जागतिक बालकामगार विरोधी दिवस विषयी माहीती – World day against child labor information in Marathi

जागतिक बालकामगार विरोधी दिवस – world day against child labor information in Marathi

मित्रांनो आज देशात बालकामगारांचे प्रमाण खुपच वाढत चालले आहे.याला कारण कमकुवत आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव ह्या दोन गोष्टी आहेत.

आज देशामध्ये बाजमजदुरीला आळा घालण्यासाठी अनेक कडक कायदे देखील करण्यात आले आहेत.तरी देखील बालमजदुरांची संख्या पाहिजे तेवढी कमी झालेली आपणास दिसुन येत नाही.

याला कारण समाजात बालमजदुरी विषयी पाहिजे तेवढी जागृकता नाहीये.

म्हणून समाजामध्ये बालमजदुरी विषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी संपुर्ण जगभर आंतरराष्टीय पातळीवर जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो.

आजच्या लेखात आपण ह्याच बालकामगार विरोधी दिनाविषयी माहीती जाणुन घेणार आहोण.

बालकामगार म्हणजे काय?

अशी मुले ज्यांचे वय 14 पेक्षा कमी आहे आणि ते आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरीची तसेच इतर जड कामे करतात.अशा बालकांना बालकामगार म्हणुन संबोधिले जाते.

जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

संपुर्ण जगभरात बालकामगार विरोधी दिन दरवर्षी 12 जुन रोजी साजरा केला जातो.

जागतिक बालकामगार विरोधी दिन का साजरा केला जातो?जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्याचे मुख्य उददिष्ट काय आहे?

बालमजदुरीला आळा घालण्यासाठी बालकामगार प्रथा कायमची बंद करण्यासाठी मोठया प्रमाणात समाजामध्ये सामाजिक जागृती घडुन यावी याकरीता दरवर्षी 12 जुन रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातो.

See also  ॲमेझॉन प्राईम विषयी माहिती Amazon prime information in Marathi

संपूर्ण जगभरात जागोजागी सुरू असलेल्या बालमजदुरी,बालकामगार प्रथेवर समाजाचे लक्ष केंद्रित करण्याकरीता आणि त्यावर कायमस्वरूपी आळा घालण्याच्या उददिष्टासाठी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातो.

जागतिक बालकामगार विरोधी दिवस कधीपासुन साजरा केला जाऊ लागला?

जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करायची सुरूवात 2022 पासुन आंतरराष्टीय कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

जागतिक बालकामगार विरोधी दिवस कसा साजरा केला जातो?

● दरवर्षी 12 जुन रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिनी बालमजदुरी संपुष्टात यावी याकरीता बालमजदुरीविषयी समाजात जागृती केली जाते.

● यादिवशी लोकांना बालमजदुरीचे दुष्परिणाम सांगितले जातात.

● लहान मुलांसाठी शिक्षण करणे खेळणे बागडणे किती गरजेचे आहे हे समाजातील लोकांना,बालमजदुरीचे शिकार बनलेल्या लहान मुलांच्या पालकांना समजावून सांगितले जाते.

● बालमजदूरी विरोधात आवाज उठवण्यासाठी सगळयांना प्रेरित केले जाते.

संविधानानुसार किती वयोगटातील मुलांकडुन मजदुरी करून घेणे दंडनीय अपराध आहे?

संविधानानुसार 14 पेक्षा कमी वयोगटातील मुलांकडुन मजदुरी करून घेणे दंडनीय अपराध आहे.

बालमजदुरी ही देशातील एक गंभीर समस्या का बनत चालली आहे?

लहान वयात मजदुरी केल्यामुळे जड काम केल्याने मुलांना शारीरीक हानी पोहचत पोहचत असते.काही मुलांचा तर मृत्यु देखील होत असतो.

बालमजदुरीमुळे मुले शिक्षण घेण्याच्या वयात शिक्षणापासुन वंचित राहुन जात असतात.त्यांना कुठलीही आरोग्यविषयक सुविधा देखील यामुळे प्राप्त होत नसते.

मुलांना त्यांच्या मुलभुत अधिकारापासून वंचित राहावे लागते.आणि ही एक गुलामी तसेच शोषण आहे ज्याने लहान मुलांचे भविष्य धोक्यात येत असते.

हेच कारण आहे की आज बालमजदुरी ही देशातील एक अत्यंत गंभीर समस्या बनत चालली आहे.

बालमजदुरीचे मुख्य कारण काय आहे?

समाजात बालमजदुरीला आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो?

● खुप ठिकाणी लोक आपल्या मुलांना लहान वयात कामाला यासाठी पाठवतात की त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजुक असते.घरात एकवेळ खायला अन्न मिळत नाही म्हणजेच गरीबी हे बालमजदुरीचे मुख्य कारण आहे.म्हणू ही गरीबी दुर करण्यासाठी आपण तसेच मुख्यकरून सरकारने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.नाहीतर अनेक लहान मुलांना ह्या गरीबीमुळे बालमजदुरीला बळी पडावे लागेल.

See also  गुगलच्या ए आय पाॅवर मेडिकल चॅट बोट मेड पाल्म टु विषयी माहिती Google AI powered medical chatbot med -paLm 2 information in Marathi

● काही ठिकाणी शिक्षणाचा अभाव असल्याने बालमजुरी मुलांसाठी किती घातक आहे आणि त्यावर सरकार काय कारवाई करते हे लोकांना माहीती देखील नसते.शिक्षण करणे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किती आवश्यक आहे हे देखील समाजातील काही लोकांना माहीत नसते.म्हणुन आपण अशा लोकांना बालमजुरी किती चुकीचे बेकायदेशीर काम आहे यावर आपल्याला काय शिक्षा होऊ शकते हे समजावून सांगुन त्यांना शिक्षित करायला हवे.

● बालमजदुरी विषयक कडक कायदा हा बालमजदुरीला आळा घालण्याचा अजुन एक उपाय आहे.कारण बालमजदुरीविषयक समाजात कडक कायदा करण्यात आला तर कोणीही कायद्याच्या भीतीने आपल्या दुकानात,कारखान्यात,लहान मुलांना कामाला ठेवणार नाही.

● बालमजदुरीचे अजुन एक कारण म्हणजे लोक अशा गोष्टी डोळयांना दिसुन देखील याकडे दुर्लक्ष करतात याने असे बेकायदेशीर काम करणारयांची हिंमत अजुन वाढते म्हणुन कोणी लहान मुलांकडुन काम करून घेताना दिसुन आल्यास आपण त्वरीत पोलिसात तक्रार करायला हवी.याविरूदध आवाज उठवायला हवा.

● बालमजदुरीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबवले गेले पाहिजे.

● ज्या मुलांची शिक्षणाचा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिति नसते अशा गरीब आणि गरजु मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे.