर आपल्या सिव्हील स्कोअर नुसार कोणते कार्ड घेऊ शकतो हे दिसुन येईल मग दाखवलेल्या कार्ड पैकी कुठलेही एक चांगले क्रेडिट कार्ड सिलेक्ट करून आपण त्यासाठी अॅप्लाय करू शकतो.

यानंतर बॅकेतील एक व्यक्ती आपल्या घरी व्हेरीफिकेशन करायला येते.व्हेरीफिकेशन मध्ये सर्व काही ठिक असल्यास पोस्टाद्वारे किंवा कुरीअरच्या साहाय्याने आपल्याला आपल्या दिलेल्या पत्यावर क्रेडिट कार्ड पाठविले जाते

क्रेडिट कार्ड ही सुविधा आपल्याला बॅक आपल्या क्रेडिट स्कोअर अणि क्रेडिट हिस्ट्री वरून देत असते.क्रेडिट कार्ड ही सुविधा आपल्याला बॅक तसेच विविध वित्तीय संस्था प्रदान करतात.