कमी वयात देखील आपले केस का गळु लागतात? केस गळती ची कारणे
आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपले केस देखील माँर्डन असावे.यासाठी आपण हेअर सलुनमध्ये जाऊन विविध प्रकारच्या फँशनचे कट मारत असतो.आपल्या केसांना विविध प्रकारचे वळण देत असतो.केसांना हेअर डाय देखील करत असतो.एवढी आपण आपल्या केसांची निगा राखत असतो.
पण आपल्यापैकी काहीजण असे देखील असतात ज्यांचे फार कमी वयातच केस गळायला लागतात.
तसे पाहायला गेले तर केस गळणे ही एक नैसर्गिक बाब आहे.
पण त्याच ठिकाणी पुन्हा केस उगवले नाही तर मग आपण खुप चिंतीत होत असतो.यातच आपले वय जास्त नसेल खुप कमी असुनही आपले केस सातत्याने नेहमी गळत असतील तर मग हा आपल्यासाठी एक मोठा चिंतेचाच विषय बनत असतो.
म्हणुन आजच्या लेखात आपण कमी वयात आपले केस का गळु लागतात?हे जाणुन घेणार आहोत.
कमी वयात आपले केस का गळु लागतात? केस गळती ची कारणे
खुप तरूण तसेच तरूणी असतात ज्यांचे खुप कमी वयातच केस गळायला लागतात.आणि हे बघुन ते चिंतित होत असतात कारण केस गळण्याइतके त्यांचे वय देखील झालेले नसते.तरी देखील त्यांना ही समस्या उदभवत असते.
पण केस गळणे ही एक नैसर्गिक बाब आहे तसेच यामागे काही इतर कारणे देखील असतात ज्यात अनुवांशिकता,कर्करोग,दीर्घकाळ आजार इत्यादींचा समावेश होत असतो.
म्हणजेच प्रत्येकाचे आपापल्या वयात केस गळण्यामागे एक विशिष्ट कारण असते.जे आपण समजुन घेणे फार गरजेचे असते.
केस गळती ची कारणे पुढीलप्रमाणे असु शकतात:
1) शरीरात प्रोटीन फार कमी असणे :
2) अ जीवणसत्वाचा अभाव :
3) नियमित केसांना खोबरेल तेल न लावणे :
4) ताणतणाव तसेच आजारपण :
5) अशक्तपणा :
6) अनुवांशिकता :
7) पौष्टिक आहाराचे सेवन न करणे :
8) गोळया औषधांमुळे शरीरातील हार्मोनल संतुलित न राहणे :
9) अचानक वजनात घट होणे :
10) गर्भावस्था :
1)शरीरात प्रोटीन फार कमी असणे :
आपण जो आहार सेवन करतो त्याचा आपल्या शरीराशी आणि आरोग्याशी देखील खुप घनिष्ठ संबंध असतो.एवढेच नही तर आपले केस गळण्यामागे देखील आहारात प्रोटीनची कमतरता हे कारण असु शकते.
कारण आपल्या केशग्रंथी ह्या कँराटिन नामक प्रथिनांपासुनच निर्माण होत असतात.याचसाठी आपण आपल्या आहारात नियमित प्रथिनांचा समावेश करायलाच हवा.कारण आपल्या शरीरात प्रथिनांची कमतरता असणे हे देखील आपले केस गळण्यामागचे मुख्य कारण असते.
म्हणुन आपण आपल्या शरीरात प्रथिनांची कमतरता भासु नये म्हणुन अंडे,काजु,मासे,दुध तसेच दुधापासुन तयार केलेले इतर इतर पदार्थ दही,तुप,ताक इत्यादींचे सेवन करायला हवे.
2) अ जीवणसत्वाचा अभाव :
आपले केस गळण्यामागचे दुसरे कारण आहे शरीरात अ जीवणसत्वाचा अभाव.आणि आपल्याला आपल्या केसांची वाढ चांगल्या पदधतीने होऊ द्यायची असेल तर आपणास रेटीनाँईडची खूप जास्त गरज असते.आणि हे रेटीनाँईड आपल्याला अ जीवणसत्वापासुन प्राप्त होत असते.
आणि अ जीवणसत्व असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याने
तेलग्रंथी निर्माण होत असतात.ज्या केसांची वाढ होण्यास आपल्याला साहाय्यभुत ठरत असतात.
आपल्या शरीराला अ जीवणसत्व प्राप्त होण्यासाठी आपण आपल्या आहारात ढोबळी मिरची,शेपु पालक,अशा पालेभाज्यांचा समावेश करायला हवा कारण यात आपल्याला विपुल प्रमाणात अ जीवणसत्व प्राप्त होत असते.
3)नियमित केसांना खोबरेल तेल न लावणे :
आपण रोज सकाळी अंघोळ झाल्यावर आपल्या केसांना खोबरेल तेल लावत असतो.कारण केसांना खोबरेल तेल लावणे आपल्या केसांच्या उत्तम आरोग्यासाठी खुप चांगले मानले जाते.
खोबरेल तेल केसाला लावल्याने आपल्याला अनेक लाभ प्राप्त होत असतात.खोबरेल तेल आपल्या केसांचे सुर्याच्या अल्ट्राव्हायलेंट किरणांपासुन संरक्षण करत असते.
केसांना खोबरेल लावल्याने आपले केस तुटत नाही एकदम मजबुत आणि कणखर बनत असतात.
4) ताणतणाव तसेच आजारपण :
जर आपण एखाद्या शारीरीक किंवा मानसिक तणावातुन जात असाल किंवा एखाद्या जुनाट आजाराने पिडित देखील असाल अशावेळी सुदधा आपले केस गळत असतात.
5) अशक्तपणा :
अशक्तपणा हे देखील केस गळतीचे एक कारण आहे.ज्यात आपल्या शरीरात जर पुरेशा प्रमाणात लोह नसेल तर लोहाच्या कमतरतेमुळे देखील आपले केस गळण्यास सुरूवात होते.
6) अनुवांशिकता :
केस गळण्यामागे अनुवांशिकता हे देखील एक कारण असु शकते.अनुवांशिकता म्हणजे आपले आजी आजोबांना पहिले ही समस्या होती त्यांच्यापासुन ही समस्या आपल्या आईवडिलांना निर्माण झाली आणि आपल्या आईवडिलांपासुन ही समस्या आपल्याला जडत असते म्हणजेच याला कारण वाडवडिलोपार्जित पिढीजात परंपरा देखील असु शकते.
म्हणजेच एका पिढीकडुन पुढच्या पिढीकडे जाणारी समस्या देखील ह्या केस गळतीचे कारण असु शकते.
7) पौष्टिक आहाराचे सेवन न करणे :
पौष्टिक आहाराचे सेवन न करणे हे देखील केस गळण्यामागचे एक कारण आहे.
आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि शरीराच्या अणि केसांच्या वाढीसाठी उत्तम आणि समतोल पौष्टिक आहाराचे सेवन करणे देखील खुप गरजेचे असते.म्हणुन आपण जेवणात असे पौष्टिक पदार्थ आणि पालेभाज्या समाविष्ट करायला हवे ज्यात सर्व जीवणसत्वे,प्रथिने विपुल प्रमाणात असतात.
8) गोळया औषधांमुळे शरीरातील हार्मोनल संतुलित न राहणे :
जेव्हा आपण आपल्या शरीरामधील हार्मोनल्सला उत्तेजित करण्यासाठी गोळया औषधांचे सेवन करत असतो.तेव्हा आपल्या शरीरात जे हार्मोनल्समध्ये जे बदल घडुन येतात ते देखील केस गळण्यास कारणीभुत ठरत असतात.
9) अचानक वजनात घट होणे :
समजा अचानक आपण आपले वजन कमी करण्याचे ठरवले आणि अचानक वजन कमी होतेही पण ह्या अचानक कमी करण्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला सहन करावे लागत असतात.ज्यामूळे आपले केस गळु लागतात तसेच कमी देखील होऊ लागतात.
10) गर्भावस्था :
गर्भावस्थेच्या काळात देखील महिलांचे केस गळत असतात असे आपणास दिसुन येते.
केस गळतीवर करावयाचे काही घरगूती उपाय :
केस गळत असल्यास कांदा बारीक चिरून मिक्सरमध्ये दळुन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी आणि हीच पेस्ट केसांना लावावी याने आपले केस गळणे थांबत असते.
- खोबरेल तेलामध्ये कापुर मिक्स करून घ्यावे.आणि केस धुवण्याच्या काही कालावधी अगोदर हे कापुर मिक्स केलेले खोबरेल तेल केसांना लावावे.
- आठवडयातुन किमान एकदा तरी रात्री झोपण्याच्या आधी चांगल्या ब्रँडचे नारळाच्या तेलाने केसांची मशागत करावी.नारळाचे तेल लावल्याने आपल्या केसांच्या आरोग्यात वाढ होते.
- केस गळती थांबवण्यासाठी आपण व्हिटँमिन ई च्या गोळया तसेच औषधे देखील घेऊ शकतो.
- केसांची गळती थांबावी आणि ते मजबुत देखील बनावे म्हणुन आपण आवळा आणि कोरफड ह्या आयुर्वैदिक वनस्पतींचा देखील वापर करू शकतो.