आदीपुरुष – हे असले डायलॉग? -फॅन्सकडून चित्रपटाला बाॅयकाॅट करण्याची मागणी का ?why fans demand boycott of Adipurush after release

आदीपुरूष चित्रपट रिलीज झाल्यानंतर फॅन्सकडुन चित्रपटाला बाॅयकाॅट करण्याची मागणी का केली जाते आहे?why fans demand boycott of adipurush after released

आदीपुरूष हा रामायणावर आधारीत असलेला चित्रपट १६ जुन रोजी रिलीज करण्यात आला होता.

पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर आदीपुरूष ह्या चित्रपटावर सार्वजनिक बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी फॅन्स कडुन केली जात आहे.

आजच्या लेखात आपण आदीपुरूष चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच ह्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी फॅन्स कडुन का केली जात आहे हे जाणुन घेणार आहोत.

फॅन्स कडुन आदीपुरूष चित्रपटाला बाॅयकाॅट करण्याची मागणी का केली जात आहे?

आदीपुरूष ह्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे मुख्य कारण यात वापरण्यात आलेल्या डायलॉगला सांगितले जात आहे.

याचसोबत ह्या चित्रपटाची स्टोरी व्हि एफ एक्समुळे देखील फॅन्सकडुन चित्रपटाला विरोध केला जातो आहे.

आदीपुरूष चित्रपटात दाखवलेले काही डायलॉग ज्यामुळे चित्रपटाला बाॅयकाॅट केले जाते आहे चित्रपट अधिक वादाचा चर्चेचा विषय बनला आहे-

१) आदीपुरूष चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग –

इंद्रजीतने हनुमानाच्या शेपटीला आग लागल्यावर

जली न,बेचारा…जिसकी जलती है वही जानता है!

यावर इंद्रजीतला प्रत्युत्तर देताना हनुमानाचा वादग्रस्त डायलॉग -कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की

हनुमानाचा डायलॉग -जो हमारी बहणो को हाथ लगाएंगे उनकी लंका लगा देंगे

रावणाचे डायलॉग –

तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया

मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया अभी तो पुरा पिटारा भरा पडा है

See also  दुरदर्शनवरील प्रसिद्ध न्युज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन Gitanjali Aiyer passed away in Marathi

श्रीरामाचा डायलॉग –

आप अपने काल के लिए कालीन बिछा रहे है

असे काही वादग्रस्त अणि टपोरी भाषेतील डायलॉग रामायणा सारख्या ह्या हिंदु धर्मातील अत्यंत पवित्र चित्रपटात दाखवले गेले आहेत.

सर्व डायलॉग मनोज मुंतशीर यांनी लिहिलेले असल्याचे सांगितले जात आहे.

सदर चित्रपटातील हनुमानाच्या वादग्रस्त डायलॉग विषयी स्पष्टीकरण देताना मनोज मुंतशीर म्हणाले की आम्ही जाणुन बुजुन अशी भाषा अणि संवाद वापरले आहेत जेणेकरून चित्रपट बघताना आजचे लोक चित्रपटाला कनेक्ट होऊ शकतील.

२) आदीपुरूष चित्रपटातील व्ही एफ एक्स –

रावणाला दाखवलेल्या दहा डोक्यामध्ये कुठले डोके कुठे बघते आहे कोणाशी बोलत आहे याचा कुठलाच मेळ दिसुन येत नसल्याचे दिसून येत आहे.

कुठल्या डोक्याचे कान एकमेकांना जोडले गेले आहे.अणि कुठल्या डोक्यावरचे दाढी आणि केस हे देखील कळत नाहीये.

रावण शिवभक्त होता हे सर्वांनाच माहीत आहे पण आदीपुरूष मध्ये रावन अजगरांनी बनवलेल्या मंचकावर झोपलेला दाखवला आहे.अजगरांची काॅलिटी देखील जुन्या चित्रपटातील नागीन व्हायची तशा प्रकारची आहे.

लंका जाळल्यावर हनुमानाच्या मागे लागलेली रावणाची सेना ही कार्टुन मध्ये दाखवल्या जात असलेल्या असुर सेनेप्रमाणे दाखवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

आदीपुरूष चित्रपटाच्या व्ही एफ एक्स मुळे कार्टुन बघितल्याचे फिलिंग आले असे म्हटले जात आहे.

३) आदीपुरूष चित्रपटाची स्टोरी –

आदीपुरूष चित्रपटाच्या स्टोरी मध्ये कैकई दशरथ ही रामायण मधील मुख्य पात्र बाजुला ठेवली आहे.इतर सर्व सुरुवातीचे महत्वाचे भाग कापुन आदीपुरूष चित्रपटाची सुरुवात वनवासा पासुन दाखवण्यात आली आहे.

कुंभकर्णाच्या झोपेतुन उठण्याचा सीन,विभीषण श्रीरामाला सीतेला रावणाच्या तावडीतुन सोडविण्यासाठी मदत करतो तसेच सीताहरण झाल्यावर जटायु श्रीराम यांच्या मध्ये होणारा संवाद हा भाग देखील कट करण्यात आला आहे.

लहानपणापासून आपण रामायणात जे काही बघत आलो आहे त्यापेक्षा वेगळ असे काहीच चित्रपटात दिसुन येत नाहीये अणि त्यातही रामायणातील अनेक महत्वाचे सीन पात्र देखील कट करण्यात आले आहे.कुंभकर्ण रावणाचे बंधुप्रेम देखील दाखवण्यात आले नाहीये.

See also  जागतिक बॅकेने दक्षिण आशियातील पहिला रोड सेफ्टी प्रोजेक्ट ह्या देशात केला लाॅच -World Bank launches its first road safety project in South Asia

श्रीरामाचे दिसणे म्हणजे भगवे वस्त्र,खांद्यावर धनुष्य पादुका पण आदीपुरूष मध्ये श्रीराम चामडयाचे जॅकेट आणि बुट घालुन दाखवण्यात आले आहेत.एका सीनमध्ये पांढरा ड्रेस घालुन श्रीराम दाखवले आहे.

आदीपुरूष मधील श्रीरामाची वेशभुषा –

सोन्याची लंका असलेला रावण कधी टी शर्ट घालून दाखवला आहे तर कधी कुर्ता घालुन दाखवण्यात आला आहे.वेगवेगळया प्रकारची केसभुषा करताना दिसुन येत आहे अणि डोक्यावर मुकुट देखील घातलेला दाखवण्यात आला नाहीये.