गटचर्चा Group discussion म्हणजे काय ? का महत्वाची असते ?

गटचर्चा Group discussion  म्हणजे काय

गट चर्चा हा शब्द दोन शब्दापासून बनला आहे ‛गट’ आणि ‛चर्चा’.गट चर्चे  बाबत  संक्षिप्त मध्ये पाहूया .

  • गट -गट म्हणजे एक समूह जो की मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात मेहनत करत आहे.तीन किंवा तीन पेक्षा जास्त लोकांच्या समूहाला गट म्हणतात.
  • चर्चा -चर्चा म्हणजे दोन व्यक्तींनी किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी केलेली विचारांची देवाणघेवाण,जे की आपण समोर असल्यावर करतो.चर्चा हे एका मुख्य निर्णयावरती सर्वांच्या सहमतीने पोहोचण्याचे साधन आहे.
  • गट चर्चेचा शेवट हा एका निर्णयावरती येऊन पोहोचतो किंवा शेवटी वादावाद ही होतात.

गटचर्चा करणे का गरजेचे आहे ?

विद्यार्थी किंवा व्यक्ति जे खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात करियर करू इच्छित आहेत , खास करून उच्च पदावर किंवा मार्केटिंग क्षेत्रात संवाद कौशल्याला खूप महत्व आहे;

सरकारी क्षेत्रात उच्चपद्स्थ अधिकार्‍यना वेळोवेळी लोक प्रतींनिंधिपुढे , जनतेपुढे मुद्दे मांडावे लागतात तसेच खाजगी फील्ड मध्ये सीईओ किंवा मार्केटिंग अधिकार्‍यांना आपल्या उत्पादनं बाबत आणि सेवे बाबत सखोल पणे माहिती समोर ठेवावी लागते

दोन्ही क्षेत्रात वेगवेगळ्या forum वर जावून प्रभावी पणे मुद्दे मांडणे आवश्यक असते

या मुळे च गट चर्चेला फार महत्व आले असून .हे skill कौशल्य खूप शक्तिशाली आहे

  • तुमचे म्हणणे एखाद्या गटाला सांगून त्यांना ते पटवून देणे,ही गोष्ट खरच खूप अवघड आहे.पण ज्यांना हे करायला जमते,ते खुप पुढे जातात.
  • काही शाळेमध्ये गट चर्चेला एक ग्रोव होण्याचे साधन म्हणून वापरतात.गट चर्चेमध्ये प्रभुत्व संभाषण कोशल्य ,नेतृत्व करण्याची क्षमता,प्रॉब्लेम-सोलवड सोल्युशन, सामाजिक कोशल्य, यावरून मिळते.
  • समजा एक हुशार मुलगा आहे पण त्याच्याकडे संभाषण कोशल्याची कमी आहे.तर तो त्याच्या मनातील मुद्दे ग्रुप मध्ये स्पष्ट रित्या मांडू शकणार नाही.त्यामुळे गट चर्चा हे आयुष्यात पूढे जाण्यासाठी खूप महत्वाचे साधन बनते.
See also  दुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ - Milk products information in Marathi

ज्ञान आणि टेक्निकल गोष्टी शिकणे हे विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप मोठा प्रभाव पाडते ;परंतु तुम्ही जेव्हा कंपनी किंवा ऑर्गनायझेशन जॉईन करता तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू वेळी आपल संभाषण कौशल्य ,वर्कर ना सोबत घेऊन चालण्याचे कोशल्य, ह्या गोष्टींची आकलन  केल जाते.

गट चर्चा कशा पद्धतीने घेतली जाते ?

  • जेव्हा तुम्ही कंपनीत जॉबला जाता तेव्हा काही कंपनीमध्ये तुमच्या स्किल्स ची टेस्ट घेतली जाते.या टेस्ट मध्ये गट चर्चा मधील समूहामध्ये आपले मत पटवून द्यायची क्षमता देखील पहिली जाते.ह्या गट चर्चा चाचणी मध्ये 7 ते 12 पर्यन्त सहभागी असतात.

गट चर्चेचा कालावधी किती वेळ असतो ?

  • सामान्यतः गट चर्चेचा कालावधी हा 15 मिनिटांचा असतो.तुम्हाला ह्या 15 मिनिटांमध्ये तुमचे मत तुमच्या सहकार्यांना पटवून द्यायचे असते.जर जास्त सहभागी असले तर हा गट चर्चेचा कालावधी वाढू शकतो, किंवा परीक्षक किंवा जज हा कालावधी वाढवू शकतात.परीक्षक 15 मिनिटाच्या आतही गट चर्चा थांबवू शकतात.
  • काही जागी जसे की,IIFT मध्ये गट चर्चेचा कालावधी हा 45 मिनिटांचा असतो.

गट चर्चा – गटचर्चा Group discussion  म्हणजे काय

  • गट चर्चेची सुरवात ही टॉपिक च्या घोषणेनंतर होते.
  • दिलेला मुद्दा हा टेक्निकल किंवा केस स्टडी वरती असू शकतो.गट चर्चा चालू होण्याच्या आधी तुम्हाला 3 मिनिटे गट चर्चेची तयारी करण्यासाठी दिली जातात.
  • आता ग्रुप मधील सभासद आपापली मते सर्वांसमोर मांडतात.
  • गट चर्चा जेव्हा परीक्षक थांबा म्हणतो तेव्हा थांबते किंवा ग्रुप मधील दोघा-तिघांना परीक्षक गट चर्चेतील टॉपिक च सारांश द्यायला सांगतात
  • .सारांश मध्ये गट चर्चेत चर्चा केलेल्या मुख्य मुद्यांना ऍड करणे गरजेचे आहे.
  • तुम्ही समरी मध्ये चर्चेत सांगितले जाणारे पॉईंट सांगू शकत नाही.शेवटी गट चर्चेत सहभागी घेतलेल्या पार्टीसिपंट चे मार्क्स त्याच्या परफॉर्मन्स वरती दिले जातात.परीक्षक गट चर्चमधील सहभागी झालेल्या सर्वांना मार्क्स देतो.

गट चर्चेचे महत्व का आहे ?

  • ह्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो.
  • गट चर्चा तुम्हाला सार्वजनिक मध्ये बोलण्याची संधी देते.त्यामुळे तुमची पब्लिक स्पिकिंग स्किल वाढते.
  • गट चर्चेमुळे तुम्ही दिलेल्या विषयावर खोलात जाता.सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न होतो
  • गट चर्चेमध्ये एका सहभागी व्यक्तीला जास्तीत जास्त 5 मिनिटं साधारण मिळतात .त्या 5 मिनिटांमध्ये त्याला त्या टॉपिक चे आकलन, नंतर सुरवात कोणत्या मुद्द्यांवरून करायची, आपले मत लोकांना कसे पटवून द्यायचे ,हे सर्व त्याला फक्त 5 मिनिटांमध्ये करायचे असते.
  • गट चर्चेमुळे तुमचे संभाषण कोशल्य वाढते.
  • गट चर्चेमुळें तुमची ग्रुप मध्ये बोलण्याची भीती कमी होते.
  • काही लोकांना पब्लिक मध्ये बोलायला भीती वाटते.त्यांना टॉपिक बद्दल माहिती माहीत असून ते बोलताना ते चाचपडतात.त्या लोकांनी जर दोन तीन गट चर्चेमध्ये भाग घेतला तर त्यांना पब्लिक समोर बोलण्याची भीती वाटणार नाही.
  • तुम्ही कंपनीमध्ये तुमच्या सहकार्याबरोबर कसे वागणार याचे आकलन अगोदरच परीक्षक गट चर्चेमध्ये करतात.
  • परिक्षकाला गट चर्चमधील सहकाऱ्यांचा बाकीच्या सहकाऱ्यांबरोवर असणारा आचरण समजते .
  • गट चर्चा व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेला वाढवते.
  • गट चर्चेमध्ये प्रत्येक जण आपल्या विविध कल्पनांची ची देवाणघेवाण करत असतो.
  • गट चर्चा निवडक उमेदवारांना निवडतो.ह्यावरून तो उणेद्वार त्यांच्या कंपनीसाठी सुटेबल आहे की नाहीं हे ही समजते.
See also  जागतिक महिला दिन महत्व अणि इतिहास  | International Women's Day History And Importance In Marathi

गटचर्चा (Group discussion ) कडे फक्त नोकरी साथी न बघता एक व्यक्तिमत्व विकास म्हणून पाहिले पाहिजे व शक्य तितके विविध कौशल्यात निपुणता मिळवली पाहिजे