प्रतेयक क्षेत्रात आज तंत्रज्ञान घर केलय . घरातील औटोमेशन , स्मार्ट डिव्हाईस , टेस्ला सारख्या मानव विरहित कार पासून तर अलेक्सा सारखे स्मार्ट असिस्टंट जे आपल्या सर्व प्रशांची उत्तरे देते,जसे की उपकरणे बंद सुरू करणे ,कॉल लावणे ,गजर लावणे,इत्यादी.
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग चे अनेक प्रकार असतात, विबिध इंडिकेटर वापरुन किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स यावर आधारित. तसेच एक नवीन कळानुरूप एकप्रकार एक आद्यवत टेक्नॉलॉजी वर आधारित ट्रेडिंग प्रकार आहे तो म्हणजे अल्गो ट्रेडिंग
अल्गो ट्रेडिंग काय आहे ? Algo trading Marathi
- अल्गो ट्रेडिंग मध्ये वेळ ,किमत आणि संख्यावर (volume) वर आधारित एक ठराविक संगणकीय नियमवली तयार केली जाते आणि त्यावर आधारित शेअर खरेदी व विक्री होते.
- हा कम्प्युटर अल्गो ट्रेडिंग हा वर म्हटल्याप्रमाणे ठरवून दिलेले नियमाने इतक्या जलद रित्या ऑर्डर प्लेस करतो जे एरवी माणसा ल शक्य नसते.
- म्हणजेच हे दुसरे तिसरे काही नसून एक कॉम्पुटर प्रोग्रॅम आहे जो की तुमच्या ट्रेडिंग स्ट्रेटजी,शेअर बाय आणि सेल करण्याचे काम करतो.ह्या ऑर्डर वेगात होतात.कॉम्पुटर प्रोग्रॅम हा Python, C+ , java यांसारख्या भाषांनी कोडेड असतो.
- या करता प्रोग्रॅमर असणे आवश्यक नाही ,कोणीही अल्गो ट्रेडिंग करू शकतो.
अशा खूप कंपन्या आहेत ज्या की तुम्हाला रेडिमेड अल्गो स्ट्रेटजी सॉफ्टवेअर विकतात किंवा कोडींग शिकताना तुम्हाला मदत करतात.
आपण अल्गो ट्रेडिंग एका उदाहरणावरून पाहू :
- समजा तुम्ही RSI नुसार सोपी ट्रेडिंग स्ट्रेटजी वापरली. तसेच तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये किंवा महत्त्वाच्या कामात असता,तेव्हा अल्गो तुमचे ट्रेड बय आणि सेल करण्याचे काम करते.
- RSI तुम्हाला जास्त खरेदी केलेले शेअर आणि जास्त विकले गेलेले शेअर दाखवतात.
- जेव्हा RSI तुम्हाला 80 आकडा दाखवते, तेव्हा त्याचा असा अर्थ होतो की,तो शेअर जास्त वेळा खरेदी केला आहे.जेव्हा RSI तुम्हाला 20 आकडा दाखवते.तेव्हा त्याचा असा अर्थ होतो की,शेअर जास्त वेळा विकला गेला आहे.
- तुम्ही जेव्हा अल्गो ट्रेडिंग मध्ये कोडींग करता,तेव्हा तुमचे शेअर बय आणि सेल करण्याचे काम आपोआप होते.
अल्गो ट्रेडिंग चे फायदे
- ऑर्डर लगेच घेतली जाते ते ही तितक्याच किमतीत जितकी तुमी देवू इच्छिता .
- अल्गो ट्रेडिंग मध्ये मानवी चुकणाचा चा सामना करावा लागत नाही.
- तुम्ही ह्याच्या मदतीने तुमची ट्रेडिंग स्ट्रेटजी टेस्ट करू शकता.
चांगल्या अल्गो ट्रेडिंग स्ट्रेटजी – Algo trading Marathi
ज्यांना ट्रेडिंग मधील माहिती आहे ते साधारण खालील अल्गो ट्रेडिंग चा वापर करतात.
- मिन रिव्हर्जन स्ट्रॅटेजी – ही स्ट्रेटजी तेव्हा वापरली जाते, जेव्हा सारखे सारखे वर खाली शेअर ची किंमत जात असते.म्हणजे एका सेकंदला शेअरची किंमत वर जाते तर दुसऱ्या सेकंदाला शेअर ची किंमत खाली येते.अशा वेळेत ही स्ट्रेटजी जेव्हा शेअरची किंमत खाली जाते तेव्हा शेअर खरेदी करते आणि जेव्हा शेअरची किंमत वर जाते तेव्हा तो शेअर सेल करते.
- ट्रेंड फोल्लोविंग स्ट्रेटजी – ह्या सट्रेटजी मध्ये जेव्हा RSI आणि MACD शेअर बय करण्याची ऑर्डर देतात, तेव्हा अल्गो ट्रेडिंग शेअर बय करते.ही अल्गो ट्रेडिंग मधील सर्वात सोपी स्ट्रेटजी आहे.
- अरबीत्रेज ट्रेडिंग स्ट्रेटजी – अरबीत्रेज स्ट्रेटजी मध्ये BSE मध्ये स्टॉक बय केला जातो आणि त्याचवेळी NSE मध्ये स्टॉक सेल केला जातो.NSE आणि BSE मधील स्टॉक ची किंमत थोड्याफार प्रमाणात वेगळी असते.समजा अबक स्टॉक ची किंमत BSE मध्ये 50 रुपये आहे तर त्या स्टॉक ची किंमत NSE मध्ये 45.5 असते.
अल्गो कसा बनवायचा आणि अल्गो बनवताना कोणकोणत्या गोष्टी लागतात
- तुम्ही तुमचे कोडींग सॉफ्टवेअर Python, C++, याद्वारे बनवू शकता किंवा अमिब्रोकर किंवा निन्जा ट्रेडर चा वापर करू शकता.ह्या अमिब्रोकर,निन्जा ट्रेडर सारख्या सॉफ्टवेअर मध्ये अगोदरच कोडींग भाषा असतात.
- NSE आणि BSE ची माहिती घ्या.कारण तुम्ही बनवलेले कोडींग हे लाइव्ह NSE आणि BSE वरतीच चालणार आहेत.
अल्गो ट्रेडिंग साठी कोणकोणत्या गोष्टी लागतात ?
- ट्रेडिंग सॉफ्टवेअर जसे की अमिब्रोकर किंवा निन्जा ट्रेडर यांची किंमत साधारणतः 22,000 पर महिना इतकी असते.
- डेटा फीड तुम्हाला 2000 ते 5000 रुपये दरम्यान पडेल.
- API ची किंमत फ्री असते.
भारतातील फेमस अल्गोरिथमिक ट्रेडिंग कंपन्या –
- ट्रेड ट्रॉन – ह्याची दर महिन्याला 1000 रुपये इतकी किंमत असते.यामध्ये तुम्हाला विना कोडिंग ची अल्गो ट्रेडिंग स्ट्रेटजी पुरवली जाते आणि ह्यामध्ये तुम्हाला फ्री API देखील मिळतो.
- स्क्वेर ऑफ – ह्याची किंमत 29500 दर महिन्याला आणि तुम्हाला पहिले 7 दिवस फ्री सर्व्हिस दिली जाते आणि ह्यामध्ये तुम्हाला फ्री API देखील मिळतो.
- अल्गोमोजो – ह्याची किंमत 2000 रुपये दर महिन्याला असते आणि ह्यामध्ये तुम्हाला फ्री API देखील मिळतो.
FOR TRAIL ANY WEB .PL TELL.RAHUL 9964155555
Very nice information new commerce traders…