Google word coach विषयी माहीती – Google word coach Marathi information

वर्ड कोच माहीती – Google word coach Marathi information

 गूगल कंपनी ही जगातील अनेक प्रसिदध साँपटवेअर कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.आज करोडोंच्या संख्येने लोक गूगलने सुरु केलेल्या प्रोडक्ट तसेच सर्विसचा लाभ घेताना आज आपणास दिसुन येत आहे.मग ते गूगलचे सर्च इंजिन असो किंवा गूगलद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली इतर प्रोडक्ट सर्विसेस असो.

गूगल कंपनी नेहमी आपल्या युझर्ससाठी आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसद्वारे नवनवीन सोयी सुविधा फिचर्स घेऊन येत असते.अशाच सुविधांपैकी एक सुविधा गूगलने आपल्या युझर्ससाठी सुरू केली आहे.जिचे नाव आहे गूगल वर्ड कोच.

गूगल वर्ड कोच हे गूगलचे नवीन फिचर आहे.जे नुकतेच गूगल कंपनीकडुन सुरू करण्यात आल्याचे आपणास दिसुन येते.

गूगल वर्ड कोच हे नवीन फिचर सुरू करण्यामागे गूगलचे एक मुख्य उददिष्ट आहे आणि ते म्हणजे आपल्या युझर्सच्या इंग्रजी शब्दसाठयात(increase English vocabulary)वाढ व्हावी तसेच त्यांचे इंग्रजी देखील सुधारावे.

हे एक खुप चांगले फिचर आहे जे नुकतेच गूगलने सुरू केले आहे.याच्याने आपल्या इंग्रजी शब्दकोशात,शब्दसाठयात वाढ होणार आहे आणि आपल्या इंग्रजी भाषेत चांगली सुधारणा देखील होणार आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण गूगल वर्ड कोच ह्या गूगलच्या नवीन फिचरविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

गूगल वर्ड कोच काय आहे ?

 गूगल वर्ड कोच हे गूगलचे नवीन फिचर आहे.जे गूगलने नुकतेच सुरू केले आहे.हे फिचर अशा व्यक्तींसाठी सुरू करण्यात आले आहे.ज्यांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नाही त्यांचा इंग्रजी शब्दसाठा फार कमी आहे.

गूगलच्या ह्या नवीन फिचरचा वापर करून आपण आपल्या इंग्रजी शब्दसाठयात वाढ करू शकतो.आणि आपल्या इंग्रजी भाषेत चांगली सुधारणा घडवून आणु शकतो.

गूगल वर्ड कोच का सुरू करण्यात आले?

 आज इंग्रजी भाषेला वाघिनीचे दुध म्हणुन संबोधले जाते.इंग्रजी ही एक अशी आंतरराष्टीय भाषा आहे जी प्रत्येक देशात व्यवहारासाठी,संवादासाठी बोलली जाते.

प्रत्येक देशात मोठमोठया हुद्दयावर काम करत असलेल्या लोकांना त्यांच्या इंग्रजी भाषेवर असलेल्या उत्तम प्रभुत्वामुळेच नोकरीत,व्यवसायात विशेष प्राधान्य दिले जाते.एवढे महत्व आज इंग्रजी भाषेला प्राप्त झालेले आज आपणास दिसुन येते.

हीच इंग्रजी भाषेची नितांत गरज ओळखुन गूगलने आपल्या युझर्ससाठी गूगल वर्ड कोच हे नवीन फिचर नियमित इंग्रजी भाषेत न बोलत असलेल्या(non English speaking countries) देशांसाठी सुरू केले आहे.

See also  List Of 54 Banned Chinese Apps - चीनच्या ह्या अँप भारतात प्रतिबंध - पूर्ण यादी

हे फिचर इंग्रजी ज्यांची मातृभाषा नाहीये अशा देशांसाठी मुख्यकरून सुरू करण्यात आले आहे.जेणेकरून अशा (non English speaking) देशातील लोकांच्या देखील इंग्रजी शब्दसाठयात वाढ होईल आणि ते देखील एक उत्तम प्रकारचे इंग्रजी बोलु शकतील.

हे एक असे फिचर आहे ज्याचा वापर करून एखाद्या खेळाप्रमाणे आपण खेळता खेळता आपल्या इंग्रजी शब्दसाठयात वाढ करू शकतो.आणि एक उत्तम दर्जाचे इंग्रजी बोलायला,लिहायला तसेच वाचायला शिकु शकतो.आणि आपली इंग्रजी भाषेवर मजबुत पकड प्राप्त करू शकतो.

गूगल वर्ड कोच कधी आणि केव्हा सुरू करण्यात आले होते?

 गूगल वर्ड कोच हा एक गूगलचे एक नवीन फिचर तसेच खेळाचा प्रकार आहे जो 2018 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आला होता.

गूगल वर्ड कोच कोणी सुरू केले?

 गूगल वर्ड कोच हे फिचर गूगल कंपनीकडुन सुरू करण्यात आले आहे.

गूगल वर्ड कोचमध्ये आपण काय काय शिकु शकतो?

 गूगल वर्ड कोच हे इंग्रजी ही मातृभाषा नसलेल्या देशांसाठी सुरू केलेले गूगलचे नवीन फिचर आहे ज्यात आपण कोटसशी संबंधित क्वीज खेळु शकतो.वाक्य प्रचारांसंबंधीत क्वीज काँम्पिटेशन मध्ये भाग घेऊ शकतो.एवढेच नाही तर इथे आपण भाषांतराशी तसेच व्याकरणिक चुका दुरूस्ती करण्यासंबंधित क्वीज देखील खेळु शकतो.

अशा पदधतीने गूगल वर्ड कोचमध्ये आपण विविध पदधतीचे खेळ खेळुन आपल्या इंग्रजी शब्दसाठयामध्ये वाढ करणे शिकु शकतो.आणि एक उत्तम दर्जाचे इंग्रजी बोलायला शिकु शकतो.

गूगल वर्ड कोचविषयी गूगल कंपनीचे काय मत आहे?

 गूगल वर्ड कोच ह्या गूगल कंपनीने सुरू केलेल्या नवीन फिचरविषयी गूगल कंपनीत काम करत असलेला गूगलचाच एक प्रवक्त्ता म्हणाला होता की गूगल वर्ड कोच हा एक असा मजेशीर (quiz game) खेळ आहे जो खेळता खेळता आपले मनोरंजन तर होतेच शिवाय आपल्या इंग्रजी शब्दसाठयात वाढ देखील होते.आणि आपले इंग्रजी देखील सुधारते.

गूगल वर्ड कोच हा गेम कसा ओपन करायचा असतो? -Google word coach Marathi information

  •  गुगल़ वर्ड कोच हा गेम आपल्याला गूगलच्या सर्च इंजिनमध्ये दिसुन येत असतो.आणि हा गेम आपल्याला दोनच पदधतीने ओपन करता येतो.
  • एका पदधतीत जेव्हा आपण गूगलच्या सर्च इंजिनमध्ये गूगल वर्ड कोच असे टाईप करून सर्च करतो तेव्हा हा गेम आपल्यासमोर ओपन होत असतो.
  • किंवा जेव्हा आपण आपल्याला अर्थ माहीत नसलेल्या एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ गूगलवर शोधतो तेव्हा सुदधा हा गेम आपल्यासमोर लगेच ओपन होत असतो.
  • उदा.जेव्हा आपण गूगलच्या सर्च इंजिनमध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ शोधत असतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ आपल्यासमोर लगेच येत असतो आणि त्याच्याखालीच एका छोटयाशा बाँक्समध्ये त्या शब्दाशी संबंधित दोन सिमिलर वर्ड आपल्यासमोर दाखवले जाते.आणि विचारले जाते की यापैकी कोणता एक शब्द तुम्ही दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे?
  • मग त्यापैकी एक अचुक आणि योग्य समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा असतो.
  • यात आपल्याला सुरूवातीला सोप्पे आणि मग नंतर अवघड पातळीचे प्रश्न देखील विचारले जात असतात.
See also  Instagram Facebook ची ब्लू टिक्स मिळतेय विकत किंमत जाणून घ्या

 

गूगल वर्ड कोच हा गेम कसा खेळतात?

Google word coach Marathi information Marathi
01 Google word coach असे क्रोम मध्ये सर्च करावे-min
02-आपण-गुगल-विचारात असलेल्या प्रश्नांना उत्तर देत जावे उत्तर बरोबर असल्यास गुगल right क्लिक करत असते

सगळयात आधी आपल्याला गूगलच्या सर्च इंजिनवर जाऊन एखाद्या शब्दाचा इंग्रजीत अर्थ शोधावा लागतो.

मग आपल्यासमोर त्या शब्दाचा अर्थ येत असतो.आणि त्याच्याच खाली एका छोटयाशा बाँक्समध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणता शब्द आपण शोधत असलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

मग आपल्यापुढे दिलेल्या दोन पर्यायांपैकी एक अचुक पर्याय आपल्याला निवडायचा असतो.

मग एका मागे एक आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे सत्र सुरू होऊन जाते आणि गेम खेळायला सुरूवात देखील होऊन जात असते.

 गूगल वर्ड कोच ह्या खेळात आपल्याला कशा पदधतीचे प्रश्न विचारले जातात? -Google word coach Marathi information

 गूगल वर्ड कोचमध्ये गेम खेळत असताना आपल्याला तीन प्रकारचे प्रश्न विशेषकरून विचारले जात असतात.

1) समानार्थी शब्द (similar word)

2) विरूधार्थी शब्द (opposite word)

3)किंवा आपल्याला एखादी ईमेज दाखवली जाते ज्यात आपल्याला काय दिसते आहे हे आपण सांगायचे असते.यासाठी आपल्याला दोन पर्याय दिलेले असतात त्यापैकी एक योग्य पर्याय आपण निवडायचा असतो.

इथे आपल्याला भाषांतराशी तसेच व्याकरणिक चुका दुरूस्ती करण्यासंबंधीत,वाक्यप्रचारासंबंधित,कोटस संबंधित क्वीज क्वेशन देखील विचारले जात असतात.

गूगल वर्ड कोच गेमची वैशिष्टये कोणकोणती आहेत?

  •  गूगल वर्ड कोच ह्या गेमचे पहिले वैशिष्टय हे आहे की गूगल वर्ड कोच हा गेम खेळायला अत्यंत सहज आणि सोप्पा आहे.जो लहान मुलांपासुन मोठया माणसांपर्यत कोणीही सहज खेळु शकते.
  •  गूगल वर्ड कोच ह्या गेमचे दुसरे वैशिष्टय हे आहे की यात आपण एखाद्या क्वीज काँम्पिटीशन प्रमाणे भाग घेऊन विचारलेल्या प्रश्नांची अचुक उत्तरे देऊन आपल्या इंग्रजी शब्दसाठयात वाढ करू शकतो तेही एकदम मजेशीर पदधतीने खेळत खेळत.
  •  यात मनोरंजक पदधतीने इंग्रजी भाषा शिकण्याचा तिच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.ते ही अशा देशातील लोकांसाठी ज्यांची मातृभाषा इंग्रजी नसल्यामुळे त्यांचा इंग्रजी भाषेशी खास परिचय नाहीये.हे ह्या गेमचे मुख्य वैशिष्टय आहे.
  • कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द विरूधार्थी शब्द काय आहे आपल्याला लगेच खाली दिले जाते.म्हणजे आपले उत्तर बरोबर आहे की चुक हे देखील आपल्याला यात लगेच कळुन जात असते.
See also  रशियाचे लुना २५ मिशन अयशस्वी होण्याचे,क्रॅश होण्याचे कारण काय आहे?Why Luna 25 crashed in Marathi

 गूगल वर्ड कोचचा काय फायदा आहे?

  •  यातील क्वीज मध्ये सहभागी होऊन आपण सोप्या आणि मनोरंजक पदधतीने आपल्या इंग्रजी भाषेतील शब्दसाठयात वाढ करू शकतो.
  • आपल्याला ज्याचा अर्थ माहीत नाही अशा अवघड इंग्रजी शब्दांचे अर्थ समजुन घेऊन आपले इंग्रजी भक्कम करू शकतो.

गूगल वर्ड कोच कसे डाऊनलोड करावे?

  • गूगल वर्ड कोच हा गेम खेळण्यासाठी आपण तो दोन पदधतीने डाऊनलोड करू शकतो.यात पहिली पदधत अशी आहे की जेव्हा आपण गूगलच्या सर्च इंजिनवर एखादा शब्द टाईप करून त्याचा इंग्रजीत अर्थ शोधत असतो तेव्हा त्याच्याशी संबंधित इतर समानार्थी शब्द कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो.
  • आणि सोबत दोन पर्याय देखील दिले जात असतात ज्यातील एक अचुक उत्तर आपल्याला निवडायचे असते.
  • जेव्हा आपण हा गेम खेळत असतो तेव्हा गेम बाँक्सच्या उजव्या बाजुला एक अँरो आपल्याला दिसत असतो त्या अँरोवर क्लीक केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनमध्ये त्या गेमचा एक शाँर्टकट आयकाँन तयार होत असतो.ज्यावर क्लीक केल्यावर आपण त्या गेममध्ये इंटर करू शकतो.
  • किंवा आपण ह्या गेमला सपोर्ट करणारी एखादी गूगल वर्ड कोच नावाची अँप देखील प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करू शकतो.पण खरे सांगायला गेले तर गूगलने हा गेम खेळण्यासाठी अद्याप कोणतीही आपली आँफिशिअल अँप अद्याप तयार केलेली नाहीये.

 गूगल वर्ड कोचविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न -Google word coach Marathi information 

 1) गूगल वर्ड कोच द्वारे आपण पैसे कमवू शकतो का?

 गूगल वर्ड कोच हे फिचर गूगलने non English speaking countries मधील लोकांना आपल्या इंग्रजी शब्दसाठयात वाढ करता यावी तसेच त्यांना उत्तम प्रकारचे इंग्रजी बोलता यावे ह्या एकमेव उददिष्टासाठी सुरू केले आहे.याच्याद्वारे आपण आपले इंग्रजी सुधारू शकतो कुठल्याही प्रकारचे पैसे कमवू शकत नसतो.

2) गूगल वर्ड मध्ये आपण लाँग इन कसे करावे?

 इथे आपल्याला लाँग इन तसेच साईन अप करण्याची कोणतीही आवश्यकता नसते आपण हे फिचर डायरेक्टली युझ करू शकतो.

3) गूगल वर्ड कोच हा गेम आपण इंटरनेटचा वापर करता खेळु शकतो का?

 नही गूगल वर्ड कोच हा गेम आपण इंटरनेटचा वापर न करता खेळु शकत नाही.कारण गूगल वर्ड कोच हे गूगलच्या सर्च इंजिनमधील एक फिचर आहे ज्याचा वापर करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे फार गरजेचे आहे.

 

 गुगल कंपनी बद्दल संपूर्ण माहिती

 

1 thought on “Google word coach विषयी माहीती – Google word coach Marathi information”

Comments are closed.