जागतिक अन्न सुरक्षा दिनासाठी 24 घोषवाक्ये- 24 World Food Safety Day slogans in Marathi

जागतिक अन्न सुरक्षा दिनासाठी 24 घोषवाक्ये -24 World Food Safety Day slogans in Marathi

जागतिक अन्न सुरक्षा दिवस निमित्त समाजात आरोग्य आणि अन्न सुरक्षेबाबद जागरूकता सतर्कता निर्माण करण्यासाठी तसेच अन्न विषबाधेने दुषित अन्नाचे सेवण केल्याने वाढत असलेल्या मृत्युच्या,रोगराईच्या प्रमाणावर आळा घालता यावा यासाठी आपण आज
जागतिक अन्न सुरक्षा दिनासाठी काही महत्वाची 24 घोषवाक्ये जाणुन घेणार आहोत.

1)नेहमी पौष्टिक आणि सकस आहाराचे सेवण करा.

2)नेहमी ताज्या भाज्या आणि ताजी फळे खरेदी करा.

3)नेहमी अन्न झाकून ठेवा त्या अन्नाला संसर्ग होऊ देऊ नका.

4)नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवण केल्याने आपल्या शरीराच्या उर्जेत अधिक वाढ होत असते.

5)घरचे जेवण हे आपल्यासाठी अमृतासारखे असते.आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील वरदान ठरत असते.

6) घरचे जेवण हे आपल्या आरोग्याला उत्तम बनवायचे काम करते आणि बाहेरचे उघडयावरचे अन्न आपल्याला दवाखान्यात पोहचवायचे काम करते.

7) आपण आपल्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे तेव्हाच आपण रोगांपासुन स्वताचा बचाव करू शकतो.

8) आपल्या आहारामध्ये फळ भाज्या आणि अन्न धान्याचा समावेश करा आणि बाहेरचे उघडयावरील अन्नपदार्थ खाणे टाळून आपल्या आरोग्याचे रक्षण करा.

9) जसा आपण आहार घेतो तसेच आपले विचार बनत असतात.म्हणून नेहमी शुदध दर्जेदार आणि सकस,पौष्टिक आहाराचे सेवण करा

10) अन्न सुरक्षा नियमांचे नियमित पालन करा स्वच्छतेचे नियम पाळत नेहमी दर्जेदार आणि चांगल्या अन्नाचे सेवण करा.

11) सकस आणि पौष्टिक आहार हीच खरी आरोग्याची गुरूकिल्ली.

12) जेवण बनवण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा.

13) नेहमी ताज्या आणि स्वच्छ अन्नाचेच सेवण करा आपल्या आरोग्याचे रक्षण करा.

14) कुठलेही उघडयावर ठेवलेले बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा आणि आपले आरोग्य सांभाळा.

15) बाहेरून जो खाद्य पदार्थ खरेदी करता आहे त्याची गुणवत्ता दर्जा कसा आहे तो खाद्यपदार्थ पौष्टिक आहे की नाही हे आधी बघा मगच त्याचे सेवन करा.

See also  Fermentation म्हणजे काय? किण्वनचा अर्थ काय आहे? -Fermentation Definition, Process and Examples

16) पँकेटमध्ये बंद असलेला कुठलाही खाद्य पदार्थ खरेदी करण्याच्या आधी त्याची पँकिंग डेट,एक्सपायरी डेट चेक करा त्या अन्नपदार्थाची काँलिटी कशी आहे तो खाद्य पदार्थ कुठल्या कंपनीचा आहे त्याची गुणवत्ता कशी आहे हे देखील एकदा चेक करा.मगच तो अन्नपदार्थ खा.

17) घरातील सेवण केलेला आहार कधीही आपल्या शरीराला अपार उर्जा देत असतो.

18) कुठलेही अन्न जास्त वेळ शिजवु नये याने त्यातील पौष्टिकता जीवणसत्वे नष्ट होत असतात.

19) दुषित खराब आणि शिळया अन्नाचे सेवण कधीच करू नका याने आपले आरोग्य बिघडते.शिवाय अन्नातुन विषबाधा देखील होत असते.

20) उघडयावर न झाकता ठेवलेले अन्न खाणे टाळा याने आपल्याला अन्नातुन विषबाधा होऊन विविध आजारांना बळी पडावे लागते.

21) कुठलेही अन्न खाण्याअगोदर साबणाने स्वच्छ हात धुवा.

22) कुठलेही अन्न नीट शिजवून आणि योग्य प्रमाणात गरम करूनच खा.पटकन शिजवलेले अन्न खाल्याने आपण आजारी देखील पडु शकतो.

23) आपल्याला आपला देश जर नेहमी निरोगी आणि स्वच्छ ठेवायचा असेल तर अन्नाची सुरक्षा करणे आणि स्वच्छतेचे पालन करणे खुप गरजेचे आहे.

24) उद्याच्या निरोगी भविष्यासाठी आजपासुनच सुरक्षित अन्नाचे सेवण करा.