जागतिक आरोग्य संघटना – WHO information in Marathi

जागतिक आरोग्य संघटना WHO information in Marathi

कोरोनाच संकट जगभर निर्माण झालय आणि यावर अनेक देश लस शोधण्याचा प्रयत्न देखील करत आहे. पण या सगळ्यामध्ये WHO ची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. WHO नी कोरोनाच्या संदर्भात विविध प्रकारच्या गाईड लाइन्स वेळोवेळी प्रसिद्ध केल्या WHO ल जो फंड अमेरिका देत होती तो फंड अमेरिकाने देणं बंद केलय या कोरोणाच्या काळात अनेक वेळा आपल्याला WHO च्या संदर्भात आजा आपण माहिती घेणार आहोत.

( WHO – World health organization  ) त्यालाच मराठी मध्ये जागतिक आरोग्य संघटना अस म्हणतात. आता या नावावरून आपल्याला जाणवलं असेल ही काही तरी जागतिक संघटना हे जे आरोग्य विषयक निर्णय घेते अगदी बरोबर.

कोरोना सारखा एखादा आजार संपूर्ण जगभर पसरला तर जगातील सगळ्या देशांना या आजारा बाबत वेळोवेळी माहिती देणे, लस तयार झाल्यानंतर ही लस जगातील संपूर्ण देशातील लोकांपर्यंत पोहोचवणे त्याच प्रमाणे आरोग्य विषयक जर इतर काही समस्या असतील त्या सोडवण्याच काम ही WHO करत असते.

कोरोनाची लस तयार करणे आणि ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणे ती WHO समोरच मोठ्ठं आव्हान आहे. थोडक्यात काय तर संपूर्ण जगातील लोकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरवण हे WHO च महत्वाचं कार्य असत.

WHO ची स्थापना ७ एप्रिल १९४८ ला झाली आता ७ एप्रिल स्थापना झाल्यामळे संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक आरोग्य दीन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगाच आरोग्य विषयक अभ्यास करण्यासाठी WHO किंव्हा जागतिक आरोग्य संघटना ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे.

See also  MRI आणि CT scan मध्ये काय फरक आहे? Difference between MRI and CT scan

उद्दिष्ट्ये :- WHO information in Marathi

  • सदस्य देशांना आरोग्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन
  • आंतरराषट्रीय संस्था,संयुक्त राष्ट्र आणि विशेष संस्था यांच्या साहाय्याने आरोग्य सुविधांचा कार्यक्रम राबविणे.
  • सदस्य देशाच्या आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी मदत करणे.
  • प्रशासकीय आणि तांत्रिक बाबीमध्ये मदत करणे.
  • चांगल्या आरोग्यासाठी पोषक, आहार स्वच्छता, स्वच्छ पर्यावरण याबाबत मार्गर्शन करणे.

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जनेवा या शहरात आहे. आता एका ठिकाणावरून संपूर्ण जगावर नियंत्रण ठेव कठीण असल्यामुळे आपली कार्यपध्दती सोपी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे संपूर्ण जगभरात ६ ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत.

त्यातील एक विभाग म्हणजे दक्षिण पूर्व व आशिया विभाग आणि या विभागाचं मुख्यालय भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आहेत.

WHO च्या संदर्भात थोडक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण जगात व्यापार विषयक अभ्यास करण्यासाठी जस जागतिक व्यापार संघटना आहेत. संपूर्ण देशातील वित विषयक अभ्यास करण्यासाठी IMF किव्हा जागतिक बँक या सारख्या सस्था आहेत.

WHO information in Marathiठळक गोष्टी

  • स्थापना:- ७ एप्रिल १९४७ (७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन )
  • सदस्य देश :- १९४
  • मुख्यालय:- जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
  • लीग ऑफ नेशनच्या आरोग्य संघटनेची जागा घेतली.संयुक्त राष्ट्र विकास गटाची सदस्य संस्था
  • उद्देश:- आरोग्याशी बाबत सदस्य देशांना मार्गदर्शन करणे.
  • डायरेक्टर जनरल:- Tedros Adhanom (इथोपिया)
  • सध्या:- भारताच्या सौम्या स्वामिनाथन या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत.
  • बजेट:- ५ बिलियन डॉलर ( अमेरिका :- 16% बिल गेट्स आणि मिलिंडा फाऊंडेशन :- 7%)
  • जागतिक आरोग्य अहवाल दर वर्षी जाहीर करते. ही संघटना UNO ची एक भाग म्हणून काम करत करते.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेची विशेष संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यावर समन्वय प्राधिकरण म्हणून कार्य करते.
  • ७ एप्रिल १९४८ रोजी जिनिव्हा येथे पहिली जागतिक आरोग्य सभा पर पडली होती

उलेखनीय कामगिरी – WHO information in Marathi

  • WHO -सार्स, मलेरिया, क्षयरोग, इन्फलूइंझा, एड्स आणि कोविड- १९ सारख्या संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी व उपचार करण्यासाठी आंतर प्रयत्नांची समन्वय करते.
  • लसीकरण विस्तारित कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित आणि प्रभावी लस फार्मास्युटिकल डायग्नोस्टीक्स आणि ड्रगसच्या विकासास आणि वितरणाल समर्थन देते.
  • १९८० मध्ये WHO ने देवीच्या रोगाचे (smallpox) निर्मलन झाल्याने घोषित केले.मानवाच्या प्रयत्नाने निर्मूलन झालेला हा इतिहासातील पहिला रोग आहे.
See also  कांदयाचे आरोग्यदायी फायदे  - Onion health benefits Marathi information

महासंचालक :-

  • WHO चे प्रमुख महासंचालक असतात.
  • नेमणूक – वर्ड हेल्थ असेंबली करते.
  • सध्या महासंचालक (७ वे) – टेड्रॉर्स अधनॉम ( जुलै २०१७ पासून )
  • जागतिक आरोग्य दीन:– दरवर्षी ७ एप्रिल रोजी पाळला जातो.- who ची स्थपना दिवस – १९५० मध्ये पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला.जवाहरलाल नेहरू यांनी हा दिवस सुरू करण्यासाठी WHO ल सल्ला दिला होता.

प्रकाशने:-

  • बुलेटिन ऑफ द हू
  • कोर्निकल
  • इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ
  • लेजीसलेशन
  • वर्ड हेल्थ

प्रादेशिक कार्यालय ( प्रदेश व  HQ )

  • आफ्रिका – ब्रझव्हील, कार्गो
  • अमेरिका – वॉशिंग्टन, अमेरिका
  • आग्नेय आशिया – नवी दिल्ली, भारत
  • युरोप – कोपनहेगन, डेन्मार्क
  • भूमध्य समुद्र – पूर्वभाग – अलेक्झांड्रिया
  • पश्चिम पर्सिफिक ( सगरिया ) – मोर्णीला, फिलिपिन्स

The World Health Organization: A History (Global Health Histories) Hardcover – Import, 11 April 2019

According to its Constitution, the mission of the World Health Organization (WHO) was nothing less than the ‘attainment by all peoples of the highest possible level of health’ without distinction of race, religion, political belief, economic status, or social condition. But how consistently and how well has the WHO pursued this mission since 1946? This comprehensive and engaging new history explores these questions by looking at its origins and its institutional antecedents, while also considering its contemporary and future roles. It examines how the