What is figures of speech | अलंकार – फिगर्स ऑफ स्पीच

What is figures of speech

फिगर्स ऑफ स्पीच – अलंकार | What is figures of speech

एकादा वक्ता बोलताना , भाषण देताना , भाषण प्रभावी , मुद्देसूद व्हावे ,श्रोत्यांवर प्रभाव पडावा म्हणून जे भाषिक तंत्र व विविध वक्तृत्वची साधन वापरतो त्या भाषिक साधनाना फिगर्स ऑफ स्पीच असे म्हटले जाते. यात अपेक्षित असा विशिष्ट प्रभाव तयार करण्यासाठी किंवा त्यांच्या शाब्दिक व्याख्येच्या पलीकडे विशिष्ट अर्थ सांगण्यासाठी शाब्दिक मार्गाने शब्द किंवा वाक्यांशांचा वापर समाविष्ट असतो.

अलंकार – मराठी व्याकरण

एकादी वस्तू ,आरास सुंदर दिसण्यासाठी आपण ती सजवत असतो , त्याने ती वस्तू खुलून ,आकर्षक दिसते,, आपण सुद्दा सुंदर दिसण्यासाठी सुंदर कपडे, सुंदर दागिने , उत्तम केश रचना करतो जेणेकरून आपलं सौन्दर्य उठून दिसावं.

What is figures of speech - अलंकार- फिगर्स ऑफ स्पीच

मराठी भाषेचेही सौंदर्य वाढवण्यासाठी मराठी भाषेत विविध शब्दांचा , शब्द योजनांचा वापर केला जातो या भाषा अलंकारांना इंग्रजीत फिगर ऑफ स्पीच असे म्हणतात. विशेषतः कवी ही अलंकार आपल्या गद्यात वापरून भाषेचे सौंदर्य वाढवत असतात.

अलंकाराचे किती प्रमुख प्रकार आहेत?

१)शब्दालंकार
२)अर्थालंकार

शब्दालंकार: शब्दांच्या किंवा अक्षरांच्या विशिष्ट अश्या रचनेमुळे शब्दांचा अर्थ बदलतो व चत्मकृती किंवा त्या शब्दात लय तयार होते तेव्हा ‘शब्दालंकार’ तयार होत असतात.

शब्दालंकारचे किती प्रकार आहेत?

अनुप्रास

एखाद्या वाक्यात वा कवितेत ओळीत एकाच शब्दाची पुरावृत्ती झाल्याने लयबद्धता तयार होते तेव्हा त्यास अनुप्रास शब्दालंकार असे म्हटलं जातं.
उदा. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला.(रा या अक्षराची पुनरावृत्ती)

यमक–

पद्याच्या शेवटी एकच अक्षर/शब्द पुन्हा पुन्हा आल्याने यमक अलंकार तयार होतो
उदा. सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

श्लेष –

एकाच शब्द वाक्यात दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा. कुस्करु नका ही सुमने जरी वास नसे तरी तुम्हास अर्पिली सु-मने
(सुमने- फुले, सु-मने- चांगली मने)

हे ही वाचा : @ चिन्ह कशासाठी वापरले जाते? – at the rate – @ Symbol Explanation

शब्दश्लेष व अर्थ श्लेष

अर्थालंकार

दोन भिन्न असलेल्या वस्तुत साम्य आणून चत्मकृतीपूर्णरित्या एकत्र बांधणे म्हणजे अर्थालंकार होय. यात साधारणपणे २२ उपप्रकार पडतात.

 1. उपमा, 
 2. उत्प्रेक्षा,
 3.  रूपक, 
 4. अपन्हुती, 
 5. अन्योक्ती, 
 6. पर्यायोक्ती, 
 7. विरोधाभास, 
 8. व्यतिरेक, 
 9. अतिशयोक्ती,
 10. अनन्वय, 
 11. भ्रान्तिमान, 
 12. ससंदेह, 
 13. दृष्टान्त, 
 14. अर्थान्तरन्यास, 
 15. स्वभावोक्ती, 
 16. अनुप्रास, 
 17. चेतनगुणोक्ती, 
 18. श्लेष, 
 19. असंगती, 
 20. सार, 
 21. व्याजस्तुती, 
 22. व्याजोक्ती 

उपमेय-ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, ते उपमेय होय. ‘गाल गुलाबासारखे मऊ आहेत.’ या वाक्यात कवी गालाचे वर्णन करत आहे म्हणून गाल हे उपमेय.

उपमान- उपमेयाचे साम्य ज्या गोष्टीशी आहे, ते उपमान होय. वरील वाक्यात गुलाब हे उपमान आहे.

साधर्म्य- उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ म्हणतात. ‘मऊ’ हे साधर्म्य आहे.

साधर्म्यसूचक शब्द-उपमेय आणि उपमान मधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ म्हणतात. ‘गुलाबासारखे’ या शब्दातील ‘सारखे’ हा शब्द साधर्म्यसूचक शब्द आहे.

काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे-

 1. उपमा- उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते तेथे उपमा अलंकार होतो. (या अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.)उदा. अभाळगत माया तुझी आम्हावर राहू दे छाती काढून उभा रहा ,जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा,
 2. उत्प्रेक्षा- उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन जेथे असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (या अलंकारात जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवला असतो.)
  उदा. तिचे रूप साजिरे गोजिरवाणे I चंद्रालाही वाटे लाज जणू II
 3. व्यतिरेक- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेथे व्यतिरेक अलंकार होतो.
  उदा. तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’(येथे उपमेय[देव] हे उपमानापेक्षा[अमृत] श्रेष्ठ[गोड] दाखवले आहे.)
 4. रूपक – उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असे वर्णन तेथे रूपक अलंकार असतो.
  उदा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुखचंद्रमा सकळींकासी
 5. अपन्हुती – उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा अपन्हुती अलंकार होतो.
  उदा. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे – न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातील| न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ
 6. दृष्टांत – एखादा विषय पटवून दाखल देणे.
  उदा. ंद्र तिथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका।संत तेथे विवेक । असणे की जे। लहाणपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
 7. चेतनगुणोक्ती – जेव्हा एखादी अचेतन वस्तू(निर्जीव) सचेतन(सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे वागते असे दाखवले असते तेव्हा चेतनगुणोक्ती अलंकार घडतो.
  उदा. अरे वेड्या सोनचाफ्याचा काय तुझा रे बहार – चाफा बोलेना, चाफा चालेना
  चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

फिगर्स ऑफ स्पीच चे प्रकार कोणते आहेत : English

 1. उपमा- Simile – : “सारख्या” किंवा “म्हणून” वापरणार्‍या दोन गोष्टींमध्ये तुलना”
  उदाहरणः तिचे केस कोळशाइतकेच काळे होते.
 2. मेटाफोर: Metaphor- “सारखे” किंवा “म्हणून” न वापरता दोन गोष्टींमध्ये तुलना”
  उदाहरणः जीवन हा एक प्रवास आहे.
 3. व्यक्तिमत्व: Personification- निसर्गातील वस्तूंची ना मानवी गुणा सोबत तुलना करणे
  उदाहरणः वारा झाडांमधून कुजबुजला.
 4. हायपरबोल: Hyperbole- एकादी गोष्ट अगसी जोर देऊन सांगणे, अत्यंत अतिशयोक्ती
  उदाहरणः मी तुम्हाला दहा लाख वेळा सांगितले आहे.
 5. Irony : विरोधाभासयातशब्दांचा वापर त्यांच्या खऱ्या शाब्दिक अर्थाच्या विरूद्ध आहे असा अर्थ सांगण्यासाठी
  उदाहरणः फायर स्टेशन च जळून खाक झाले.
 6. ओनोमाटोपीया: Onomatopoeia – शब्द जे त्यांना म्हणायचे आहे त्याप्रमाणे आवाज करतात
  उदाहरणः रात्रभर घड्याळ टिक-टॉक करत होते. फिगर्स ऑफ स्पीच हे साहित्य, कविता, भाषणे आणि दैनंदिन संभाषणात रंग, विनोद किंवा मेसेज पाठवताना जाणार्‍या संदेशावर अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी वापरली जातात.
 7. ऑलटिरेशन: Alliteration – जवळच्या किंवा जवळून जोडलेल्या शब्दांच्या सुरूवातीस समान शब्दां ची पुनरावृत्ती
  उदाहरणः पीटर पाइपरने पॉकेट मधून पॅकेट काढले
 8. असोनान्स: Assonance – स्वरांची पुनरावृत्ती यात येते
 9. मेटोनीमी: Metonymy- भाषणाची एक आकृती ज्यामध्ये एखादी गोष्ट किंवा संकल्पना त्याच्याशी जवळून संबंधित असलेल्या एखाद्या नावाच्या नावाने संदर्भित केली जाते
 10. सायनेकडॉचेः Synecdoche- भाषणाची एक आकृती ज्यामध्ये एखाद्या गोष्टीचा एक भाग संपूर्ण गोष्टीचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो
 11. ऑक्सिमोरॉन: Oxymoron- दोन विरोधाभासी गोष्टी सांगण्या साठी
  उदाहरणः जंबो कोळंबी.
 12. युफेमिझम:Euphemism – कठोर किंवा अप्रिय शब्दा ऐवजी वापरला जाणारा सौम्य किंवा अप्रत्यक्ष शब्द किंवा अभिव्यक्ती
  उदाहरणः त्याचा मृत्यू होण्याऐवजी त्याचे निधन झाले.
 13. एपिफोरा: Epiphora – बोलताना सुरवातीला किंवा वाक्यांच्या शेवटी शब्द किंवा वाक्यांशाची पुनरावृत्ती
  उदाहरणः आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी लढा देऊ. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढा देऊ. आम्ही आपल्या भविष्यासाठी लढा देऊ.
 14. अ‍ॅनाफोरा: Anaphora- सलग सुरवातीला किंवा वाक्यांच्या सुरूवातीस शब्द किंवा वाक्यांशाची पुनरावृत्ती उदाहरणः आम्ही ध्वजांकित करू किंवा अयशस्वी होणार नाही. आम्ही शेवटपर्यंत जाऊ.
 15. साहित्य: Litotesबोलन्याचं एक प्रकार ज्यामध्ये एका घटकाचा उपयोग एखाद्या मुद्दयावर जोर देण्यासाठी केला जातो. उदाहरणः हे आज सर्वोत्तम हवामान नाही.
 16. चियासमस: Chiasmus -बोलण्याचा एक प्रघात ज्यात शब्दांची क्रमवारी नंतर च्या वाक्यात उलट केली जाते उदाहरणः आपला देश आपल्यासाठी काय करू शकतो ते विचारू नका, आपण आपल्या देशासाठी काय करू शकता ते विचारा.