जागतिक महासागर दिवस माहिती – World Ocean day information in Marathi

जागतिक महासागर दिवस माहिती world Ocean day information in Marathi

मित्रांनो समुद्र ही आपली खुप मोठी संपत्ती आहे कारण आज समुद्रापासुनच आपल्याला अनेक जीवणावश्यक वस्तु,घटक पदार्थ मिळतात.जसे की मीठ,जे अन्नाला चव आणण्याचे स्वाद देण्याचे काम करते.

समुद्रामुळे आपणास खनिजे,मासे इत्यादी प्राप्त होत असतात.जे आपल्या शरीराला आवश्यक असलेली विविध जीवणसत्वे पुरवित असतात.

एवढेच नही तर माशांपासुन याव्यतीरीक्त देखील अनेक फायदे आपणास प्राप्त होत असतात माशांपासुन औषध आणि खत तयार केले.एवढे महत्व आणि महत्वाची भुमिका आपल्या जीवणात आज समुद्राची आहे.

पण कुठेतरी आज आपण ह्याच समुद्रात,कारखान्यातील रासायनिक घटक पदार्थ युक्त सांडपाणी प्लास्टिक कचरा इत्यादी टाकुन त्याला दुषित करत आहे.

म्हणुनच आज समुद्र रक्षणाविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर आज जागतिक महासागर दिवस हा साजरा केला जातो.

आजच्या लेखात आपण ह्याच जागतिक महासागर दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

जागतिक महासागर दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

जागतिक महासागर दिवस दरवर्षी 8 जुन रोजी संपुर्ण जगभरात साजरा केला जात असतो.

जागतिक महासागर दिवस का साजरा केला जातो?जागतिक महासागर दिवस साजरा करण्यामागचे उददिष्ट काय आहे?

महासागराचे रक्षण व्हावे मानवाने महासागराचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत,जनतेमध्ये महासागराच्या रक्षणासाठी जागृकता निर्माण व्हावी ह्यासाठी दरवर्षी जागतिक महासागर दिवस साजरा केला जातो.

See also  महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा मराठीत | Mahavir Jayanti 2023 Wishes In Marathi, Images

तसेच आपल्या सर्वाच्या आयुष्यात महासागराचे काय महत्व आहे?आपल्या जीवनात महासागराची कोणती महत्वपुर्ण भुमिका आहे हे लोकांना सांगण्यासाठी पटवून देण्यासाठी दरवर्षी जागतिक महासागर दिवस साजरा केला जातो.

जागतिक महासागर दिवस सगळयात आधी कधी साजरा केला गेला होता?

जागतिक महासागर दिवसाचा इतिहास-

2009 मध्ये 8 जुन ह्या तारखेला सर्वात प्रथम जागतिक महासागर दिवस साजरा करण्यात आला होता.मग त्यानंतर तेव्हापासुन दरवर्षी 8 जून रोजी संपुर्ण जगभरात हा जागतिक महासागर दिवस एकत्रितपणे साजरा केला जाऊ लागला.

1992 मध्ये रिओ-डी-जनेरियो येथील एका प्लॅनेट अर्थमध्ये म्हणजेच प्लँनेट अर्थ नावाच्या एका मंचावर हा दरवर्षी जागतिक महासागर दिवस साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता.

आणि नंतर पुढे जाऊन 2008 मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक महासागर दिवस याला आँफिशिअली मंजुरी देखील दिली होती.आणि 2009 पासुन हा दिवस जगभर साजरा करण्यास आरंभ झाला होता.

मानवाने महासागराचे रक्षण करणे का आवश्यक आहे?

मित्रांनो आज आपण नीट निरीक्षण करून पाहायला गेलो तर आपणास असे दिसुन येते की महासागर हा आज असा एक अथांग न संपणारा विशाल असा जलाशय आहे जो ह्या पृथ्वीच्या विस्तीर्ण भागात पसरलेला आहे.

  • आणि ह्या महासागराच्याच अवतीभोवती आज अनेक अशा परिसंस्था निर्माण झालेल्या आपणास दिसुन येतात.ज्यामुळे अनेक प्राणी वनस्पती लहान सहान जीव जंतु आपले जीवन जगतात.
  • याचसोबत मानवाला देखील महासागरापासून अनेक फायदे होत असतात जसे की आपल्या रोजच्या जीवणात लागणारा महत्वाचा घटक मीठ हा आपणास महासागरामुळेच प्राप्त होत असतो.आणि आपल्याला जर आहाराला चव प्राप्त करून द्यायची असेल अन्न अधिक चविष्ठ आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर मीठ हे खुप आवश्यक असते.
  • आणि मीठ हा अन्न पदार्थ आपणास समुद्राच्या खारया पाण्यापासुन प्राप्त होत असतो हे आपणा सर्वानाच माहीत आहे.समुद्र किनारी भागामध्ये मिठागरे तयार करून हे मीठ प्राप्त केले जाते.
  • याचसोबत महासागरामुळे आपणास फाँस्फेट,सल्फेट,आयोडीन यासारख्या विविध खनिजांची प्राप्ती होते.म्हणजेच मीठासोबत खनिजांसाठी देखील आपण महासागरावरच अवलंबुन राहत असतो.
  • आपल्या सर्वानाच माहीत असेल मित्रांनो की मासे खाणे आपल्या डोळयांच्या दृष्टीसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी किती चांगले असते.आणि हे मासे देखील आपणास महासागरातुनच प्राप्त होत असतात.
  • यातच समुद्र किनारी वास्तव्य करत असलेल्या लोकांचा मुळ व्यवसायच मासेमारी असतो ते समुद्रामधून मासे पकडत असतात आणि तेच विकुन आपले पोट भरत असतात.म्हणजेच समुद्र किनारी राहत असलेल्या लोकांचा मुळ व्यवसायच मासेमारी हा असलेला आपणास दिसुन येतो.आपल्या उदरनिर्वाहासाठी ते पुर्णपणे समुद्रावर अवलंबुन राहत असतात.
See also  पैसे कमविण्यासाठी सर्वोत्तम अँप्स- Best Money Earning App In Marathi

तसेच समुद्रातील माशांपासुन औषधांची खतांची निर्मिती देखील केली जात असते.ड जीवणसत्व प्राप्त होण्यासाठी औषध म्हणुन वापरले जात असलेले काँडलिव्हर हे आँईल आपणास माशांपासुनच मिळत असते.

मच्छीमार आपल्या जाळयात जे मासे पकडत असतात पण ते खाण्यासाठी उपयुक्त नसतात असे मासे देखील खत तयार करण्यासाठी वापरले जातात. महासागर हा अनेक जीव,जंतु,वनस्पती यांना आश्रय देण्याचे काम करतो.

वरील ह्या सर्व सोयी सुविधा आपणास समुद्र,महासागरामुळेच प्राप्त होत असतात.यावरून आपणास कळुन येईल की महासागराचे संरक्षण करणे आपल्यासाठी किती गरजेचे आणि अत्यावश्यक आहे.

जागतिक महासागर दिवस कसा साजरा केला जातो?

यादिवशी लोकांना आपल्या जीवणात समुद्राचे काय महत्व आहे काय भुमिका आहे हे सांगितले जाते.

● समुद्राचे संरक्षण करण्यासाठी जनतेत जनजागृती केली जाते.

● महासागर सुरक्षित नसला तर आपले काय हाल होऊ शकतात काय दुर्दशा होऊ शकते आपल्या आरोग्यावर याचे काय परिणाम होऊ शकतात हे देखील समजावून सांगितले जाते.

महासागराचे रक्षण करण्यासाठी आपण काय करायला हवे?

  • समुद्रात प्लास्टिकचा कचरा टाकणे बंद करावे.कारण हा कचरा समुद्रातील इतर जीव तसेच मासे खातात ज्यामुळे हे इतर जीव आणि मासे मरण पावतात आणि कधीकधी तीच मासे आपण खात असतो ज्याने रोगराई वाढते.आणि आपल्या आरोग्यास हानी पोहचत असते.
  •  कारखान्याचे रासायनिक पदार्थ असलेले दूषित पाणी,शेतीतील खराब सांडपाणी तसेच इतर घरगुती सांडपाणी रासायनिक पदार्थ असलेले दुषित पाणी समुद्रात टाकु नये.
  • याने समुद्र हा मासेमारी करण्यासाठी,पाणी पिण्यासाठी,पोहण्यासाठी स्वच्छ तसेच योग्य राहत नसतो.याने समुद्रातील इतर जीवांना देखील हानी पोहचते तसेच ते समुद्राचे पाणी पिण्यायोग्य,मासेमारी करण्यायोग्य तसेच पोहण्यायोग्य देखील राहत नसते.त्यातच जर हे पाणी कोणी पिले तर त्याच्या आरोग्यास हानी पोहचु शकते.

2022 च्या जागतिक महासागर दिवसाची थीम काय आहे?

2022 च्या जागतिक महासागर दिवसाची थीम पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती करणे ही आहे.(Revitalization Collective Action for the Ocean).

See also  भावार्थ ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari in Marathi)-२१व्या शतकातील सोप्या मराठीत ओवीबद्ध केलेली

2022 च्या जागतिक महासागर दिवसाची थीम काय आहे?

समुद्राचे संरक्षण करण्यासाठी त्याचे पुनरउत्पादन करता यावे याकरीता काम करत असलेल्या तसेच निसर्गाचे जतन करण्यासाठी एकत्रितपणे कृती करत असलेल्या पाऊले उचलत असलेल्या सर्व समुदायाने समुद्राचे रक्षण करण्यासाठी निसर्गाचे जतन करण्यासाठी विविध उपायांवर कल्पणांवर एकत्रितपणे प्रकाश टाकणे हा आहे.

जागतिक महासागर दिवसाविषयी जाणुन घ्यावी अशी तथ्ये कोणती आहेत?

● भविष्यात 2030 पर्यत समुद्रामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे.

● महासागरामुळे ग्लोबल वाँर्मिगचा त्रास देखील कमी होत असतो.

● दरवर्षी 9 दशलक्ष इतका प्लास्टिक कचरा समुद्रामध्ये टाकण्यात येतो.